November 1, 2026

N Raghuraman Column: Loneliness In Third Space Is Dangerous

0
file_1793044059437.jpg

1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

आज जगभरातील लोकांचे आयुष्य स्क्रीनपुरते मर्यादित झाले आहे. अशा या आधुनिक समाजात सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे ‘मित्र’. सध्या एकटेपणा ही अनेकांसाठी लाजेची गोपनीय गोष्ट बनली आहे. त्यामुळेच अनेक जण हजारो अनोळखी लोकांसमोर आपले एकाकीपण उघडपणे व्यक्त करतात. यामागचा उद्देश एकच-कुणीतरी मित्रासारखी वेळ घालवेल, अशी अपेक्षा असते.

एका जाहिरातीत लिहिले होते, “मी या एकटेपणाला कंटाळलो आहे. हे ऐकायला थोडे दुःखाचे वाटू शकते. पण मला खरोखरच काही नवीन मित्र बनवायचे आहेत.’ अमेरिकेत असे शेकडो लोक जाहिरातींच्या माध्यमातून भावना मोकळेपणाने मांडतात. कोणताही रोमँटिक हेतू न ठेवता त्यांना निव्वळ एक चांगले नाते हवे आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘सेंटर फॉर फ्रेंडशिप रिसर्च’ च्या संचालक जॅमी क्रेम्स म्हणाल्या, अशा प्रकारे मदतीची हाक मारणे म्हणजे स्वतःच्या मैत्रीची ‘टॅक्सी लाइट’ ऑन करण्यासारखे आहे. हे लोकांचे स्वतःच्या एकटेपणाबाबतचे प्रामाणिकपण दाखवते. वैमानिक क्षेत्रात ‘टॅक्सी लाइट’ हा शब्द वापरला जातो. धावपट्टीवर निळ्या रंगाचे दिवे असतात. ते विमानाला सुरक्षितपणे जमिनीवर उतरण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे अनेक लोकांना आपल्या आयुष्याचेही सुरक्षित लँडिंग हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. क्रेम्स पुढे म्हणाले, “मैत्री हे एखादे औषध असते, तर डॉक्टरांनी रुग्णांना सर्वात जास्त हेच औषध लिहून दिले असते.’ प्रौढ वयातील मैत्रीवर अभ्यास करणाऱ्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मिरियम किर्मायर म्हणाल्या, ऑनलाइन मित्र बनवण्यासाठी काही तंत्रांची गरज असते. तुमची गरज स्पष्टपणे सांगा. उदा. मला दर शुक्रवारी जिममध्ये सोबत येण्यासाठी एका मित्राची गरज आहे.’ त्यामुळेच आज ‘टिकटॉक’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘फ्रेंडशिप ॲप्लिकेशन’ उपलब्ध आहेत. 33 वर्षांच्या टॉश यांच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. त्यांच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीला बाळ झाले आणि ती आपल्या आई-वडिलांकडे राहायला गेली. त्यामुळे टॉश खूप एकट्या पडल्या. मुले नसलेल्या व्यक्तीला मैत्रीण करायचे होते. त्यांनी याबद्दलची पोस्ट टाकली, तेव्हा त्यांना पहिली प्रतिक्रिया आली—”हे खूप विचित्र आहे.’ टॉश यांनी उत्तर दिले, “हो, हे विचित्रच आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून माझ्यासारखीच दुसरी विचित्र माणसे मला शोधता येतील’. त्यांच्या या पोस्टला काही वेळातच हजारो लाइक्स मिळाले. कमेंट्समध्ये उत्तर देणाऱ्यांपैकी दोन जणी आज त्यांच्या सर्वात चांगल्या मैत्रिणी आहेत. आता त्या एकत्र फिरतात. कॉन्सर्ट आणि शो पाहायला जातात अन् एकत्र छान वेळ घालवतात. टॉश एका मुलाखतीत म्हणतात, “मला माहीत होते की लोक मला मूर्ख समजतील. पण आपली गरज मांडण्यात कसलीही लाज वाटण्याचे कारण नाही.’ एक-दोन दशकांपूर्वीच्या तुलनेत आज लोक एकमेकांना भेटणे कमी झाले आहे. लोकांच्या जवळच्या मित्रांची संख्याही घटली आहे. हा लेख अशा सर्वांसाठी एक इशारा आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञांच्या मते, याची अनेक कारणे आहेत. घर आणि ऑफिस याव्यतिरिक्त असणारी ‘थर्ड स्पेस’ आता कमी झाली आहे. आपला बहुतांश वेळ स्क्रीनने हिरावून घेतला आहे. तसेच प्रौढ वयात लग्न करणे, पालक होणे किंवा स्वतःचे घर घेणे या गोष्टी मागे पडत आहेत किंवा घडतच नाहीत. ‘थर्ड स्पेस’ म्हणजे असा सामाजिक परिसर जो घर आणि ऑफिस/शाळा या दोन मुख्य ठिकाणांपेक्षा वेगळा असतो. शहरी समाजशास्त्रज्ञ रे ओल्डेनबर्ग यांनी ‘थर्ड स्पेस’ ही संकल्पना मांडली. ही संकल्पना समाजजीवनाचा पाया आहे आणि ती लोकांमधील रचनात्मक संवादाला प्रोत्साहन देते.

अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटच्या एका सर्व्हेनुसार, मोबाइलमध्ये व्यग्र जगात चांगल्या आयुष्यासाठी लग्न किंवा मुलांएवढीच एका मित्राची गरज असते. हे आता अनेक लोकांना पटू लागले आहे. परंतु ऑनलाइन बनलेले नाते नेहमीच टिकेल असे नाही. जेसिका लेच यांचेच उदाहरण घ्या. त्यांच्या पोस्टवर 800 लोकांनी स्वारस्य दाखवले. पण त्यातून त्यांना फक्त एकच खरी मैत्रीण मिळू शकली.

मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

QuoteImage

फंडा असा की- आपण स्वतःला एक प्रश्न विचारावा. या स्क्रीनमध्ये अडकलेल्या व मित्रांसाठी जाहिराती देणाऱ्या एकाकी जगाप्रमाणे आपण जगायचे का? की लहानपणापासून आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध करतील असे काही मित्र जोडायचे ? दुसरा पर्याय हा आपली ‘थर्ड स्पेस’ नेहमीच अर्थपूर्ण करेल.

QuoteImage

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!