सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:भारत ‘ऊर्जा कूटनीती''च्या एका नव्या युगात
ऊर्जेचा जागतिक भूगोल बदलत आहे. त्यासोबतचऔद्योगिक क्षमता व राष्ट्रीय शक्ती यांमधील संबंधहीअधिक घट्ट होत आहेत. अनेक दशके भारताने ऊर्जेच्याराजकारणात स्वतःला एक कमकुवत ग्राहक म्हणूनचपाहिले. आपल्या वाढत्या अर्थव्यवस्थेला आयात कच्च्यातेलाची गरज होती. पण पश्चिम आशियात होणारे संघर्षतेलाचे भाव वाढवणारे व पुरवठ्यात अडथळा आणणारेठरत असत. ही कमजोरी आजही कायम आहे. पणयादरम्यान भारत तेल शुद्धीकरण व पेट्रोलियमउत्पादनांच्या क्षेत्रात मोठी ताकद बनून समोर आला. यायशाला रणनीतिक चर्चेत अजूनही पुरेसे महत्त्व दिले जातनाही. रिलायन्स जामनगरमध्ये रोज 14 लाख बॅरल कच्च्यातेलाचे शुद्धीकरण करू शकते. एकाच ठिकाणी असलेलाहा जगातील सर्वात मोठा रिफायनिंग परिसर आहे. पणयाचे महत्त्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. प्रगततंत्रज्ञानामुळे येथे विविध प्रकारच्या कच्च्या तेलावरप्रक्रिया केली जाऊ शकते. यात जास्त सल्फर व जडकच्चे तेलही समाविष्ट आहे. त्याला उपयुक्त व मौल्यवानइंधनात बदलणे अनेक रिफायनरीजसाठी कठीण असते.युद्ध आणि निर्बंधांमुळे पुरवठ्याचे प्रस्थापित मार्ग बंदहोतात. तेव्हा विविध प्रकारच्या कच्च्या तेलावर प्रक्रियेचीही क्षमता अत्यंत महत्त्वाची ठरते. याच कारणामुळे तेलशुद्धीकरण क्षमतेलाही धोरणात्मक पायाभूत सुविधांचाएक भाग मानले पाहिजे. कच्चे तेल आणि डिझेलचा एक बॅरल समान नसतो. कच्च्या तेलाला आधी वाहतुकीद्वारे रिफायनरीपर्यंत पोहोचवावे लागते. मग त्यावर प्रक्रियाकरून पेट्रोलियम उत्पादने तयार केली जातात. विविध रिफायनरीज या इंधनांचे उत्पादन विविध प्रमाणातकरतात. कच्च्या तेलाचे साठे असण्याचा अर्थ असा नाहीकी डिझेलही उपलब्ध असेलच. तेलाचे उत्पादन सुरू असले, तरी शुद्धीकरण प्रक्रिया किंवा वाहतुकीतअडथळा आल्यास इंधनाची टंचाई निर्माण होऊ शकते. अमेरिकेला जामनगरमध्ये रस का आहे, हे यावरून आपल्याला समजू शकते. इराण युद्धाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा आणि व्हेनेझुएलातील तेलाच्या साठ्यांचा एकत्र एक समीकरण आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीरिलायन्सने व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचे अधिकप्रमाणात शुद्धीकरण करावे, यात उत्सुकता दाखवली.त्यांनी व्हेनेझुएलातील तेल उत्पादनात रिलायन्सच्यासंभाव्य सहभागावरही चर्चा केली. व्हेनेझुएलात तेल उत्पादन वाढल्यास अमेरिकेच्या पुरवठा स्रोतांमध्ये विविधता येऊ शकते. रिलायन्सला स्पर्धात्मक दरात भारताच्या रिफायनरीसाठी योग्य कच्चे तेलमिळाल्यास कामकाजातही लवचिकता येऊ शकते.अर्थात, या शक्यता प्रत्यक्षात येणे हे व्यावसायिक अटी व राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. जामनगरमधील उत्पादन अनिश्चित काळासाठी वाढवतायेत नाही. रिफायनरीज चालवण्याच्या स्वतःच्या तांत्रिकमर्यादा असतात. कच्च्या तेलाची खरेदी ही त्याच्याकिमती, वाहतुकीचा खर्च, करार व निर्बंधांवर अवलंबूनअसते. भारत इंधनाची उपलब्धता कायम ठेवण्यास वबाजारावरील ताण कमी करण्यास मदत करू शकतो. पणतो जगातील तेलाचे दर ठरवू शकत नाही. तेलाचे उत्पादन, मागणी, वाहतूक व भू-राजकीयघडामोडी या बाबतीत निर्णायक असतात. रशियाशीजोडलेला पैलू अमेरिकन धोरणातील अंतर्गत विरोधाभासउघड करतो. युक्रेन युद्धानंतर भारताने सवलतीच्या दरातरशियन तेल खरेदी केले. कारण भारतासाठी परवडणाऱ्या दरात तेलाची उपलब्धताव पुरवठ्याची सुरक्षा गरजेची होती. अमेरिकेने निर्बंधांचादबाव आणून व कर लावण्याच्या धमक्या देऊन यावरआक्षेप घेतला. पण आता तोच अमेरिका भारताच्या तेलशुद्धीकरण क्षमतेचे धोरणात्मक महत्त्व मान्य करत आहे. हेअमेरिकन धोरणातील परस्परविरोधी प्राधान्यक्रमांनादर्शवते. विरोधकांवर दबाव आणणे व व्यावसायिकसंधींचा फायदा घेत देशांतर्गत बाजारात किमती स्थिरठेवणे. भारताला या सर्व विरोधाभासांच्या मध्येच मार्गकाढावा लागेल. प्रत्येक गोष्टीला विचार न करता विरोधकरणे िकंवा न सांगता सर्व मागण्या मान्य करणेही योग्यनाही. गरज आहे ती धोरणात्मक धैर्याने व्यावहारिकपातळीवर लवचिकता स्वीकारण्याची. धोरणात्मकस्वायत्ततेचा अर्थ असा नाही की भारताने भूमिकेत बदलकरण्यास नकार द्यावा. याचा खरा अर्थ हा आहे की,आपल्याला कधी, कुठे व कसा बदल करायचा आहे,याचे स्वातंत्र्य स्वतःकडे ठेवणे. आंतरराष्ट्रीय स्तरावरभारताचा प्रभाव आता अशा क्षमतेवर वेगाने अवलंबूनअसेल. पर्याय शोधणे इतर देशांसाठी कठीण आहे. चीनने उत्पादन क्षेत्रात आपली शक्ती वाढवून हेच केलेहोते. ऊर्जेच्या राजकारणाचा व्याप आता केवळ कच्च्यातेलाच्या खरेदीपुरता मर्यादित नाही. यात गुंतवणूक,तंत्रज्ञान व उत्पादनही समाविष्ट आहे. भारतात जामनगरव्यतिरिक्त वाडीनार, कोची, पारादीप, पानिपत व मंगळुरूयेथेही तेल रिफायनरीज आहेत. या सर्व रिफायनरीजआंतरराष्ट्रीय इंधन पुरवठा साखळीत स्थिती अधिकमजबूत करू शकतात. केवळ जामनगरच नाही तरआपल्या संपूर्ण तेल शुद्धीकरण उद्योगासमोर मोठ्या संधीआहेत. देशासमोर मोठ्या संधी…भारतात जामनगर व्यतिरिक्तवाडीनार, कोची, पारादीप, पानिपत वमंगळुरू येथेही तेल रिफायनरीजआहेत. त्यांच्या क्षमतेचा विस्तार केलाजात आहे. या सर्व मिळून आंतरराष्ट्रीयइंधन पुरवठा साखळीत भारताचीस्थिती मजबूत करू शकतात.जामनगरच नाही, तर भारताच्या संपूर्णतेल शुद्धीकरण उद्योगासमोर मोठ्यासंधी आहेत.
