लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना
मुंबई
२४ मार्च
महाराष्ट्रामधील लोकसभेच्या जागा ४८ वरून ८० होणार?
विधानसभेच्या जागा २८८ वरून ३५० होणार?
सध्याची देशातील मतदारसंघ रचना ही १९७१ सालच्या जनगणनेनुसार झालेली आहे.
ही मुदत २०२६ पर्यंत होती. आता २०२६ साली ही मुदत संपत असल्यामुळे मतदार संघ पुनर्रचना नव्याने करण्यात येणार आहे.
नव्याने करण्यात येणारी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना ही आता २०११ सालच्या जनगणनेनुसार करण्यात येणार आहे.!
१९७१ साली देशाची लोकसंख्या ५४ कोटी होती की आता १४० कोटी झालेली आहे. त्यामुळे देशाच्या लोकसभा सदस्य संख्या ही ५४३ वरून ८०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.!
१९७१ साली महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ५ कोटी होती. ती आता १२ कोटी झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा सदस्य खासदार यांची संख्या ४८ वरून ८० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभा सदस्य खासदार २ आहेत. यांची संख्या ३ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा सदस्यांची आमदार संख्या सध्या १० आहे. ही संख्या ११ किंवा १२ होण्याची शक्यता आहे.
नव्याने होणार असणाऱ्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये उत्तर भारतामध्ये लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. तर दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या जागा कमी होणार आहेत.
या नवीन मतदारसंघ पुनर्रचनेचा सर्वाधिक फायदा हा उत्तर भारतीयांना होणार आहे.
✍️ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
