पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आत ईश्वराची अनुभूती असल्यास त्यात कामना येऊ शकत नाही
कामनेची निर्मिती आतून होत नाही. आतून तर फक्त ती पूर्ण करण्याचेप्रयत्न होतात. कामना बाहेरून आत कशी येते ते पाहा. एखादा सुंदरचेहरा दिसला आणि तो मनात घर करतो. कोणाची छान गाडी पाहिली,ती मनात बसते आणि कामना निर्माण होते. मग आत तिची निर्मिती सुरूहोते. आपण बाहेरून साधने मनात भरत राहतो, त्यातूनच कामना बनते.त्यामुळे हे भरणे आधी थांबवा. कारण एकदा का आत तिची निर्मितीझाली, की ती कुठे ना कुठे बाहेर पडणारच. कामना प्रकट होणारच. तीदाबून ठेवल्यास इतर अनेक आजार मागे लागतील. वस्तू किंवा व्यक्तीमनात प्रवेश करतात. तेव्हा मनाचे जाते त्याला दळू लागते आणि त्यातूनकामनेची निर्मिती होते. मग ही कामना पूर्ण करण्यासाठी माणूस कायकाय करत नाही! म्हणूनच एखादा चेहरा किंवा वस्तू पाहतो तेव्हा एकजाणीव ठेवा, की ही बाहेरची गोष्ट आहे . ती बाहेरच राहिलेली बरी. मीतिला मनात का आणू? पण मन आतून रिकामे असेल तर बाहेरच्यागोष्टी पटकन आत शिरतात. म्हणूनच मन आतून ईश्वराने भरा.परमात्म्याची अनुभूती व नामाचा जप मनात भरलेला असेल, तरबाहेरची साधने आत येऊन कामना निर्माण करू शकणार नाहीत.
