पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:बाह्य जगामध्ये गतिमान राहून देखील शांत राहण्याचा प्रयोग
शरीर कोमल असेल, तर ते फुलांच्या स्पर्शानेही जखमी होईल. पण मनकणखर असल्यास मोठे खडकही फुटून जातील. आता खऱ्या अर्थानेमनावर काम करण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येक जण विविधकारणांनी त्रस्त आहे. मनासाठी काम करायलाही लोकांकडे वेळ नाही.तंत्रज्ञानामुळे वेळ वाचत आहे, तरीही माणसाला स्वतःसाठी वेळकाढता येत नाही. आपल्या संस्कृतीत एक शब्द आणि एक प्रतीकमनाच्या शांतीसाठी उपयुक्त मानले गेले. या दोन्हीचा वापर भारतीयसंस्कृतीनेच केला. एकांतात ‘ओम” या शब्दाचा उच्चार करावा आणिदोन्ही भुवयांमध्ये आज्ञाचक्रावर ‘स्वस्तिक” या चिन्हाचे ध्यान करावे. हेशब्द व प्रतीक ऋग्वेदामध्ये व्यक्त झाले. हे दोन्ही योग व क्षेमाची सुंदरजोडी आहेत. आधी पाठीचा कणा सरळ ठेवा. डोळे बंद करा. दोन्हीभुवयांच्या मध्ये आज्ञाचक्राकडे पाहा. ‘ओम”चा उच्चार करा. त्याओमला स्वस्तिकच्या चिन्हावर घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरवा.यातून तुम्ही बाहेरच्या जगात पूर्ण वेगाने काम करत राहाल. पण आतमात्र शांती उतरेल.
