रीता राममूर्ती यांचा कॉलम:पुस्तक वाचन हा मनाला एकाग्र करण्याचा सर्वात उत्तम असा मार्ग
लहानपणापासूनच मुलांना पुस्तके वाचण्याची सवयलावली, तर ती मोठी झाल्यावर अधिक एकाग्र, स्थिरआणि विचारशील बनतात. हे विविध संशोधनांतूनही सिद्धझाले आहे. वाचनाची सवय असलेल्या मुलांचीअभ्यासातील प्रगती उत्तम दिसून येते. त्यांच्यात नैराश्याचीलक्षणे कमी आढळतात. ताणतणाव व एकाग्रतेशीसंबंधित समस्या कमी होतात. अशी मुले स्क्रीनवर कमीवेळ घालवतात. लहानपणी लागलेली वाचनाची सवयपुढे चालून शांत आणि एकाग्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासमदत करते. मुलाने एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासोबत वेळ घालवणेम्हणजे एकाग्रता, सहानुभूती व संयमाचा सराव करणेहोय. हेच गुण पुढे किशोरावस्थेत स्वतः आणि इतरांच्याभावना समजून घेण्यास मदत करतात. कोणत्याहीप्रसंगावर लगेच प्रतिक्रिया न देता शांतपणे विचारकरण्याची क्षमता विकसित करतात. दीर्घकाळ लक्ष देऊनवाचणे हा एक प्रकारे एकाग्रतेचाच सराव आहे.वाचनामुळे आपल्याला परिस्थितीचा अंदाज घेण्याचीक्षमता मिळते. मन सतत पुढे काय घडणार आहे, याचाअंदाज लावत असते. हा अंदाज चुकला, की मनत्यानुषंगाने समजात बदल करते. मुलाचा परिस्थितींशीपरिचय होतो. मग पुस्तकांच्या माध्यमातून का असेनात्याची अंदाज बांधण्याची क्षमता तितकीच अधिकसुधारते. वाचलेल्या प्रसंगांचा आणि परिस्थितीचा आपलामेंदू मानसिक स्तरावर अनुभव घेतो. अशा प्रकारेपुस्तकात वाचलेली गोष्ट वास्तविक जीवनातीलधोक्यांशिवाय परिस्थितीचा सराव करण्याची संधी देते.ज्या मुलाने पुस्तकांच्या माध्यमातून मैत्री तुटणे, नवीनशाळेत जाणे किंवा भीतीदायक रात्रीचा अनुभव घेतलाआहे, ती मूल प्रत्यक्ष आयुष्यात अशा प्रसंगाला सामोरेजाताना पूर्णपणे अनभिज्ञ राहत नाही. वाचनाची प्रक्रियामेंदूतील दृश्य व भाषा समजणाऱ्या न्यूरल नेटवर्कचीपुनर्रचना करते. यामुळे आपण पाहतो आणि समजतोयांमधील संबंध अधिक घट्ट होतो. वाचन करणारी मुलेशब्दांत वर्णन केलेल्या गोष्टींची मनात उत्तम प्रतिमा तयारकरू शकतात. ही क्षमता शिक्षकांच्या सूचना समजूनघेण्यासाठी मित्राच्या बोलण्याचा सूर ओळखण्यासाठीकिंवा एखाद्या अनोळखी जागेचा अंदाज घेण्यासाठीउपयुक्त ठरते. पुस्तकांशी झालेली मैत्री मुलांचीभाषासमृद्धी वाढवते. ही प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वीच्यावयापासूनच सुरू होते. समृद्ध भाषा किशोरांना स्वतःच्याभावना अचूक ओळखण्यासाठी व त्यांना नावे देण्यासाठीउत्तम साधने उपलब्ध करून देते. भावनेला आपणओळखून तिचे वर्गीकरण करू शकतो, तिच्यावर लगेचप्रतिक्रिया न देता ती हाताळणे सोपे जाते. लहानपणीचीवाचनाची उत्तम क्षमता ही दहा वर्षांनंतरही मुलाचे वाचनकौशल्य उत्कृष्ट राहील, याचा संकेत देते. जी मुलेसुरुवातीपासूनच चांगली वाचू शकतात, ती अधिक वाचनकरतात. या सरावामुळे त्यांची क्षमता सतत वाढत राहते.याला ‘मॅथ्यू इफेक्ट” म्हणतात. ही सुरुवातीची आघाडीपुढे जाऊन आणखी मोठे यश मिळवून देण्यास मदतकरते. एखादे मूल एखादी गोष्ट समजून घेते किंवासामाजिक प्रसंग चांगल्या प्रकारे हाताळते, तेव्हा मेंदूचीरिवॉर्ड सिस्टीम त्या प्रयत्नाला एक सार्थ अनुभव म्हणूननोंदवते. यामुळे मुलाने पुन्हा तसाच प्रयत्न करण्याचीशक्यता वाढते. याची सुरुवात बालपणापासूनच करा.आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मुलांसोबत बसून पुस्तकेवाचणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वाचनाच्या आनंदालानेहमी प्राधान्य द्या. मुले त्यांच्या आवडीची पुस्तके स्वतःनिवडतात. तेव्हा वाचनाची नैसर्गिक प्रेरणा निर्माण होते.नेहमी लक्षात ठेवा. डूम-स्क्रॉलिंगमध्ये घालवलेला प्रत्येकमिनिट पुस्तकाची पाने उलटण्यासाठी, एखाद्यागोष्टीसोबत पुढे जाण्यासाठी किंवा एखाद्या वाक्यावरथांबून विचार करण्यासाठी वापरता आला असता. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
