April 8, 2026

चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.! :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
20260320_195105

भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या अनेक काळया करारनाम्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना अखेर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज दिल्याचे खात्रीदायक वृत्त आहे.
दिवसागणित भोंदूबाबा कॅप्टन खरात यांचे अनेक आर्थिक गैरव्यवहार आणि कारणामे समोर येत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पद्धतीने वापर करून घेत आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा श्रद्धाळू अंधश्रद्धाळू लोक आणि त्यांचा गैरफायदा घेणारे ढोंगीबाबा यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
आतापर्यंत या तथाकथीत भोंदूबाबाचे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत आहेत.
महाराष्ट्राचे गृह मंत्रालय या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज दिलेल्या आदेशावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोड मध्ये आलेले दिसत आहेत.
!! महाराष्ट्र न्यूज नेटवर्क!!
तुकाराम खोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *