गुढीपाडव्याचे औचित्य साधून कोल्हापूरमध्ये शोभा यात्रेचे आयोजन
कोल्हापूर शहरांमध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त निघालेली शोभायात्रा मिरवणूक ही अत्यंत उत्साही पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये अनेक महिला युवक अबाल वृद्ध हे पारंपारिक वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले.
कोल्हापूर मधील नावाजलेले ढोल ताशा पथक हे या शोभा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले.
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले चित्ररथ हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
हौशी कोल्हापूरकर या शोभा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
तुकाराम खोत.
.
