प्रियदर्शन यांचा कॉलम:टेस्लाची उडती कार भविष्यातील अनेक चिंता, प्रश्नांनाही जन्म देते
इलॉन मस्क यांची ‘रोडस्टर’ ही उडती कार भविष्यात रस्तेवाहतुकीचे संपूर्ण चित्र बदलून टाकेल का? आपल्या शहरीजीवनशैलीला लहान-मोठ्या शहरांमधील ट्रॅफिक जॅमच्यासमस्येतून सुटका मिळवण्याचा अंतिम उपाय मिळणारआहे का? माणसाच्या प्रवासाचा वेग कल्पनेपलीकडेवाढणार आहे का? दूर राहणाऱ्या मित्र-नातेवाइकांनाभेटण्यासाठी किंवा ऑफिसला पोहोचण्यासाठी लागणारावेळ कमी होणार आहे का? ही उडती कार सध्या कल्पनेच्या अनंत भरारींना जन्म देतआहे. मात्र, जादुई वाटणाऱ्या या घटनेच्या आर्थिक,सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा विचार करण्यासाठी आपण उड्डाणातून खाली येऊन वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन खूप सोयीस्कर बनवले आहे, यात शंकाच नाही. तंत्रज्ञानावर केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी आहे, ही तक्रारही काही प्रमाणात दूर होत आहे. कारण अनेक शोध बाजारात येईपर्यंत इतके स्वस्त झालेआहेत की, ते सर्वांच्या आवाक्यात आले आहेत. पण याला समांतर असलेले सत्य हे आहे की, याचतंत्रज्ञानाने जगाची दोन भागांत विभागणी केली आहे. एकजग सर्वसाधनसंपन्न लोकांचे आहे, तर दुसरे विशाल जगअशा लोकांचे आहे, जे या अब्जाधीशांनी निर्माण केलेलीसाधने आणि त्यांनी ठरवून दिलेली जीवनशैली आनंदानेस्वीकारून त्यांचे नवे वसाहतवादी गुलाम बनले आहेत. यासर्वांपासून वंचित असलेले एक तिसरे जगही आहे, जेआपल्या कमतरतांसह सतत वाढत आहे. ‘रोडस्टर’ची ऊर्जेची गरज आणि त्यासाठी लागणाराअंदाजित खर्च पाहता, सध्या ही कार केवळ पहिल्याफळीतील अब्जाधीशांचेच शौक पूर्ण करण्याच्या कामीयेईल. भौतिकशास्त्राच्या नियमांना ओलांडून ही कार तयारकरण्यात आल्याचा दावा टेस्लाच्या अभियंत्यांनी केलाआहे. यामध्ये अंतराळयानात बसवल्या जाणाऱ्यारॉकेटप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्यासाठी इंधन जाळले जाणारनाही. त्याऐवजी, कोल्ड कंप्रेस्ड गॅसने भरलेले दहा थ्रस्टर्सअसतील. ते विरुद्ध दिशेने जोर निर्माण करून कारला धक्कादेतील आणि वर उचलतील. त्यामुळे याच्या उड्डाणाचा मूळनियम हा सतराव्या शतकातीलच आहे. तो म्हणजे न्यूटननेमांडलेला गतीचा तिसरा नियम- प्रत्येक क्रियेला तेवढीचआणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. भविष्यात ही प्रत्येक देश,प्रत्येक शहर किंवा प्रत्येक रस्त्यावरील कार बनू शकेल, हेशक्य आहे; पण सध्या तरी ते भविष्य खूप दूर आहे. पण या कार किंवा वेगाशी संबंधित सर्व शोधांच्यापलीकडचा एक प्रश्न आहे. माणसाला एवढ्या वेगाची गरजका आहे? महात्मा गांधींनी 117 वर्षांपूर्वी ‘हिंद स्वराज’मध्येम्हटले होते की, वेग ही खूप चांगली गोष्ट नाही. तोआपल्याला लोकांपासून दुरावतो. पूर्वी आपण एखाद्याप्रवासाला निघायचो, तेव्हा हळूहळू पुढे जात गावे, शहरे,प्रदेश, तिथले खानपान, बोलीभाषा या सर्वांना अशा प्रकारेस्वीकारत जायचो की परकेपणाची भावनाच मनात येत नसे,परंतु वेगामुळे निसर्गासोबतचे आपले नातेच बदलून जाते.वेगवान रेल्वेगाड्या आपल्याला खूप दूरवर एखाद्याअनोळखी भाषिक समाजात सोडून तर येतात, तरीही आपणपरकेपणातच अडकलेले असतो. या संस्कृतीच्या जगातआपण मिसळून गेलो तर अनेक शक्यता निर्माण होतात, पणजर आपण नुसते धावत राहिलो, तर पुढे जाणारा प्रत्येक जणआपल्याला शत्रू वाटू लागेल. हा तंत्रज्ञानाला किंवा टेस्लाच्या नव्या कारला केलेला विरोधनाही, तर हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न आहे की,तंत्रज्ञानाच्या आंधळ्या शर्यतीत सामील होण्यापेक्षासमतोल साधणे अधिक गरजेचे आहे, जो आपल्यालामाणूस म्हणून टिकवून ठेवेल. कारसोबतच आपलेसामाजिक भानही जपेल. तंत्रज्ञान अतिमानवी क्षमतांच्याजोरावर आपले मानवी गुण हिरावून घेण्याच्या मार्गावरआहे. इंटरनेटने स्मरणशक्तीची गरजच संपुष्टात आणलीआहे आणि आता एआय आपली कल्पनाशक्तीही नष्टकरतच आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ‘रोडस्टर’ची ऊर्जेची गरज आणि त्यासाठीलागणारा अंदाजित खर्च पाहता, सध्या ही कारकेवळ पहिल्या फळीतील अब्जाधीशांचेच शौकपूर्ण करण्याच्या कामी येईल. भौतिकशास्त्राच्यानियमांना ओलांडून ही कार तयार करण्यातआल्याचा दावा टेस्लाच्या अभियंत्यांनी केलाय.
