नीरजा चौधरी यांचा कॉलम:एकजुटीशिवाय आंदोलने टिकणे केवळ अशक्य
सणासुदीच्या काळात आंदोलने सध्या तरी बासनातगुंडाळली गेली आहेत. त्यांचा अंतिम निकाल काहीहीअसो, त्यांनी पडद्यामागे धगधगणारा असंतोष समोरआणण्याचे काम नक्कीच केले आहे. या असंतोषाचीव्याप्ती किती आहे हे आपल्याला ठाऊक नाही, पणअलीकडच्या आठवड्यांत झालेली आंदोलने एकागोष्टीकडे इशारा करतात.भारतातील तरुण आपल्याभविष्याबाबत चिंतित व असुरक्षित आहेत. अर्थात याआंदोलनांचा निवडणुकीवर किती परिणाम होईल, याचाअंदाज बांधणे सध्या तरी घाईचे ठरेल. अलीकडच्या घडामोडींनी काँग्रेस व विरोधी पक्षांना नवीनसंजीवनी नक्कीच दिली. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों कीगूंज” कार्यक्रमांना तरुणांत स्वीकारार्हता मिळू लागलीआहे. राहुल यांनी या नवीन संधीचा वापर काँग्रेसला याआंदोलनांचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून मांडण्यासाठीकेला आहे. त्यांनी निदर्शकांना ‘शिवाची वरात” असेसंबोधत सर्वांना यात सहभागी होण्याचे निमंत्रणही दिले.आता सर्वांचे लक्ष ऑक्टोबरच्या शेवटी रामलीलामैदानावर होणाऱ्या काँग्रेसच्या सभेकडे लागले आहे.सरकारही आपल्या प्रति-रणनीतीसह मैदानात उतरलेआहे. यामध्ये ‘जेन-झी”ला दिल्लीत आंदोलन करण्याचीपरवानगी न देणे, त्यांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावणे.त्यांना ताब्यात घेणे समाविष्ट आहे. सीजेपीचे सौरव दासव आशूतोष रांका न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची प्रकरणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आहेत. गेल्याकाही आठवड्यांत एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली. आंदोलकांनी आपल्या घोषित उद्दिष्टांमध्ये व ती साध्य करण्याच्या रणनीतीमध्ये- या दोन्ही बाबतीत एकत्र येऊनपुढे जाणे गरजेचे आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांकडून एसआयआर प्रक्रियेबाबत राजीनामा मागण्यासाठीवेगवेगळ्या गटांना एकत्र येण्याचे निमंत्रण देणारी‘शिवाची वरात” वेगवेगळ्या दिशांना खेचली जाण्याचाधोका पत्करू शकत नाही. सामान्य परिस्थितीत, आयसा प्रमुख नेहा बोरा यांनी ढाका येथे शेख हसीना यांचे सरकार उखडून फेकणाऱ्या बांगलादेशच्या विद्यार्थ्यांचे कौतुककेले असते. पण आज नेहा बोरा असे वक्तव्य करतात.तेव्हा त्याचा अर्थ बदलतो; कारण आता त्या आंदोलनाचाएक प्रमुख चेहरा बनल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या विशाल मोर्चाचे नेतृत्व करताना त्यांना पाहिलेगेले होते. उपलब्ध माहितीनुसार ‘रिजीम चेंज” म्हणजेचसत्ता बदलाबाबत ‘आंदोलनाशी जोडलेल्या सर्वघटकांशी चर्चा झाली नव्हती. यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, आंदोलनाचे निर्णय कोण घेते आणि ते कोणत्या प्रक्रियेतून घेतले जातात? अपेक्षित होते त्याप्रमाणे, भाजपला प्रदर्शनकर्त्यांवर हल्लाकरण्यासाठी एक ‘मुद्दा” मिळाला आहे की, त्यांनाअराजकतेच्या माध्यमातून सरकार बदलायचे आहे. आतासंपूर्ण वाद ‘सत्ता बदला”वर येऊन थांबला आहे.संघप्रमुख मोहन भागवत यांनीही विजयादशमीच्याआपल्या भाषणात याविरोधात भूमिका घेतली आहे; जरीसुरुवातीला ते जेन-जीच्या आंदोलनांबाबत मवाळ होते.काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, त्यांना सत्ता बदल केवळनिवडणूक प्रक्रियेद्वारेच हवा आहे. याआधी, जेव्हा राहुलगांधी यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीमागणी केली होती. तेव्हा सीजेपीच्या अभिजित दीपकेयांनी स्पष्ट केले होते की, त्यांचे आंदोलन केवळसीईसीच्या राजीनाम्यासाठी आहे, सत्ता बदलासाठी नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने काही काळ‘शाळा दुरुस्त करा” अभियानावर लक्ष केंद्रित केले.यानंतर 13 कोटी मतदारांची नावे मतदार यादीतूनवगळल्यानंतर त्यांची विश्वसनीयता पुनस्थापितकरण्याच्या मुद्द्यावर ते पुढे गेले. परंतु विरोधी पक्षांच्यासर्व ताकदींची एकजुटता हीच त्यांच्या प्रभावाचीगुरुकिल्ली असेल. विशेषतः भाजप आंदोलकांच्याआव्हानाला तोंड देण्यासाठी प्रतिहल्ल्यांची तयारीआधीपेक्षा अधिक तत्परतेने करत आहे. सीजेपीसुद्धा ‘आप” पक्षाच्या मार्गाने जात स्वतःला एकाराजकीय पक्षात बदलते की नाही, हे पाहणे बाकी आहे.किंवा ती केवळ एक दबाव गट म्हणून राहते. तीसरकारला महत्त्वाच्या मुद्द्यांवर कारवाई करण्यास भागपाडेल? नीट पेपर लीक प्रकरणात त्यांनी असेच केलेहोते. त्यांच्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांना राजीनामाद्यावा लागला होता. पण खेदाची गोष्ट म्हणजे, सीजेपीनेपुढे जाऊन नीट आणि परीक्षा सुधारणांचा मुद्दा सोडूनदिला. कोणत्याही राष्ट्राच्या आयुष्यात अशा संधी फारकमी येतात, जेव्हा असे अर्थपूर्ण बदल घडवून आणतायेतात, ज्यांचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना मिळू शकेल.सत्य हे आहे की, सीजेपीने आंदोलनांची सुरुवात केलीहोती त्यांच्या केंद्रात त्यांनी स्वतः राहायला हवे होते.कारण लोकांनी त्यांच्या नवीन चेहऱ्यांवर व त्यांच्याकडूनआलेल्या नव्या ऊर्जेवरच विश्वास दाखवला होता.विरोधी पक्षांचा आणि विशेषतः काँग्रेसचा प्रश्न आहे,त्यांना सीजेपीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याचीअजिबात गरज नाही. कारण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सीजेपीवातावरण तयार करत आहे. त्याची नैसर्गिक लाभार्थीकाँग्रेसच असेल.(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) वेगवेगळ्या दिशांना…निदर्शकांनी आपल्या घोषित उद्दिष्टांमध्येव ती साध्य करण्याच्या रणनीतीमध्ये- यादोन्ही बाबतीत एकत्र येऊन पुढे जाणेगरजेचे आहे. मुख्य निवडणूकआयुक्तांकडून (सीईसी) एसआयआरबाबत राजीनामा मागण्यासाठी विविधगटांना एकत्र येण्याचे निमंत्रण देणारेआंदोलक वेगवेगळ्या दिशांना खेचलेजाण्याचा धोका पत्करू शकत नाहीत.
