कोल्हापूर
२० मार्च
महाराष्ट्र राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाचे आगमन झालेले आहे.
अवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता वाढलेली आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका हा फळबागांना बसलेला आहे.
ऊस गहू हरभरा या पिकांचेही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या लग्न समारंभ व शुभ कार्यांचा हंगाम सुरू झालेला आहे.
ग्रामीण भागामध्ये जत्रा यात्रा मोठ्या प्रमाणात या काळामध्ये सुरू असतात.
ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक उलाढाल या अवकाळी पावसामुळे विस्कळीत झालेली आहे.
शेतकरी वर्गाबरोबरच सरकारचीही चिंता या अवकाळी पावसाने वाढवलेली आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तुकाराम खोत.