पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:सकाळी कसे उठावे, यावर अत्यंत गांभीर्याने काम करा
श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या सातव्या दिवशी अशी एक घटना घडते, जी आपल्याला इशारा आणि समज, दोन्ही देते. या दिवशी रावण युद्धात आला तेव्हा तुलसीदासजींनी लिहिले- भोरु भएँ रथ चढ़ पुनि धावा। सकाळ झाल्यावर रावण रणांगणात रथावर स्वार होऊन आला. रावण हा दुर्गुणांचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात सकाळी-सकाळीही दुर्गुणांचा प्रवेश होतो. म्हणून सकाळी कसे उठावे, यावर अत्यंत गांभीर्याने काम करा. उठताना हनुमान चालीसाचे स्मरण अवश्य करा. याचाच प्रयोग १९ ऑक्टोबर रोजी जयपूरमध्ये केला जात आहे. महापर्वाच्या नावाने आयोजित या कार्यक्रमात संपूर्ण जगभर हनुमान चालीसाचे सामूहिक पठण व्हावे, असे आवाहन केले जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील. हनुमान चालीसाच्या महापठणातून आपल्याला समजेल की नजर तर सर्वांकडे असते, खरी गोष्ट दृष्टिकोनाची असते. जो रावण कोणापासूनही घाबरला नाही, तो हनुमानजींना मात्र फार घाबरत होता. म्हणूनच हनुमान चालीसा दुर्गुणांच्या बाबतीत आपल्यासाठी कवच बनेल.
