November 1, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:आरोग्य तपासणीला खर्च नाही, गुंतवणूक समजा

0
n_raghuraman_1793471985539.jpg

कर्करोगाशी लढणाऱ्या गृहिणीची लढाई रुग्णालयापुरती मर्यादित राहत नाही. सतत रुग्णालयात जाणे व उपचाराचा खर्च कुटुंबाची संपूर्ण बचत गिळंकृत करतो. महिला नोकरदार असेल तर उत्पन्न घटण्याचा फटकाही बसतो. पैशांच्या टंचाईमुळे अनेक महिला उपचार पुढे ढकलतात, पुन्हा तपासणीसाठी पोहोचू शकत नाहीत, महागडी थेरपी मध्येच सोडून देतात. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या 500 रुग्णांवरील अभ्यास या संकटाची गंभीरता स्पष्ट करतो. ‘इंटरनॅशनल जर्नल फॉर इक्विटी इन हेल्थ’मध्ये या आठवड्यात प्रसिद्ध अभ्यासानुसार, 84.2% कुटुंबांवर उपचाराच्या खर्चाचा असह्य बोजा पडला. 72.4% लोकांना सक्तीने पैसे उभारण्याचे मार्ग अवलंबावे लागले. 14% लोकांनी उपचार मध्येच सोडले. अशा प्रकरणांत 4.8% कारण आर्थिक अडचण होती. रुग्णांना सरासरी 276 दिवसांत 49 वेळा रुग्णालयात जावे लागले. अभ्यासाचा देखरेख कालावधी संपेपर्यंत 69% लोकांना कर्ज घ्यावे लागले. आधुनिक टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीचा खर्च किमान 30–40 लाख रुपये आहे. सामान्य विमा संरक्षण यासमोर लहान पडते. उपचारासाठी कर्ज घेण्याची नामुष्की फक्त भारताची समस्या नाही. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस काउंटीमध्ये भारतीय स्थलांतरितांचे सुपुत्र व साथरोग तज्ज्ञ डॉ. नमन शाह याच्याशी लढण्यासाठी पुढाकार घेत आहेत. दर मंगळवारी सरकारी हेल्थ क्लिनिकमध्ये टीबीच्या रुग्णांवर उपचार करणारे शाह, वैद्यकीय कर्जाकडेही संसर्गजन्य आजारांसारखेच पाहतात. समस्या वाढण्यापूर्वी ती रोखणे गरजेचे आहे. त्यांच्या पुढाकारात बिल तयार होण्यापूर्वीच डिजिटल व्यवस्था रुग्ण आर्थिक मदतीसाठी पात्र आहे की नाही याची तपासणी करते. उत्पन्नाच्या आकडेवारीवरून कमी उत्पन्नाची पात्रता निश्चित होताच बिल माफ होते. अशी व्यवस्था स्वीकारणाऱ्या रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत 50% पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे कुटुंब गरिबीत ढकलले जाण्यापूर्वीच कर्ज रोखण्यास मदत झाली आहे. सरकारे अशा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर लागू करेपर्यंत आपल्यालाही पुढाकार घ्यावा लागेल. आपल्या कमाईचा आणि वेळेचा काही भाग आजारापासून बचाव आणि वार्षिक आरोग्य तपासणीवर खर्च करा. याला खर्च समजून टाळू नका. मॅनेजमेंट टीप: आजाराच्या बचावासाठी गुंतवणूक, उपचाराच्या कर्जापासून वाचण्याचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!