डॉ. चंद्रकांत लहरिया यांचा कॉलम:आज काही लोक ‘ओव्हरट्रीटमेंट’चे, अनेक जण ‘अंडरट्रीटमेंट’चे बळी
आपल्या आरोग्यव्यवस्थेत मोठा विरोधाभास आहे. एकाबाजूला गरजेपेक्षा जास्त चाचण्या, औषधे, सप्लिमेंट्सआणि उपचार मिळत असलेले लोक आहेत. तरदुसरीकडे कोट्यवधी लोकांना मात्र प्राथमिक वैद्यकीयसुविधा, आवश्यक चाचण्या व गरजेची औषधेही वेळेवरमिळू शकत नाहीत. एक व्यक्ती मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयात केवळथकवा जाणवतो म्हणून जाते. तेथे तिच्या अनेक चाचण्याकेल्या जातात. अहवालात व्हिटॅमिन डी थोडे कमी, युरिकॲसिड जास्त, कोलेस्ट्रॉल मर्यादेपेक्षा जास्त येते व काहीआकडे लाल रंगात दिसतात. काही दिवसांतच त्याव्यक्तीकडे नवीन औषधे, सप्लिमेंट्स आणि पुढीलचाचण्यांची यादी तयार असते. दुसऱ्या बाजूला, एखाद्यालहान शहरात किंवा गावात एक व्यक्ती वर्षानुवर्षेवाढलेल्या रक्तदाबासह जगत असते. तिची नियमिततपासणी झालेली नसते. औषध मिळालेले नसते,मधुमेहाचे निदान उशिरा होते. डॉक्टरांपर्यंत पोहोचणेहीकठीण असते. ती व्यक्ती अर्धांगवायूचा झटका येतो किंवातिचे मूत्रपिंड खराब झालेले असते. तेव्हाच रुग्णालयातजाते. हे दोन्ही चित्र भारताचेच आहेत. म्हणूनच असेम्हणता येईल की, भारताची अर्धी आरोग्य समस्या”ओवरट्रीटमेंट”ची आहे. अर्धी समस्या ‘अंडरट्रीटमेंट”चीआहे. शहरांमध्येत वैद्यकीय उपचार गृहितकावर चालूलागले आहेत. जास्त चाचण्या म्हणजे उत्तम इलाज,जास्त स्कॅन म्हणजे अधिक काळजी व जास्त औषधेम्हणजे चांगला उपचार, असे मानले जाऊ लागले आहे.पण वैद्यकीय शास्त्र असे सांगत नाही. प्रत्येक आजारालालगेच औषधाची गरज नसते. प्रत्येक औषध आरोग्य देतनाही. केवळ युरिक ॲसिड वाढणे म्हणजे आजार नव्हे.केवळ व्हिटॅमिन डी कमी असल्याचा रिपोर्ट म्हणजे तोआजार बनत नाही. फक्त कोलेस्ट्रॉलचा आकडा पाहूनव्यक्तीच्या हृदयाचा धोका ठरवता येत नाही. त्यासाठीवय, रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास,वजन, शारीरिक हालचाली या गोष्टीही पाहाव्या लागतात.पण वैद्यकीय पद्धत हळूहळू रुग्णावर लक्ष केंद्रितकरण्याऐवजी रिपोर्टवर लक्ष केंद्रित करू लागली. रुग्णसांगतो की त्याला बरे वाटत आहे. पण रिपोर्टमधीलएखादा आकडा सामान्य मर्यादेबाहेर असतो आणिअनेकदा तोच आकडा संपूर्ण उपचाराचा केंद्रबिंदू बनतो.इथूनच अनावश्यक निदान, उपचारांची सुरुवात होते. एकचाचणी दुसऱ्या चाचणीला जन्म देते. मग औषधे सुरूहोतात. अनेकदा ती औषधे वर्षानुवर्षे सुरू राहतात.अनावश्यक वैद्यकीय उपचार नुकसानही करू शकतात.औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. चाचण्यांचे चुकीचेनिष्कर्ष येऊ शकतात. विनाकारण केलेल्या स्कॅनमुळेचिंता वाढू शकते.उपचाराचा खर्च वेगळाच वाढतो. जास्तवैद्यकीय उपचार म्हणजे नेहमीच चांगला उपचार असतोअसे नाही. दुसऱ्या बाजूला देशाच्या अनेक भागांतपरिस्थिती अगदी उलट आहे. आजही प्राथमिक आरोग्यसेवांची उपलब्धता असमान आहे. लोकांचा रक्तदाबवर्षानुवर्षे तपासला जात नाही. मधुमेहाची ओळख उशिराहोते. गरोदर महिला, वृद्ध व जुनाट आजार पीडितांनानियमित फॉलो-अप मिळत नाही. मानसिक आरोग्याच्यासेवा मर्यादित आहेत. दुसरीकडे कोणाचा रक्तदाबही योग्यप्रकारे मोजला नाही. एका बाजूला एक व्यक्ती पाचसप्लिमेंट्स खातो. एखाद्या रुग्णाला गरजेचे एक औषधहीनियमित मिळत नाही. आपल्याला ‘फास्ट मेडिसिन” सोबतच ‘स्लोमेडिसिन”ची समजही विकसित करावी लागेल.आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो, स्ट्रोक. गंभीरसंसर्ग , अपघात होतो किंवा तातडीने उपचारांची गरजअसते. तेव्हा फास्ट मेडिसिनची गरज असते. पण प्रत्येकसमस्या ही आपत्कालीन परिस्थिती नसते. थोडे वाढलेलेयुरिक ॲसिड, बॉर्डर-लाईन कोलेस्ट्रॉल, वयानुसार होणारेसामान्य बदल किंवा कोणतीही लक्षणे नसलेले छोटे बदलडॉक्टर आणि रुग्णाला विचार करण्यासाठी वेळ देतात.अशा वेळी आधी जीवनशैली, आहार, झोप, वजन,व्यायाम आणि देखरेख या पर्यायांचा विचार व्हायला हवा. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )
