Public Behavior Controversy: Politicians Must Maintain Decorum
- Marathi News
- Opinion
- Public Behavior Controversy: Politicians Must Maintain Decorum | Aarti Jerath
15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल अलीकडेच चर्चेतआले. नवी टिहरी येथे सरकारने एका पर्यटनमहोत्सवाचे आयोजन केले होते. त्यात प्रसिद्ध पंजाबीगायक दलेर मेहंदी कला सादर करत होते. मंत्री उनियालयांनी भर कार्यक्रमात दलेर मेहंदी यांचा जाहीर अपमानकेला. कार्यक्रम सुरू असतानाच उनियाल व्यासपीठावरचढले. त्यांनी मेहंदी यांच्यावर थेट आरोप केले. मेहंदीनशेत आहेत. त्यांना नीट उभे राहता येत नाहीये आणि तेबोलूही शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. ते थेटगाण्याऐवजी रेकॉर्ड केलेल्या गाण्यावर फक्त ओठहलवत आहेत, असाही आरोप त्यांनी लावला. याकार्यक्रमासाठी 35 लाख रुपये दिले. मेहंदी त्या रकमेचा अनादर करत आहेत, असेही मंत्री म्हणाले.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या वर्तनाचा तीव्रनिषेध केला. अनुपम खेर आणि दलेर मेहंदी यांचे भाऊ गायक मीका सिंह यांनीही यावर टीका केली. एकानामवंत आणि लोकप्रिय कलाकाराशी असे वागणेपूर्णपणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. त्यांची गाणी ऐकायला जमलेल्या प्रेक्षकांसमोर असा अपमान करणे अयोग्य आहे. प्रत्येक प्रसंगाला दोन बाजू असतात. त्यारात्री दलेर मेहंदी यांचे गायन अपेक्षेप्रमाणे झाले नसेल, हेशक्य आहे. त्यांची प्रकृती ठीक नव्हती तर त्यांनी याकार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारायला नको होते, हेही खरेआहे. पण दलेर मेहंदी यांच्या जाहीर अपमानामुळेलोकांना जास्त धक्का बसला . त्यांच्यावर नशेतअसल्याचा बिनबुडाचा आरोप झाला . कार्यक्रमासाठीदिलेल्या मानधनाचा सार्वजनिकरीत्या उल्लेख करणे हीसभ्यतेची लक्षणे नाहीत. दलेर मेहंदी यांचे सादरीकरणचांगले नव्हते आणि प्रेक्षक नाराज होते, तर ही परिस्थितीअधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.उदाहरणार्थ, मध्यांतराच्या वेळी मेहंदी यांना पडद्यामागेनेता आले असते. तिथे नम्रपणे प्रकृतीची विचारपूसकरता आली असती . एखाद्या नेत्याने अशा नामांकितकलाकाराला दिलेली वागणूक ही बहुधा पहिलीच घटनाअसावी. सहसा सनदी अधिकारी, स्थानिक प्रशासकीयअधिकारी अशा वर्तनाचे बळी ठरतात. आपल्यामतदारसंघातील विकासकामांवरून राजकीय नेते आणिअधिकाऱ्यांमध्ये खटके उडत असतात.अधिकाऱ्यांबाबत मिळणाऱ्या तक्रारींमागे काही रास्तकारणेही असू शकतात. पण नेत्यांच्या अभद्र वर्तनाच्याबातम्या आता सातत्याने समोर येत आहेत, ही चिंतेचीबाब आहे. कधीकधी असे वाद फक्त बाचाबाची किंवामोठ्या आवाजातील वादापुरते मर्यादित राहतात. पणआता अपमानास्पद भाषा वापरणे, निलंबनाची धमकीदेणे आणि दंडात्मक कारवाईच्या धमक्या देणे वाढलेआहे. उदाहरणार्थ, काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणेआणि त्यांच्या समर्थकांनी एकदा महाराष्ट्रात एकाउपअभियंत्याला पुलाच्या रेलिंगला बांधले होते.मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्थेवरून त्याअधिकाऱ्यावर चिखल फेकला होता. भाजप खासदारकंगना रणौतही मंडीमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचाअपमान करत असतात. नुकत्याच झालेल्या एका वादातत्यांनी अधिकाऱ्यांना ‘आळशी” आणि ‘अकार्यक्षम”म्हटले होते. मध्य प्रदेशात भाजप आमदार प्रीतम लोधीयांनी शिवपुरीतील एका बैठकीत अधिकाऱ्यांना उघडधमकी दिली होती. सहकार्य न करणाऱ्याअधिकाऱ्यांच्या घरांचे वीज आणि पाणी कनेक्शनकापले जाईल, असे ते म्हणाले होते. कुठे स्थानिकअधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण झाली.जिल्हाधिकाऱ्यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही वादघातल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
राजकारणातील स्पर्धा अत्यंत आक्रमक होत असतानाही प्रवृत्ती अधिक ठळकपणे दिसत आहे. पूर्वी राजकीयपक्ष उमेदवाराच्या समाजसेवेच्या नोंदीला महत्त्व द्यायचे.आता धनबल आणि बाहुबल असलेल्या उमेदवारालानिवडणुकीचे तिकीट मिळणे सोपे झाले आहे. ‘लेगसीआयएएस रिपोर्ट”च्या एका अभ्यासातून गंभीर बाबसमोर आली. सध्याच्या खासदार, आमदारांपैकी 30टक्के लोकप्रतिनिधींवर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखलआहेत. ही माहिती उमेदवारांनी निवडणुकीच्या वेळीदिलेल्या शपथपत्रांवर आधारित आहे. अशापरिस्थितीत, आपल्या अनेक लोकप्रतिनिधींच्या वर्तनातसभ्यतेचा अभाव दिसला, तर त्यात नवल ते काय?(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे. )
आता उमेदवार निवडताना त्याच्याजिंकण्याच्या क्षमतेला जास्त प्राधान्यदिले जाते. धनबल व बाहुबलअसणाऱ्यांना तिकीट मिळणे सोपे झालेआहे. याच कारणामुळे सध्याच्या सुमारे30 टक्के खासदार, आमदारांवर गुन्हेगारीखटले प्रलंबित आहेत.

