मेघना पंत यांचा कॉलम:विवाह ही दोन प्रौढ व्यक्तींची भागीदारी आहे, हे आपण समजून घ्यायला हवे
एखाद्या विवाहित पुरुषाचा मृत्यू होताच काही तासांतचइंटरनेटवर हिशेबाचे चोपडे उघडले जाते. तो किती पोटगीदेत होता? त्याची पत्नी गरजेपेक्षा जास्त मागत होती का?घटस्फोटामुळे तो आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला होता का?दुसरीकडे, एखाद्या विवाहितेचा मृत्यू झाल्यावर आपणअचानक ‘फॉरेन्सिक इकॉनॉमिस्ट’ बनतो. तिच्या कुटुंबानेकिती हुंडा दिला होता? नवऱ्याची काय मागणी होती?तिच्या पालकांनी तिची योग्य ती काळजी का घेतली नाही? पण आपण क्वचितच विचारतो की, इतक्या वेदना निर्माणकरणारी परिस्थिती नेमकी कोणती होती? भारतातविवाहाला आजही दोन स्वतंत्र, सज्ञान व्यक्तींचे नाते कमीमानले जाते. त्यापेक्षा कुटुंब, समाज, बँक खाती,स्वयंपाकघरे आणि आडनावांचा सामाजिक करार म्हणूनचत्याकडे जास्त पाहिले जाते. आपण विवाह करत नाही, तरअपेक्षांच्या ओझ्याखाली बांधले जातो. महिलेने नेहमी जुळवून घ्यावे, अशी अपेक्षा असते. तरपुरुषाने कुटुंबाचा खर्च उचलावा, अशी अपेक्षा केली जाते.आपण चांगले पती-पत्नी आहोत, हे दोघांनाही सिद्ध करावेलागते. संसारात महिलेच्या कष्टाला प्रेम मानले जाते, तरपुरुषाच्या आर्थिक योगदानाला त्याची जबाबदारी मानलेजाते. जोपर्यंत महिला मोबदला मागत नाही, तोपर्यंत तिच्यात्यागाकडे दुर्लक्ष केले जाते. पुरुषावर पडणाऱ्या आर्थिकओझ्याला महिला लोभी असल्याचा पुरावा बनवले जाते. एखादी महिला १५ वर्षे मुलांचे संगोपन करते. घर सांभाळते.पतीच्या करिअरसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊनस्थायिक होते. सासू-सासऱ्यांची काळजी घेते. स्वतःच्याव्यावसायिक आयुष्यातील संधींचा त्याग करते. मग लग्नमोडल्यास तिच्या या त्यागाचे आणि निष्ठेचे काय होते?लग्नाचे फोटो भिंतीवरून उतरताच तिचे हे योगदानमूल्यहीन होत नाही का? पुरुषाला असा विश्वास दिलाजातो की, त्याची ओळख ही केवळ कमावण्यावर, कुटुंबपोसण्यावर व घरातील आर्थिक बाबींवर नियंत्रणठेवण्यावरच अवलंबून आहे. अशा वेळी घटस्फोटामुळेजेव्हा त्याची ही ओळख पुसली जाते, तेव्हा काय होते?आपल्याला आर्थिकदृष्ट्या शिक्षा दिली गेली आहे,भावनिकदृष्ट्या अपमानित केले गेले आहे,सामाजिकदृष्ट्या एकटे पाडले गेले आहे, असे त्याला वाटूशकते. या दोन्ही गोष्टी खऱ्या असू शकतात. पण एकावास्तवाचा स्वीकार करण्यासाठी दुसऱ्याला नाकारण्याचीगरज नाही. सर्वात सोयीस्कर गोष्ट नेहमी तीच असते, ज्यातएखाद्याला खलनायक ठरवले जाते. लोभी पत्नी, निर्दयीपती, हुंड्याचे भुकेले सासरचे लोक. कारण, कोणत्याहीएका व्यक्तीला दोषी ठरवणे हे संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटीसमजून घेण्यापेक्षा खूप सोपे असते. भारतात विवाहाचे स्वरूप त्यासंबंधीच्या संस्थांपेक्षाकितीतरी पटीने वेगाने बदलत आहे. आज महिलाकमावतात. वारसा हक्क मिळवतात. छळ करणाऱ्यालग्नातून बाहेर पडतात. दुसरीकडे पुरुष मुलांचे संगोपनकरतात, त्यांची कस्टडी मागतात. जोडपी आधी एकत्रयेतात, लग्न नंतर करतात. लोक घटस्फोटावर उघडपणेबोलत आहेत आणि पारंपारिक स्त्री-पुरुष जबाबदाऱ्यानाकारत आहेत. पण आपल्या अपेक्षा अजूनही जुन्याचवळणावर आहेत. आपल्याला अशी आधुनिक महिला हवी असते, जीपत्नीची पारंपरिक कर्तव्ये पार पाडेल. आपल्याला पुरुषहीआधुनिक हवा असतो, पण त्याच्याकडे पतीचे पारंपरिकविशेषाधिकार असावेत. विवाह आधुनिक असावेत, पणत्यात जुने जेंडरआधारित नियम चालत राहावेत. आणिजेव्हा या विरोधाभासांचा स्फोट होतो, तेव्हा आपण त्याचव्यक्तीला दोषी ठरवतो, जी या विघटनाच्या सर्वात जवळअसते. विवाह एका भागीदारीसारखा असायला हवा.कदाचित आपले कायदे, कुटुंबे, समाज आणि अपेक्षांनीहीयानुसार बदलण्याची गरज आहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
