पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:पुरुषांना हक्क हवे असल्यास घरकामात हातभार लावावा
पती-पत्नीच्या नात्यातील बारकावे ते दोघेच सर्वोत्तम समजू शकतात.पण कधीकधी इतर नातेवाईक, मित्र, कायदा आणि सरकारलाही यातहस्तक्षेप करावा लागतो. पत्नी म्हणते, तू मला राणीसारखे ठेव. मी तुलाराजा बनवेन. या संवादाचा अर्थ खूप खोल आहे. तर पती म्हणतो,संपूर्ण बागेलाही आश्चर्य वाटते की, आम्ही या बागेतील सर्वात सुंदरफूल निवडून आणले. या संवादातही वेगळा अर्थ दडला आहे.लग्नानंतरची काही वर्षे हे संवाद गोडी आणि सुगंध टिकवून ठेवतात.पण हळूहळू पुढे सगळे कंटाळवाणे,ओझे वाटू लागते. वास्तविकपाहता सह-जबाबदारीच्या आयुष्यालाच ‘दांपत्य” म्हणतात. पण चूकनेमकी इथेच होत आहे. परदेशात तर आता सरकार असे अॅप आणतआहे. पुरुष घरातील कामांत पत्नीला किती मदत करतात याचा निर्णय तेॲप करेल. स्पेनने यावर कामही सुरू केले आहे. आजही जगात केवळ१५% पुरुषच घरातील कामे करतात. बाकी सर्व जबाबदारी स्त्रियांनाचउचलावी लागते. त्यांचे अर्धे आयुष्य विनावेतन घरकामे करण्यातचनिघून जाते. म्हणूनच पुरुषांना हक्क हवे असल्यास त्यांनी घरकामांतहातभारही लावला पाहिजे.
