रुचिर शर्मा यांचा कॉलम:वेगवान आर्थिक वाढ आता निवडणुकीतील यशाची हमी नाही
आर्थिक विकास निवडणुकीतील विजयाची हमी राहिलेली नाही अमेरिकन अध्यक्षांना सहसा मध्यावधी निवडणुकांतफटका बसतो; पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे.तिसऱ्या तिमाहीत तेथील आर्थिक विकासाचा वेग तब्बल4 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. तरीही ट्रम्प यांचीलोकप्रियता वेगाने घसरत आहे. त्यांच्या पक्षाचाजनाधारही वेगाने निसटत चालला आहे. पुढीलमहिन्यात त्यांनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील बहुमतगमावले. त्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे. 1950च्या दशकानंतर अनुकूल आर्थिक परिस्थिती असूनहीसत्ताधारी अध्यक्षाला पराभवाला सामोरे जावे लागेल,असे घडण्याची ही पहिलीच वेळ असेल. असे का होत आहे? खरे तर, अनेक अमेरिकनांना हा आर्थिक वेग चुकीच्या प्रकारचा वाटतो. ही अशी तेजीआहे. त्याच्यासोबत जगण्याचा खर्च वाढत चाललाआहे. त्याचा फायदा प्रामुख्याने श्रीमंत ग्राहकांनाच मिळत आहे. आर्थिक वाढीचा एक मोठा भाग ‘एआय”मधील (कृत्रिम बुद्धिमत्ता) अफाट गुंतवणुकीतूनही येत आहे. या तंत्रज्ञानाबाबत मतदारांच्या मनात पूर्वीच्या तांत्रिकक्रांतीपेक्षा कितीतरी जास्त भीती आणि संशय आहे. हेखरे आहे की अर्थव्यवस्थेबाबत अमेरिकन जनतेमधील असंतोष एआय आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाआधीपासूनच आहे. गेल्या काही दशकांपासूनअमेरिकन नागरिक देशाच्या एकंदरीत स्थितीबद्दल सततअसमाधानी होत गेले आहेत. पण अमेरिका योग्य दिशेनेजात आहे असे मानणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात 40टक्क्यांवरून घसरून थेट 20 टक्क्यांवर आले. यानिराशेचे मुख्य कारण म्हणजे वाढती महागाई आणिदैनंदिन खर्चाची मिळतीजुळती न होणारी गणिते.जीवनमानाचा खर्च हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानणाऱ्यामतदारांचे प्रमाण सहा पटीने वाढून 25 टक्क्यांच्याविक्रमी पातळीवर पोहोचले आहे. लोकांत नेमक्याकोणत्या गोष्टींच्या किमतींबद्दल सर्वाधिक राग आहे, हेअगदी स्पष्ट आहे. घर आणि ऊर्जा. इराण युद्धामुळेतेलाचा पुरवठा खंडित झाला आहे, तर दुसरीकडे एआयमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. गेल्या वर्षभरातपेट्रोलचे दर 40 टक्क्यांहून अधिक वाढले. महागाईचा दर3 टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. गृहकर्जावरीलव्याजदर 7 टक्क्यांच्या पार गेले आहेत. परिणामी,अमेरिकेत गेल्या दोन दशकांतील कोणत्याही वेळेपेक्षाआता घर खरेदी करणे सर्वात कठीण झाले आहे. मोठ्याप्रमाणावर वीज वापरणाऱ्या डेटा सेंटरमुळे वीज आणिपाण्यासारख्या मूलभूत सुविधांचे बिल वाढत आहे. असासार्वत्रिक समज झाला आहे. दर दहांपैकी नऊ अमेरिकननागरिकांना वाटते की त्यांच्या शहरात असे कोणतेही डेटासेंटर उभारले जाऊ नये. त्यामुळे अशा बहुतांशप्रकल्पांना स्थानिक पातळीवर तीव्र विरोधाचा सामनाकरावा लागत आहे. पण रिपब्लिकन पक्षाकडूनकाँग्रेसची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना या चिंतेवरतोडगा काढणे कठीण जात आहे; कारण खुद्द त्यांच्याअध्यक्षांचे असे म्हणणे आहे की, डेटा सेंटरचे काममंदावले तर अमेरिका मागे पडेल आणि गरीब होईल!यात अजिबात आश्चर्य नाही की, एआय हे डिजिटलयुगातही नाकारले जाणारे पहिले उत्पादन आहे. बहुसंख्यलोक म्हणतात की, एआयबद्दल त्यांना उत्सुकतेपेक्षाचिंताच जास्त वाटते. विशीतील तरुण पिढीमध्ये ही भीतीसर्वात वेगाने वाढत आहे, ज्यांना भविष्यात आपल्यानोकऱ्या जाण्याची भीती सतावत आहे. इराण युद्धाचीकिंमत म्हणून महागड्या गोष्टी स्वीकारण्याचे आणिचीनच्या पुढे राहण्यासाठी एआयचा स्वीकार करण्याचेआवाहन करून ट्रम्प अमेरिकन जनतेच्या सध्याच्यामानसिकतेविरुद्ध उभे राहत आहेत. जीडीपीमधीलवेगवान वाढ सामान्यांच्या रोजच्या आयुष्यात उतरतनसेल, तर राजकीयदृष्ट्या तिचा काहीही उपयोग नसतो.जनतेचा असंतोष हा सूक्ष्म आर्थिक गोष्टींमधून जन्मालायेतो. उदाहरणार्थ, महागाईचा परिणाम वगळल्यानंतरपगारवाढीचा दर काही तिमाहींमध्ये उणे झाला आहे.याला एकमेव अपवाद म्हणजे एआयचे कौशल्यअसलेले कर्मचारी. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांपेक्षा 120टक्क्यांपर्यंत जास्त पगार मिळत आहे. असंतोषाचीठिणगी पडण्यासाठी एवढी एक गोष्टही पुरेशी आहे.(लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.) जीडीपीमधील वाढ प्रत्यक्षात सामान्यमाणसाच्या आयुष्यात दिसत नसेल, तरराजकीयदृष्ट्या तिचा काहीही फायदाहोत नाही. जनतेतील असंतोष सूक्ष्मआर्थिक घटकांतून निर्माण होतो.अमेरिकेत ट्रम्प सध्या याच परिस्थितीचासामना करत आहेत.
