आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:आयुष्याला सुकर करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे कठीण
एआयबाबत सुरू असलेल्या चर्चेत अनेक मोठी नावेसामील आहेत. आता हा गंभीर भू-राजकीय मुद्दा बनतचालला आहे. एआयच्या शर्यतीत आघाडीवर कोणराहणार, हा खरा प्रश्न आहे. या वर्षाच्या सुरुवातीलादिल्लीत एआय परिषद झाली. तरीही भारत अजून याशर्यतीत दिसत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.कारण गेल्या दोन दशकांत भारत माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रात जगाचा मोठा नेता बनला होता. एआयच्या शर्यतीत भारत मागे पडण्याचे मुख्य कारणम्हणजे यासाठी लागणारी अथांग गुंतवणूक. ही रक्कम अब्जावधी डॉलर्सच्या घरात असू शकते. यात सरकार व उद्योजक, दोघांच्या कल्पकतेची कमतरताही दिसूनआली. एआय किती मोठा बदल घडवून आणेल, हे भारतातील धोरणकर्त्यांना वेळेवर समजलेच नाही. ते आयटी क्षेत्रातील जुन्या यशातच समाधानी राहिले. संगणकाने आपले जीवन बदलले तसेच एआय सुद्धा आपल्या जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल.संगणकाचा विकास हळूहळू झाला होता. पण एआयअत्यंत वेगाने पुढे जात आहे. ‘जनरेटिव्ह आर्टिफिशिअलइंटेलिजन्स”चा जन्म 2022 च्या शेवटी चॅटजीपीटीच्याआगमनाने झाला. त्यामुळे लोकांसाठी हा विषय अजूनकेवळ चार वर्षांचा आहे. इतक्या कमी वेळात त्याचेशंभर कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते झाले. एआय तंत्रज्ञानविकणाऱ्या कंपन्या आज बातम्या, शेअर बाजार आणिलोकांच्या विचारांवर राज्य करत आहेत. एआय आपली कार्यक्षमता वाढवतो, हे खरे आहे. पणयामुळे मोठे नुकसानही होऊ शकते. ब्राऊनयुनिव्हर्सिटीत मी चालवत असलेल्या एका चर्चासत्रातहार्वर्ड केनेडी स्कूलचे राजकीय विचारवंत आर्कन फंगयांनी एआयच्या दुहेरी परिणामांचे सुंदर विश्लेषण केले.एआय माणसाला अधिक सक्षम करू शकतो. त्याचीजागा घेऊ शकतो आणि त्याला आपले गुलामही बनवूशकतो, असे ते म्हणाले. फंग म्हणाले, आता त्यांनासंशोधनासाठी सहाय्यक (रिसर्च असिस्टंट) ठेवण्याचीगरज भासत नाही. कारण एआय हे काम अतिशय सहजकरतो. माझ्या कामातही आता हेच घडताना दिसते.एआय हा अत्यंत हुशार संशोधक सहाय्यक सिद्ध होतआहे. याशिवाय एआय निबंध लिहू शकतो. प्रश्नपत्रिकातयार करू शकतो आणि गणिताची अवघड कोडीसोडवू शकतो. त्यामुळेच आता घरी नेऊन द्यायच्यापरीक्षांऐवजी, पूर्वीसारख्या वर्गात बसून हातानेलिहायच्या परीक्षा पुन्हा सुरू होत आहेत. योग्य सूचनादिल्यास एआय गाणे गाऊ शकतो आणि वाद्यही वाजवूशकतो, असे आता संगीतकारही सांगू लागले आहेत. हीसगळी उदाहरणे एआय माणसाची जागा कसा घेत आहे,हे दाखवणारी आहेत. पण माणसाला सक्षम बनवण्याच्याबाबतीत काय? संगणकाचे कोडिंग लिहिणे हे एआयचेमाणसाला सर्वात जास्त सक्षम करणारे काम मानले गेले .अर्थात, प्रत्येक जण कोडिंग लिहू शकत नाही किंवाप्रत्येकाला ते शिकावेसे वाटणार नाही. मग रोजचे आयुष्यसोपे करणारी एआयची काही उदाहरणे देता येतील का?फंग लिहितात की, एआयने लाखो लोकांना नवीन गोष्टीशिकण्यास आणि शोधण्यास सक्षम केले आहे.महत्त्वाच्या ई-मेलला उत्तरे देणे, दैनंदिन वेळापत्रकसांभाळणे, स्वयंपाक किंवा घराची देखभाल अधिकचांगल्या प्रकारे करणे, प्रवासाचे नियोजन करणे आणिअशाच अगणित कामांमध्ये एआयने माणसाला मदतकेली आहे. यावरून एआयमुळे सामान्य माणसाचेआयुष्य सोपे होत आहे, हे उघड आहे. आपले जीवन सोपे करण्याची एआयची ही क्षमतानाकारणे आता कठीण होईल. मध्यमवर्गीय घरात त्याचामोठा प्रभाव लवकरच दिसून येईल. पण माणसाची जागाघेणाऱ्या एआयचा सामना कसा करायचा, हा खराकठीण प्रश्न असेल. मोठ्या शहरांमधील डिलिव्हरीकरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम सहज धोक्यात येऊ शकते.एवढेच नाही तर माणसाची जागा घेण्याची एआयची हीक्षमता ग्रामीण भारतातील शेतीवरही मोठा परिणाम करूशकते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) एआयचा वापर कोणत्या पातळीपर्यंतकरायचा, हे ठरवण्यात सरकारची धोरणेमोठी भूमिका बजावू शकतात. शस्त्रास्त्रेआणि युद्धाच्या मैदानावरील निर्णयांमध्येएआयचा वापर किती प्रमाणात व्हावा, हेठरवण्याचा समावेशही यात होतो.
