April 11, 2026

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ठरला मोठा भाऊ

0
20260320_173346

कोल्हापूर:-
जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मा. शिल्पा शशिकांत खोत यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी भाजपचे
मा. तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली .
जिल्हा परिषद अध्यक्षा
मा. शिल्पा खोत या सेनापती कापशी या जिल्हा परिषद मतदार संघातून सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेले आहेत.
तर तानाजी पाटील हे भाजपचे उमेदवार गडमुडशिंगी या जिल्हा परिषद मतदार संघामधून प्रथमच जिल्हा परिषदेवरती निवडून आलेल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू सभागृहांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षस्थानी मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे तर प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मा. एस कार्तिकीयन उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे नेते
मा. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील यांच्या सांगण्यावरून काँग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवार मा.रसिका पाटील व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार मा.संभाजी पाटणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली.
महायुती मधील झालेल्या समझोत्यानुसार सव्वा सव्वा वर्षाचे असे पाच वर्षांमध्ये एकूण चार अध्यक्ष व चार उपाध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक सदस्य संख्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्णी सर्वात प्रथम लागलेली आहे.
विद्यमान अध्यक्षांची मुदत संपल्यानंतर भाजप त्यानंतर शिवसेना आणि सर्वात शेवटी जनसुराज्य शक्ती पक्षाला अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.!
सध्याच्या जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे पक्षीय बलाबल असे आहे.!
महायुती:- ५१
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २०
भाजप. १२
शिंदे शिवसेना. ०९
शाहू आघाडी. ०४
जनसुराज्य. ०६

महाविकास आघाडी:- १७

राष्ट्रीय काँग्रेस. १५
काँग्रेसचे सहयोगी. ०२

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तुकाराम खोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *