Can India Reach 12.5 Trillion Dollars by 2036?
2 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन यांनी 21-22 सप्टेंबरदरम्यान भारत दौऱ्यावर असताना एक टिप्पणी केलीहोती. ती टिप्पणी सध्या चर्चेत आहे. डिमॉन म्हणाले ,भारताचा जीडीपी 10 वर्षांत 4.2 ट्रिलियन डॉलरवरूनवाढून 12.5 ट्रिलियन डॉलर होईल. जगातील अत्यंतशक्तिशाली आणि अभ्यासू बँकरमध्ये डिमॉन यांचीगणना होते. त्यामुळे त्यांच्या या अंदाजावर सर्वांनाचआश्चर्य वाटले. मात्र, एका वर्तमानपत्राने विविध तक्ते वगणितांच्या आधारे डिमॉन यांच्या अंदाजावर प्रश्नउपस्थित केले. डिमॉन यांच्या आकड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी किती विकासदर हवा असेल, याचे स्वतःचे गणित त्यांनी मांडले.
वृत्तपत्राचे वरिष्ठ असोसिएट एडिटरने डिमॉन यांचे जीडीपीचे गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2036 मधील भारताच्या अर्थव्यवस्थेचा स्वतःचा अंदाज वर्तवला. त्यांच्या मते, डिमॉन यांची 10 वर्षांची मुदतलक्षात घेतली तर भारताची अर्थव्यवस्था 4.2 ट्रिलियन डॉलरवरून 12.5 ट्रिलियन डॉलर करण्यासाठी जीडीपी दरवर्षी 11.6% दराने वाढावा लागेल. हे अशक्य दिसते. कारण गेल्या 12 वर्षांत भारताचा सरासरी विकासदर6.2% इतकाच राहिला आहे. हाच 6.2% विकासदरअसाच सुरू राहिला, तर 2036 मध्ये भारताचा जीडीपी7.6 ट्रिलियन डॉलर असेल. 12.5 ट्रिलियन डॉलर नाही.पण या विश्लेषणात तीन मोठ्या चुका होत्या.
पहिली चूक म्हणजे, त्यांचे गणित नॉमिनल जीडीपीवर(वास्तविक जीडीपी अधिक महागाईचा दर) आधारितआहे. पण 2036 मध्ये 7.6 ट्रिलियन डॉलरच्यानिष्कर्षावर पोहोचण्यासाठी त्यांनी नॉमिनल नव्हे, तरगेल्या 12 वर्षांतील 6.2% या सरासरी वास्तविकविकासदराचा वापर केला. दुसरी चूक ही की, त्यांनी 12वर्षांतील सरासरी विकासदर कमी करणाऱ्या कोरोनाच्यादोन वर्षांचा प्रभाव दुर्लक्षित केला. कोणतेही स्पष्टीकरणन देता त्याच आधारावर भविष्याचे अंदाज बांधले.तीसरी चूक म्हणजे रशिया-युक्रेन आणि इराणमधीलयुद्धे संपली. बराच काळ प्रलंबित भारत-अमेरिकाव्यापार करार झाला आणि कच्च्या तेलाचे दर पुन्हा65-70 डॉलर प्रति बॅरलवर आले, तरीही जीडीपी 8%पेक्षा जास्त वाढणार नाही, असे गृहीत धरले. आता हेसमजून घेऊ की, जर डिमॉन यांनी या तीन चुका टाळूनअंदाज लावला असेल, तर त्यांचे गणित कसे दिसते.पहिली गोष्ट म्हणजे, 2020-22 च्या कोरोनानंतर गेल्याचार वर्षांत (2022-26) भारताचा सरासरी नॉमिनलजीडीपी विकासदर 10.5% पेक्षा जास्त राहिला आहे.यात 8% वास्तविक विकासदर , 2.5% महागाई दराचासमावेश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही युद्धे संपली,तेलाचे दर खाली आले. भारत-अमेरिका व्यापार करारझाला तर भारत वापरावर आधारित विकासदर वाढून8.5% होण्याची अपेक्षा करू शकतो. यात 3% महागाईदर जोडल्यास भारताचा नॉमिनल जीडीपी विकासदर11.5% होईल. मग हे गणित आपल्याला 12.5 ट्रिलियनडॉलरपर्यंत पोहोचवेल का?
सुरुवात सध्याच्या 4.2 ट्रिलियन डॉलरपासून करूया.11.5% च्या नॉमिनल विकासदराने वाढणारा जीडीपी दरसहा वर्षांनी जवळपास दुप्पट होतो. म्हणजेच 2032 पर्यंतभारताचा जीडीपी 8.4 ट्रिलियन डॉलर होईल. नंतर2036 पर्यंत आणखी चार वर्षे शिल्लक राहतात. 11.5%दराने या चार वर्षांत जीडीपी सुमारे 50 टक्क्यांनीआणखी वाढेल. अशा प्रकारे 2036 मध्ये तो वाढून 12.6ट्रिलियन डॉलर होईल. पण रुपया कमकुवत होतराहिला, तर हे अंदाज चुकू शकतात का? तसे होण्याचीशक्यता फार कमी आहे. कारण युद्ध व व्यापाराशीजोडलेले संकट टळले, तर पुढच्या वर्षी ”ला-निना”चासकारात्मक प्रभाव चांगला मान्सून आणू शकतो. तसेच2028 मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेल, तेव्हा रुपयास्थिर राहू शकतो आणि तो अधिक मजबूतही होऊशकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
युद्धे संपली, तेलाचे दर घसरले आणिभारत-अमेरिका व्यापार करार पूर्णझाला, तर आपल्या वापरावर आधारितवास्तविक विकासदर 8.5% वरपोहोचण्याची आशा करू शकतो. यात3% महागाई दर जोडल्यास नॉमिनलजीडीपी 11.5% होईल. हे गणितआपल्याला 12.5 ट्रिलियन डॉलरपर्यंतसहज पोहोचवेल.

