रुचिर शर्मा यांचा कॉलम:मस्क, ऑल्टमन, झुकेरबर्गवरचे चित्रपट काय संदेश देतायत ?
मी अनेक वर्षांपासून ‘फोर्ब्स”च्या अब्जाधीशांच्यायादीचा अभ्यास करत आहे. संपत्तीतील वाढती विषमताकोणत्या देशांत सामाजिक असंतोष पसरवू शकते, हेशोधणे हा यामागचा उद्देश असतो. तंत्रज्ञानासारख्यानवनिर्मिती व उत्पादकता वाढवणाऱ्या क्षेत्रांतील ‘गुडबिलियनेअर्स’ यांच्याकडे संपत्तीचा प्रवाह असतो, तेव्हाअसंतोषाचा धोका कमी असतो. असा एक मुख्य समजआहे. याउलट, रिअल इस्टेट आणि खाणकामासारख्याउद्योगांत ‘बॅड बिलियनेअर्स’ वाढू लागल्यास हा धोकावाढतो. कारण हे क्षेत्र नियमांवर आणि व्यवस्थेवरवर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. पण हॉलीवूड आताया कथेची पटकथा बदलत आहे. 2000 मधीलडॉट-कॉमचा बुडबुडा फुटल्यानंतर आलेले चित्रपट हे तंत्रज्ञानप्रेमी तरुणांचे उत्सव दाखवणारे किंवा त्यांच्या लोभावर भाष्य करणारे हलके-फुलके चित्रपट होते.मात्र, ग्रीक शोकांतिकांसारखे गंभीर असलेले चित्रपटांची लाट येत आहे. हे चित्रपट सिलिकॉन व्हॅलीतील अब्जाधीशांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा , निष्ठुरतेसाठी थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. यात सॅम ऑल्टमन (‘आर्टिफिशियल’), मार्क झुकेरबर्ग (‘द सोशलरेकनिंग’) आणि इलॉन मस्क (‘मस्क’) हे मुख्यनिशाण्यावर आहेत. असे आणखीही चित्रपट लवकरचयेत आहेत. हे नवीन चित्रपट पाहून माझ्या मनात विचारआला की, असे का घडत आहे व याचा परिणाम कायहोईल? एखाद्या आर्थिक संकटानंतर बड्या कॉर्पोरेटकंपन्यांना लक्ष्य करणे ही हॉलीवूडची जुनी पद्धत आहे.2008 च्या आर्थिक संकटानंतरही हेच घडले होते. पणएआयची घोडदौड वेगाने सुरू आहे. अमेरिकन लोकांनीया टेक-अब्जाधीशांच्या कंपन्यांत पैसे गुंतवले . ते त्यांचीउत्पादने व सेवाही वेगाने वापरतात. तरीही असंतोष आहे. ही नाराजी व्यक्तिगत पातळीवरची आहे. डॉट-कॉमच्याकाळात अमेरिकी जनतेने डिजिटल क्रांतीचे उघड्याडोळ्यांनी व उत्साहाने स्वागत केले होते. पणअलीकडच्या काळात त्यांनी या टेक-जगतातील मोठ्याताऱ्यांकडे पाठ फिरवली. मस्क व झुकेरबर्ग यांचीलोकप्रियतेची रेटिंग आता निगेटिव्ह झाली. हॉलीवूडसहसा डाव्या विचारांकडे झुकलेले असते. पण आताबिग टेकच्या सीईओना ‘वाईट अब्जाधीश’ म्हणूनदाखवण्याच्या बाबतीत हॉलीवूड सामान्य जनतेच्याभूमिकेशी जुळवून घेताना दिसत आहे. यावरून असासंकेत मिळतो की, येत्या काळात जनतेचा संतापआणखी वाढू शकतो. सिलिकॉन व्हॅली आता अहंकारआणि गर्वाने ग्रस्त झाली आहे, हा या चित्रपटांमधीलएक प्रमुख विषय आहे. ‘आर्टिफिशियल’चे दिग्दर्शकलुका ग्वाडानिनो यांनी सॅम ऑल्टमनच्या पात्राद्वारेदाखवले की, एआयने उघडलेला हा ‘पँडोराचा बॉक्स’देश आणि उद्योग उद्ध्वस्त करेल. असे असूनही आपणलोकांना नव्या जगात नेण्याचा दावा करत आहोत.दुसरीकडे, ‘मस्क’चे दिग्दर्शक ॲलेक्स गिब्नी यांनीत्यांच्या नायकाची मोठी कमजोरी दाखवली आहे. तीम्हणजे त्याला स्वतःच्या उद्दिष्टाच्या श्रेष्ठतेवर अंधविश्वास आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्यालाकाहीही करण्याची मुभा आहे, असे त्याला वाटते. आता या अब्जाधीशांकडे संधीसाधू, मक्तेदार व सत्तेशीसंधान साधणारे लोक म्हणून पाहिले जाते. हीच प्रतिमात्यांना पडद्यावर खलनायक बनवण्यासाठी अगदी योग्यठरत आहे. ‘मस्क’ चित्रपटाचा उत्तरार्ध टेस्ला आणिस्पेसएक्सच्या प्रमुखावर केंद्रित आहे. त्याने ट्रम्पयांच्यासाठी तथाकथित ‘डीप स्टेट’ उद्ध्वस्त करण्याचाकसा अस्ताव्यस्त प्रयत्न केला, हे यात दाखवले आहे.तर ‘द सोशल रेकनिंग’चे दिग्दर्शक ॲरन सॉर्किन यांनीझुकेरबर्गला बढाया मारताना दाखवले आहे. फेसबुक हेजगातील सर्वात मोठ्या देशापेक्षाही दुप्पट मोठे आहे.त्यामुळे ते सरकारांच्या पलीकडचे आहे, असे त्याचे पात्रमानते. सॉर्किन यांनी यापूर्वी 2010 मध्ये आलेल्या ‘दसोशल नेटवर्क’ची पटकथाही लिहिली होती. पणत्यांच्या नवीन चित्रपटातील झुकेरबर्गचे पात्र पूर्वीपेक्षाअधिक निष्ठुर आणि संवेदनाहीन दिसते. हे चित्रपटअमेरिकेत पसरलेली सत्ताविरोधी मानसिकतादाखवतात. एआयची उत्पादकता व आर्थिक विकासालागती देण्याची क्षमता पाहता माझ्या मते सध्या यानकारात्मक लाटेत वाहून जाणे घाईचे ठरेल. पणश्रीमंतांबद्दलच्या दृष्टिकोनातील हा बदल सामाजिकअशांततेचा इशारा असू शकतो. आजच्या वातावरणाततंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना ‘चांगल्या’ अब्जाधीशांच्यायादीत टिकवणे कठीण होत चालले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) टेक-जगतातील या अब्जाधीशांकडेआता संधीसाधू व मक्तेदार म्हणून पाहिलेजात आहे, त्यांचे सत्तेशी संधान आहे. हीप्रतिमा त्यांना पडद्यावर खलनायकबनवण्यासाठी योग्य ठरते. लोकांचीत्यांच्याबद्दल स्पष्ट नाराजी दिसते.
