पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:कोणताही संकल्प करण्यापूर्वी आधी मनावर नियंत्रण ठेवा
काही मोहिमांना अंतिम रेषा नसते. तिथे तुम्हाला धावावेही लागेलआणि वेळ आल्यावर उडीही मारावी लागेल. आजच्या काळातछोटी-मोठी कामे किंवा सामान्य यश फारसे महत्त्वाचे उरलेले नाही.नवीन पिढी काहीतरी वेगळे आणि अनोखे करण्यात पटाईत आहे.त्यांच्या तयारीत उत्साह आणि तत्परता नक्कीच आहे, पणसंकल्पशक्तीची कमतरता आहे. या संकल्पशक्तीशिवाय ते अर्ध्यारस्त्यातच थकतात. कोणताही संकल्प संकल्प सात्त्विक असायला हवा. अन्यथा तो हिंसेत रुपांतरित होऊ शकतो. संयम राखूनच संकल्प करा.संकल्प हा आत्मा, हृदय व बुद्धीचा विषय आहे. मन तर तो संकल्पमोडण्याचेच काम करते. तुम्ही सकाळी लवकर उठून फिरायलाजाण्याचा संकल्प केला. अलार्म लावला. दोन मोबाईल आहेत, ते दोन्हीमोबाईलमध्ये अलार्म लावतात. पण सकाळी तो अलार्म वाजतो, तेव्हातुमच्या आतून हात बाहेर काढून तो बंद करणारा आणि ‘आज नको,उद्यापासून जाऊया” असे समजावणारा तो कोण असतो? हे काममनाचेच असते.म्हणूनच संकल्प कराल, तेव्हा आधी मनावर नियंत्रणठेवा. मग तुमचा संकल्प शंभर टक्के यशस्वी होईल.
