प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:भारताबद्दलची संकल्पना राष्ट्र नायकांनी एकत्र येऊन घडवली
गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून मी एकावेगळ्याच प्रश्नाकडे पुन्हा पुन्हा वळत राहिलो. माझाजन्म 1920 च्या दशकातील भारतात झाला असता तरकाय झाले असते? माझे किशोरावस्थेचे दिवसस्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम व धामधुमीच्या काळात गेलेअसते, तर मी काय पाहिले असते, काय ऐकले असते वकाय मानले असते? मी ऐतिहासिक क्षणात जगत होतो.त्याच्या भव्यतेची मला जाणीवअसती का? मी हा प्रश्नकोणत्याही भूतकाळाच्या मोहापोटी विचारत नाही. माझा जन्म 1920 च्या दशकात झाला असता, तर माझेबालपण एका ब्रिटिश साम्राज्याच्या सावलीत गेले असते.माझी किशोरावस्था आपला राजकीय आवाजशोधणाऱ्या भारतासोबत गेली असती. 1930 आणि 1940च्या दशकापर्यंत राजकारण दैनंदिन जीवनात शिरले होते. बाजारपेठांत अटकेच्या बातम्या व अफवा पसरलेल्या असत. रेल्वे स्थानकांवर सभा व निदर्शनांसाठीजाणाऱ्यांची गर्दी दिसे. लहान शहरांत व गावांत स्वराज्य, सत्याग्रह व सविनय कायदेभंग यांसारखे शब्द सामान्य संभाषणाचा भाग बनले होते. विद्यापीठे केवळअभ्यासाची ठिकाणे उरली नव्हती; ती राजकीय कल्पकतेच्या प्रयोगशाळा बनत होती. स्वातंत्र्यलढाम्हणजे केवळ परकीय राजवट हटवून तिथे भारतीयराज्यकर्त्यांना बसवण्याची लढाई नव्हती. त्यामागे खूपमोठा प्रश्न दडला होता. एवढ्या विविधतेने नटलेल्या,असमान व विषम समाजात स्वातंत्र्याचा अर्थ कायअसेल? नागरिकत्व म्हणजे काय असेल? लोकशाहीअसहमती व विविधतेला स्वतःमध्ये स्थान देऊ शकेलका? राजकारण हा माझ्यासाठी केवळ अभ्यासाचाविषय नसता; तो माझा जीवन-अनुभव असता. आणि मग गांधीजी होते. त्या वर्षांमध्ये महात्मा गांधींचासामना करणे म्हणजे केवळ एका राजकारण्याला भेटणेनव्हते. राजकारणात नैतिकतेला उतरवण्याचा एकअसामान्य प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासारखे तेहोते. मी कल्पना करतो की, कदाचित मीसुद्धा मैलोनमैलचालत गांधीजींच्या एखाद्या प्रार्थना सभेला पोहोचलोअसतो. गावांतील लोक, मजूर,विद्यार्थ्यांच् या मध्येबसून त्यांना सत्याग्रह, शिस्त, अहिंसा आणिसद्भावाबद्दल बोलताना ऐकले असते. त्यानंतर नेहरूहीहोते.भविष्याची स्वप्ने पाहणारे. विचार करा, मीअलाहाबाद किंवा लाहोरमध्ये शिकणारा एखादा विद्यार्थीअसतो आणि नेहरूंना विज्ञान, औद्योगिकीकरण,लोकशाही आणि आधुनिक जगात भारताची भूमिकायावर बोलताना ऐकले असते. स्वातंत्र्य हे अंतिम ध्येयनसून ती केवळ एक सुरुवात आहे, हे कदाचित त्यांनीमला समजावले असते. स्वतंत्र भारताला लोकशाहीसंस्था, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, आर्थिक नियोजनआणि लोकशाही सवयी विकसित कराव्या लागतील,असा नेहरूंचा मोठा आग्रह होता. त्यानंतर पटेल होते.त्यांचा राजकीय धडा काहीसा वेगळा होता. आंदोलनकेवळ प्रेरणेने चालत नाही. हे ते सांगत. मग, कदाचितसर्वात जास्त विचारात पाडणारा सामना डॉ. भीमरावआंबेडकर यांच्याशी झाला असता. डॉ. आंबेडकरांनाभेटणे कोणत्याही तरुण राष्ट्रवाद्याच्या सहज समजुतींनाहादरवून टाकू शकत होते. त्यावेळी राष्ट्रीय स्वातंत्र्याचीकल्पना लोकांना आकर्षित करत होती. त्या वेळी डॉ.आंबेडकर एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतहोते-स्वातंत्र्य कोणासाठी? त्याचसोबत मौलानाआझादही होते. त्यांची भारताची संकल्पना वाढत्याजातीय राजकारणासमोर वेगळा मार्ग दाखवत होती.त्यांचा सामायिक राष्ट्रवाद या विश्वासावर आधारितहोता की, भारताची विविधता ही कोणतीही समस्यानसून ती तिची सांस्कृतिक वास्तविकता आहे. गांधी, नेहरू, पटेल, डॉ.आंबेडकर आणि आझाद हेसगळे एकाच प्रकारे विचार करत नव्हते. त्यांचे मतभेदवास्तविक होते. त्यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये अनेकदासंघर्ष होत असे. पण कदाचित हीच स्वातंत्र्यलढ्याचीसर्वात मोठी ताकद होती. भारत कोणत्याही तयारकल्पनेच्या रूपात आपल्या नागरिकांकडे सोपवला गेलानव्हता. भारतावर चर्चा झाली होती. त्यावर असहमतीझाली होती. त्याच चर्चेतून भारताची संकल्पना आकारघेत गेली होती. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) इतिहास स्वतःच्या काळात कधीहीइतिहासासारखा दिसत नाही. त्या काळाततुरुंगात गेलेले किंवा आंदोलनात सहभागीझाले त्यांना पुढील पिढ्या आपली कशीआठवण ठेवतील, हे ठाऊक नव्हते. तेइतिहासाच्या पुस्तकातील एखाद्याअध्यायात नव्हे, तर वर्तमानात जगत होते.
