सुखवीर सिंह यांचा कॉलम:जगाची कहाणी आता फक्त अमेरिकेच्या शक्तीने लिहिली जाणार नाही
वॉशिंग्टनच्या जॉइंट बेस अँड्र्यूजवर त्या दिवशी एकविलक्षण दृश्य दिसले. शी जिनपिंग विमानातून खालीउतरताच खुद्द ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले.दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये दिलेले राजकीयमेजवानीचे आमंत्रण, मिळालेला लष्करी सन्मान आणिमुत्सद्देगिरीची आपुलकीची भाषा यांनी या दृश्यालाअधिक अर्थपूर्ण बनवले. पण या सगळ्यामागे एक गंभीरप्रश्न दडला होता- अमेरिका चीनची मनधरणी करत आहेका? आणि अमेरिकेला डॉलरची स्थिती सांभाळण्यासाठी चीनच्या सहकार्याची गरज असेल, तर बीजिंगइतक्या सहजासहजी दया दाखवेल का? हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे, कारण सप्टेंबर 2026मध्ये अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज 40.10 ट्रिलियनडॉलरच्या पार गेले. गेल्या एका वर्षात यात 2.67 ट्रिलियनडॉलरची भर पडली. अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज,अल्पमुदतीच्या कर्जावरील वाढते अवलंबित्व जागतिकआर्थिक स्थिरतेसाठी धोक्याचे ठरत आहे, अशी तीव्रताकीद 1 ‘आयएमएफ”नेही दिली आहे. तरीही डॉलरचीजागतिक शक्ती अजूनही इतकी मजबूत आहे की,‘आयएमएफ”च्या आकडेवारीनुसार 2026 च्या पहिल्यातिमाहीत जगातील अधिकृत परकीय चलन साठ्यातडॉलरचा वाटा 57.13% होता. अमेरिकेच्या असामान्यशक्तीचा मोठा पाया म्हणजे तिचे चलन हे फक्त तिचेराहिलेले नाही. जगातील मध्यवर्ती बँका आपल्याकडेडॉलर ठेवतात. आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतोआणि संकटाच्या वेळी अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्स हे सर्वातसुरक्षित मानले जातात. एप्रिल 2025 मध्ये जागतिकपरकीय चलन बाजारात रोज सुमारे 9.6 ट्रिलियन डॉलरचाव्यवहार झाला. यातील 89.2% व्यवहारांत एका बाजूलाडॉलर होता. याच व्यवस्थेने अमेरिकेला कित्येकदशकांपासून उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची मुभादिली. अमेरिका वस्तू आयात करते, व्यापार तूट सहनकरते. बदल्यात जग अमेरिकेची आर्थिक मालमत्ता खरेदीकरते. अमेरिका जगाकडून माल घेते आणि जग तिच्याकागदी दाव्यांची जपणूक करते. चीन हा अमेरिकेचा मोठाधोरणात्मक प्रतिस्पर्धी तर आहेच. पण तिच्या आर्थिकरचनेचा महत्त्वाचा भागही आहे. त्यामुळे चीनने अमेरिकनआर्थिक साठ्यातील भूमिका अचानक बदलली, तरत्याचा परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही, तर संपूर्णजागतिक आर्थिक बाजारावर होऊ शकतो. ‘आयएमए”नुसार 2026 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक अधिकृतसाठ्यात चीनी ‘रेनमिन्बी”चा वाटा फक्त 1.99% होता-जो डॉलरच्या 57.13% च्या तुलनेत खूपच कमी आहे.तरीही ‘बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटनुसार 2025 मध्येजागतिक परकीय चलन व्यवहारात रेनमिन्बीचा वाटा8.5% पर्यंत पोहोचला होता. अमेरिकेची अशी इच्छा आहेकी चीनने तिच्याकडून अधिक वस्तू खरेदी कराव्यात,जेणेकरून व्यापार तूट कमी होईल. डॉलर मजबूत राहील.दुसऱ्या बाजूला चीनच्या तांत्रिक क्षमतेला वेसणघालण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेलाचीनकडून ‘रेअर अर्थ एलिमेंट्स”चा पुरवठा तर हवाआहे. स्वतःचे प्रगत तंत्रज्ञान चीनपर्यंत पोहोचण्यापासून तीरोखत आहे. हा अमेरिकन धोरणाचा खरा विरोधाभासआहे. ट्रम्प यांनी विमानतळावर जाऊन शी जिनपिंग यांचेकेलेले स्वागत हे केवळ कूटनीतिक शिष्टाचार नव्हते; तरते बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेचे एक प्रतीक होते. याव्यवस्थेत अमेरिका सर्वाधिक शक्तिशाली खेळाडूनक्कीच आहे. पण आता ती मैदानात एकटी नाही. डॉलरअजून संकटात सापडलेला नाही. पण आता त्याची कथाअमेरिकेच्या शक्तीवर लिहिली जाणार नाही, हे मात्रतितकेच खरे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
