Understanding Gen-Z Workplace Attitudes & Career Perspectives
- Marathi News
- Opinion
- Understanding Gen Z Workplace Attitudes & Career Perspectives | R Raghuraman
5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

“मे आय कम इन?’ हा आवाज ऐकताच एचआर मॅनेजरने टेबलवरून मान वर केली आणि संमती दर्शवली. उमेदवार आत आला. तो खुर्चीवर रेलून बसला आणि नीट बसण्याचा त्याने प्रयत्नही केला नाही. एचआर मॅनेजर काही सेकंद तो कानातील एअरपॉड्स काढेल याची वाट पाहत होत्या. त्याने ते न काढल्यामुळे त्यांनी त्याला एअरपॉड्स काढायला सांगितले. नंतर त्याला कॅशियरच्या नोकरीत का रस आहे, असा प्रश्न विचारला. तो म्हणाला, “ही अर्धवेळ नोकरी आहे. मला माझ्या मोकळ्या वेळेत करायचे आहे त्यासाठी ही सोयीची आहे. मी मित्रांसोबत फिरू शकतो, सुट्ट्यांवर जाऊ शकतो आणि इतर गोष्टीही करू शकतो.’ त्याचा प्रतिसाद आणि देहबोलीने निवड समितीला स्पष्ट संदेश मिळाला. हा तरुण शुक्रवारी रात्री पार्टी करून शनिवारी सकाळी उत्साहाने कामावर येणारा नव्हता. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अडथळा आला तर तो सर्वात आधी कामाचाच त्याग करेल हे स्पष्ट होते. दुसरा उमेदवार वेगळा होता. त्याचे दिसणे, गांभीर्य व संयम यामुळे समिती प्रभावित झाली. बोलावल्याशिवाय तो बसला नाही. बसल्यावरही तो सरळ बसून ऐकण्यासाठी तयार होता. त्याला निवडले गेले आणि पॉइंट ऑफ सेल काउंटरवरील (पीआेएस) तरुण कॅशियरचे काम दोन तास पाहण्यास सांगितले. त्याची परीक्षा एका रिकाम्या काउंटरवर सुरू झाली. बिल 1272 रुपयांचे होते. ग्राहक बनलेल्या एचआर मॅनेजरने त्याला 500 रुपयांच्या तीन नोटा दिल्या. गल्ल्यात 10 रुपयांपर्यंतच्याच नोटा व 1 रुपयाची दोन नाणी होती. यंत्राने 228 रुपये परत दाखवले. तो अडखळला. आधी तो म्हणाला की, त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत. ग्राहकाने त्याला 1 रुपयाची दोन नाणी देऊन 230 रुपये परत देण्याचा सल्ला दिला. पण उमेदवार संकोचला आणि मशीन स्पष्टपणे 228 रुपये दाखवत असल्याचे सांगितले. तो आपले काउंटर बंद करून दुसऱ्या काउंटरवर गेला, सुट्टे पैसे आणले आणि अगदी अचूक रक्कम परत केली. या सर्व प्रक्रियेत चार मिनिटे गेली आणि रांगेत आणखी पाच ग्राहक वाढले. एचआर टीमने त्याला एक आठवड्याच्या प्रशिक्षणावर पाठवण्याचा निर्णय घेतला. हे प्रशिक्षण रोख रक्कम हाताळण्याचे नसून गर्दी व्यवस्थापनाचे होते. दोन्ही उमेदवार तांत्रिकदृष्ट्या सक्षम होते. पण दोघांना वेगळे करणारी गोष्ट म्हणजे दोघांचा कामाबद्दलचा दृष्टिकोन होय.
रविवारच्या दुपारी जळगाव येथे ‘जैन इरिगेशन’च्या कार्यालयात माझी भेट कंपनीचे अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन आणि अतुल जैन या चारही संचालक भावांशी झाली. मी त्यांना ही उदाहरणे सांगितली. समाज जेन-झीकडे (Gen-Z) नकारात्मकतेने पाहतो. ते खरोखर तितके वाईट नाहीत, यावर त्यांचेही एकमत झाले. जेन-झीचे तरुण वेगळा विचार करतात. विशिष्ट मूल्यांना महत्त्व देतात आणि आपले मत उघडपणे मांडतात, असे त्यांचे म्हणणे होते. कदाचित म्हणूनच समाज त्यांच्याबद्दल अनेक पूर्वग्रह बाळगतो. अनिल जैन म्हणाले, “जेन-झीला हाताळण्यासाठी आधी आपल्याला स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करावे लागतील.’ मागील आठवड्यात बिल गेट्स यांनी भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. तंत्रज्ञानाचा अंदाज बांधण्यात त्यांचा अनुभव उत्तम राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी भविष्यवाणी केली की, येत्या काही वर्षांत केवळ काही जाती किंवा दिव्यांगांनाच नोकरीत आरक्षण मिळणार नाही, तर संपूर्ण मानवी प्रजातीलाच आरक्षणाची गरज भासू शकते. कारण रोबोट्स आणि एआय आपल्या नोकऱ्या हिरावून घेऊ शकतात. हे कदाचित पहिल्या उमेदवाराच्या निष्काळजीपणामुळे किंवा दुसऱ्याच्या गणितीय आकलनाच्या अभावामुळे घडू शकते. पण मध्य प्रदेशातील ब्यावरा येथील 21 वर्षांचा बीएस्सीचा विद्यार्थी सुरेंद्रसिंह चौधरी याच्यासारखे तरुणही आहेत. त्यांना थेट घरी नोकरीच्या ऑफर्स येतात. सात महिने त्याने एकट्यानेच प्रदूषित अजनार नदीची स्वच्छता केली. बहुधा म्हणूनच त्याला नेदरलँड्समधून नोकरीची ऑफर आल्याच्या बातम्या येत आहेत. सुरेंद्रसारखे समर्पित कर्मचारी आपल्याला का मिळत नाहीत, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? मी नेहमी नाकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेतो, जेणेकरून त्यांचे वर्तन समजून घेता येईल. स्वतःचे घर खरेदी करावे इतका पगार त्यांना मिळत नाही. आर्थिक अस्थिरता, वाढता खर्च आणि सोशल मीडियावर होणारी सततची तुलना यामुळे ते पालकांसारखे कामासाठी पूर्ण समर्पित होण्यापासून मागे हटतात.
फंडा असा आहे की, तुम्ही जेन-झीची वागण्याची पद्धत समजून घेतली तर त्यांच्या वर्तनामुळे तुम्ही त्यांना नाकारणार नाही. मी पहिल्या उमेदवाराला नोकरी दिली होती हे अगदी तसेच आहे.


मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
