पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:तपस्वींनाही मिळणार नाही अशी भक्ती देवाकडे मागावी
काकभुशुंडी यांच्यासमोर प्रभू श्रीराम उभे होते. श्रीरामांनी त्यांनासांगितले, “काहीतरी माग.’ काकभुशुंडींनी श्रीरामांकडे साधू-संतांनाहीसहजासहजी मिळत नाही, अशी भक्ती मागितली. तेव्हा रामरायम्हणाले, ‘रीझेउँ देखी तोरी चतुराई। मागेहु भगति मोहि अति भाई।’म्हणजेच, “तुझी चतुराई पाहून मी प्रसन्न झालो. तू भक्ती मागितलीस.मला ती अत्यंत प्रिय आहे. आपण जगासमोर चतुरपणा दाखवतो. पणदेवासमोर चतुराई दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्याकडेअशीच भक्ती मागितली पाहिजे. ती तपस्वींनाही सहज मिळत नाही.मग देवालाही समजते. आपला भक्त फक्त भक्तीच मागायला आलाआहे. विज्ञान सांगते की आपल्या मेंदूचा एक मोठा भाग म्हणजे‘सेरिब्रम’. यात बुद्धी, चतुराई या दोन्ही गोष्टी असतात. बुद्धीचा वापरकसा करायचा, याचा इशारा चतुराईच देते. म्हणूनच दिवसभरातूनकिमान दोनदा डोळे मिटून कल्पना करा. ईश्वर आपल्यासमोर उभाआहे. असे मानून काहीतरी मागा. जेणेकरून आपल्या चतुराईचेकौतुक होईल.
