August 30, 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:निसर्गाचा सन्मान केल्यास परमेश्वराचाही सहज सन्मान

0
di3jrx_1784832924.jpg

मनुष्याने निसर्गाला निर्जीव मानून त्यात जीवन शोधण्याचा प्रयत्न केल्यास यातून अनेक विचित्र आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होतील. यंदा बाबा अमरनाथ अवघ्या पाच दिवसांत अंतर्धान पावले. सलग तिसऱ्या वर्षी घडलेली ही घटना जणू एकच संदेश देत आहे— निसर्गाचा सन्मान करा, अन्यथा माझे दर्शनही अपूर्णच राहील. परमेश्वराने स्वतःचे अस्तित्व निसर्गातूनच प्रकट केले आहे. आता निसर्गाशी छेडछाड थांबवली पाहिजे. प्रत्येक धार्मिक स्थळी वाढणारी अनियंत्रित गर्दीही प्रकृतीवर ताण आणत आहे. अनेकजण आवडीनुसार धार्मिक स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट करत आहेत. भाविकांनी स्वच्छता आणि शिस्त पाळली पाहिजे, तेथेच अनेकदा निष्काळजीपणा दिसून येतो. बाबा अमरनाथांचे असे अल्पकाळ दर्शन होणे हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर जागरूक होण्याची गरज आहे. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलताना दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे— “मीच निसर्ग आहे. निसर्गाचा सन्मान करा. म्हणजे माझाही सन्मान होईल.’

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!