पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कुटुंब टिकवण्यासाठी तरुणांनी योगदान द्यावे
एखाद्या झाडाचे मूळ वाळत चालले असेल, तर ते झाड आजारी पडतअसल्याचे लक्षण आहे. तसेच नात्यांमध्ये रुक्षपणा आला, तर कुटुंबाचेझाड कोलमडून पडेल. याचा थेट परिणाम देशावरही होतो. कारणनिरोगी झाडांनाच फळे आणि फुले येतात. आज भारतासमोरचोहोबाजूने अनेक आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामनाकरण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील लोक काही करत असतील ते ठीकआहे. पण एका सामान्य माणसाचे योगदान हे असू शकते की, त्यानेआपले कुटुंब जपले पाहिजे आणि टिकवले पाहिजे. कुटुंबे ही आपल्यादेशाची एक खूप मोठी ताकद आहेत. उदाहरणार्थ- पूजा-अर्चा किंवाप्रार्थनेचा एक वेगळाच आनंद असतो. यांच्या मूळ रूपात आरोग्यसामावलेले आहे. यांना सोडून देणे हे आजाराचे लक्षण असू शकते. पण यांना जपणे आणि पाळणे ही निरोगी राहण्याची धडपड आहे.आणि आरोग्य तर देवाने आपल्याला जन्मापासूनच शरीराच्या रूपातदिलेली भेट आहे. आजार आपण बाहेरून ओढावून घेतो. म्हणूनचविशेषतः तरुणांनी आपले कुटुंब वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठीयोगदान दिले पाहिजे. देशाच्या उत्पादकतेमध्ये तरुणांचा वाटा आजहीखूप कमी आहे. पण कमीत कमी आपले कुटुंब जपण्यात तरी हे योगदाननक्कीच वाढले पाहिजे.
