मनोज जोशी यांचा कॉलम:अमेरिका- इस्रायल निवडणुका ठरवणार युद्धाचे संभाव्य चित्र
अमेरिका व इस्रायल नोव्हेंबरच्या सुरुवातीला इराणवरनव्याने हल्ला करण्याची योजना आखत असल्याचेसांगितले जाते. आतापर्यंत इराणी सैन्याचे मोठे नुकसानकरून आणि नौदलाच्या नाकेबंदीद्वारे दबाव आणूनहीअमेरिका इराणकडून मागण्या मान्य करून घेऊशकलेली नाही. नव्या हल्ल्यांमधून नक्की काय साध्यहोईल, हे अद्याप स्पष्ट नाही. पण यामुळे मध्य-पूर्वेतप्रचंड विनाश होऊ शकतो. जागतिक अर्थव्यवस्थेलाफटका बसू शकतो. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथयांनी या संभाव्य हल्ल्याबाबत चर्चेसाठी बेंजामिननेतान्याहू यांची भेट घेतली होती. अमेरिकेने याकारवाईसाठी सैन्यही तैनात केले. परंतु हल्ल्यासाठी ट्रम्प यांची मंजुरी गरजेची असेल. ते सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. हे नवे हल्ले इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधा, अणुऊर्जा केंद्र, ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठ्यांवर होऊ शकतात.एका मोठ्या हल्ल्यामुळे इराण अखेर नमते घेईल.अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्द्यावर अटी मान्य करेल,अशी अमेरिका व इस्रायलला आशा आहे. इराणनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मध्य-पूर्वेतीलअमेरिकन लष्करी तळांना अधिक आक्रमकपणे लक्ष्यकेले जाईल. अमेरिकन युद्धनौका बुडवण्याचा प्रयत्नकेला जाईल. सौदीसारख्या देशांतील ऊर्जा यंत्रणा,विमानतळ, तेल वाहिन्यांवर हल्ले केले जातील, असाइशारा इराणने दिला आहे. असे झाल्यास तेलाचे दरगगनाला भिडू शकतात. वास्तविक, इराणनेअलीकडच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत पूर्वीपेक्षा जास्त क्षमतादाखवून दिली आहे. विश्लेषकांनुसार इराणकडे आजहीहजारो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे उपलब्ध आहेत. त्यांनीत्यांचे उत्पादन पुन्हा सुरू केले. इराणी हल्ल्यांमुळेएअरबेस, दूतावास,बहरीनमधील पाचव्या ताफ्याच्यामुख्यालयाचे नुकसान झाले, हे आता अमेरिकाही मान्यकरते. या हल्ल्यांत युएई आणि कतारमधील ऊर्जा वऔद्योगिक ठिकाणे, तसेच दुबई, कुवेत आणिबहरीनमधील विमानतळांनाही लक्ष्य करण्यात आलेहोते. आता शेजारील देशांचे अधिक नुकसान करणे हेचइराणचे मुख्य उद्दिष्ट असेल. गेल्या आठवड्यात‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स”च्या एकाकमांडरने इशारा दिला की, इराण होर्मुझच्यासामुद्रधुनीखालून जाणाऱ्या इंटरनेट केबल्स तोडूशकतो. यामुळे बहुतांश आखाती देशांमध्ये इंटरनेट पूर्णठप्प होऊ शकते; अर्थात काही देशांकडे जमिनीवरीलमार्गांद्वारे पर्यायी नेटवर्क व्यवस्था आहे. यामुळेसौदी,युएईमधील ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट व गुगलच्याक्लाउड व एआय यंत्रणेला फटका बसू शकतो. आर्थिकआणि बँकिंग व्यवहारांचा वेग मंदावू शकतो. याचापरिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे, कारणइंटरनेट बँडविड्थचा मोठा भाग गल्फ-मुंबईकॉरिडोअरमधूनच जातो. काही दिवसांपूर्वीच इराणच्यासंसदेने देशाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्यनियोजक मेहरदाद अखलाघी यांची संरक्षण मंत्री म्हणूननियुक्ती केली. पदभार स्वीकारताच अखलाघी यांनीनवीन तंत्रज्ञानावर आपला भर असेल, असे स्पष्ट केले.इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी एका प्रसिद्धलेखात लिहिले आहे की, ‘नव्याने होणारे हल्लेनागरिकांचे आयुष्य, या प्रदेशातील सर्वच देशांची समृद्धीआणि अर्थव्यवस्था धोक्यात आणतील.” राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, हे हल्ले अशापरिस्थितीत होण्याची शक्यता आहे जी परिस्थिती वेगानेबदलू शकते. इस्रायलच्या प्रस्तावित निवडणुकांमध्येबेंजामिन नेतान्याहू यांचा पराभव संभवतो आणिअमेरिकेत 3 नोव्हेंबरच्या मध्यवधी निवडणुकीत ट्रम्पयांचे नुकसान झाले, तर सत्तेवरील त्यांची पकड सैलहोऊ शकते. अमेरिकेतर्फे कूटनीतिक तोडगा काढण्याचीकोणतीही विश्वासार्ह योजना नसेल, तर या नव्याहल्ल्यामुळे संघर्ष सुटण्याऐवजी तो चिघळण्याचा धोकाआहे. याची किंमत संपूर्ण प्रदेशाला व जागतिकअर्थव्यवस्थेला मोजावी लागू शकते. हे लक्षात घ्यावेकी, लष्करी वर्चस्व म्हणजे मिळालेला राजकीय विजयनसतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. ) इस्रायलमधील आगामी निवडणुकांतबेंजामिन नेतन्याहूंचा पराभव होण्याचीशक्यता आहे. अमेरिकेत 3 नोव्हेंबरलाहोणाऱ्या मध्यावधी निवडणुकांतडोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसल्याससत्तेवरील त्यांची पकड कमकुवत होऊशकते. निकालांचा मध्य-पूर्वेत होणाऱ्यासंभाव्य युद्धावर परिणाम होईल.
