Positive Approach To Criticism; Self Improvement Tips By Vijay Shankar Mehta
- Marathi News
- Opinion
- Positive Approach To Criticism; Self Improvement Tips By Vijay Shankar Mehta
8 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

आजकाल कोणाकडून, कधी आणि किती फायदा करून घ्यायचा,हाही हुशारीचा एक निकष बनला आहे. बाजारातील चढ-उतारांचाफायदा घेतला जातो. काही शहाणे लोक नात्यांमध्येही फायदाशोधतात. मग एक प्रयोग करा. फायदा घेण्याची वृत्ती वाईट नाही.स्वतःच्या हिताची इच्छा असलीच पाहिजे. त्यामुळे जर कुठे आपलीनिंदा होत असेल, तर आपण त्यातूनही फायदा करून घ्यायला हवा.त्यानंतर स्वतःमध्ये सुधारणा करा आणि पुढे जा.
टीकेवर कधीहीजास्त वेळ रेंगाळू नका. त्यात सत्य शोधा. त्या टीकेतून जे शिकायलामिळेल, ती आपली रणनीती बनवा. टीका सहन करण्याचा एकफायदा असतो, तो म्हणजे आपला विचार व्यापक होतो. आपल्यापेक्षाविरुद्ध स्वभाव असलेल्या लोकांशी जुळवून घ्या आणि मैत्री करा.कारण सर्वात जास्त टीका त्यांच्याकडूनच ऐकायला मिळेल. तसेचबऱ्याच लोकांना इतरांची निंदा करण्यात खूप रस असतो.
ते त्यात मजाघेत असतील. पण आपण त्या मजेतून आपले भविष्य घडवण्याचे मार्गशोधून काढले पाहिजेत. निंदा करणे हा माणसाचा स्वभावच आहे.त्यामुळे आपली निंदा होऊ नये, यासाठी आपली ऊर्जा अजिबात खर्चकरू नका. आपण टीकेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले, तर तुटलेलाताराही चमकता चंद्र बनेल. निंदेला फीडबॅक म्हणून स्वीकारा
