October 15, 2026

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:स्वतःचे मूल्यांकन केल्याशिवाय स्तुती मनात उतरू देऊ नका

0
vin1j3_1790276114.jpg

आपल्या स्तुतीवरही टोल टॅक्स लावा. कारण जेव्हा आपली स्तुती होते आणि आपण ती सहज स्वीकारतो, तेव्हा ती अहंकार घेऊन येते. इथूनच स्तुती दुर्गुण बनते. आपली लोकप्रियता वाढते व लोक आपले कौतुक करतात, तेव्हा त्यांचे शब्द व आदर अधिक मोठे होत जातात. दुर्गुणाची सुरुवात इथूनच होते. आपण टोल नाक्यावर फास्टॅगची सोय ठेवतो किंवा रोख पैसे देतो. तसेच जीवनात जेव्हा स्तुती येते, तेव्हा आपण तिला थांबवले पाहिजे आणि पैसे मागितले पाहिजेत. आता स्तुतीचे पैसे म्हणजेच काय? तर स्व-मूल्यांकन. स्वतःचे मूल्यांकन केल्याशिवाय स्तुतीला कधीही मनात उतरू देऊ नका. राजा दशरथांनी आपल्या दरबारात याचा एक प्रयोग केला होता. रामचरितमानसच्या अयोध्या कांडात भरदरबारात जेव्हा दशरथांची स्तुती होत होती, तेव्हा त्यांनी आरशात पाहिले. दरबारात आरसा पाहिला जात नाही. पण त्यांनी पाहिले आणि म्हणाले, जेव्हा माझा जयजयकार होतो, तेव्हा मी आरशात पाहून स्वतःचे मूल्यांकन केले. आपणही स्तुतीवर स्व-मूल्यांकनाचा टोल लावला पाहिजे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!