नंदितेश निलय यांचा कॉलम:चॅम्पियन माइंडसेट म्हणजे काय? आयुष्यात योग्य तत्त्वांसह जिंकायला हवे
कोणत्याही क्षेत्रात चॅम्पियन नक्कीच बनता येते. पणरोल मॉडेल म्हणून टिकून राहण्यासाठी काळ तुमचेमूल्यमापन जीवनमूल्यांच्या आधारावर करते. रोल मॉडेलबनणे म्हणजे कुटुंबाकडे परत वळून आपल्याजीवनमूल्यांची आठवण ठेवणे आणि ती जपणे, याशीतुम्हीही सहमत असालच. हे अधिक समजून घेण्यासाठीआपल्याला मिरका फेडरर यांचे एक भाषण समजूनघेतले पाहिजे. त्यांनी 29 ऑगस्ट 2026 रोजी हॉल ऑफफेममध्ये समाविष्ट होण्यासाठी पती, टेनिसचे दिग्गजरॉजर फेडरर यांची ओळख करून देताना दिले होते. मिरका म्हणाल्या, “माझा विश्वास ठेवा, मी त्यांचीमेहनत, तासन्तास केलेला सराव, त्यांचे अनुशासनआणि समर्पण पाहिले आहे. हे सर्व इतके सोपे वाटते, त्यागोष्टी मी जवळून पाहिले आहे. त्यांचे हजारांहून अधिकसामने पाहिल्यानंतरही मी नेहमी थक्क व्हायचे. पण याखेळाडूमागचा माणूस कमाल आहे. त्यांचे आई-वडीलत्यांना एक लाडका मुलगा म्हणून ओळखतात. त्यांचीबहीण त्यांना एक उत्तम भाऊ मानते. त्यांचे मित्र त्यांनाअशा व्यक्तीच्या रूपात ओळखतात, ज्यांच्याकडेकितीही व्यग्रता असली तरी मित्रांसाठी नेहमी वेळअसतो. हे गुण काही अचानक आले नाहीत. त्यांनी यागोष्टी आई-वडिलांकडून शिकल्या. आई-वडिलांनीत्यांना नम्रता, कृतज्ञता, दयाळूपणा शिकवला. सर्वांशीसमान आदराने वागण्याची शिकवण दिली.’ पुढे त्याम्हणाल्या, “जगाला रॉजर फेडरर कोण आहेत हेसमजण्यापूर्वीच, रॉबी, लिनेट यांनी (रोजर यांचेआई-वडील) मला एक व्यक्ती दिली. तिचे मी अधिककौतुक करते : माझा सोबती रॉजर, मित्र रॉजर आणिसरतेशेवटी एक पती व बाबा रॉजर. सध्याच्या काळातसर्व काही विस्कळीत होत आहे. माणूस म्हणून जगणेअनावश्यक , ओझे वाटू लागले आहे. तेथे कुटुंबात एकत्रराहणे आणि आई-वडिलांना समजून घेणे कठीण आहे..अशा काळात स्वित्झर्लंडचे हिरो रॉजर फेडरर यांच्याकौटुंबिक मुळांची भक्कम पकड पाहणे सुखावणारे आहे.खरा चॅम्पियन हा आधी आणि शेवटपर्यंत एक चांगलामाणूसच असतो, हा विश्वास यामुळे अधिक दृढ होतो.दुसरीकडे, रॉजर फेडररसुद्धा हे मान्य करतो की मिरकानसत्या तर ते इतके चिंतामुक्त होऊन प्रदीर्घ काळ टेनिसखेळू शकले नसते. रॉजरचे ‘रॉजर फेडरर” होण्यातत्यांच्या कुटुंबाचीच मोठी भूमिका राहिली. ज्युनिअरखेळाडू असताना ते रागवायचे किंवा रॅकेट फेकायचे,तेव्हाही त्यांचे आई-वडील त्यांना शांत राहून खेळाचाआदर करायला शिकवायचे. त्यांच्याच शब्दांत सांगायचेतर, “आज मी जो काही आहे, तो माझ्याआई-वडिलांच्या बिनशर्त प्रेम, पाठिंब्यामुळेच आहे.”टेनिसमधील रॉजर फेडरर यांच्याप्रमाणेच क्रिकेट मधीलदंतकथा सचिन तेंडुलकरनेही नुकत्याच झालेल्या शिक्षकदिनानिमित्त वडिलांच्या आठवणीत एका फेलोशिपचीघोषणा केली. या प्रसंगी तो बरेच काही सांगून गेला. त्याचेवडील त्याला नेहमी आठवण करून द्यायचे की, अपयशठीक आहे. पण शॉर्टकट योग्य नाही. खेळात किंवा कुठेहीफसवणूक करणे चुकीचे आहे. लोक तुमचे शतकांचेविक्रम विसरून जातील, पण तुम्ही किती चांगले माणूसहोतात आणि समाजासाठी काय केले, हेच नेहमी लक्षातठेवले जाईल. थोडक्यात सांगायचे तर कुटुंबातहीमानवतेचे चॅम्पियन असतात. तेच खरे खरे चॅम्पियनआणि रोल मॉडेल बनतात. रॉजर असोत वा सचिन यांनाम्हणूनच जग चॅम्पियन आणि रोल मॉडेल म्हणून लक्षातठेवते. दुसरीकडे ते कुटुंबाने शिकवलेली जीवनमूल्येकधीही विसरत नाहीत. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यशआणि प्रसिद्धी जेव्हा डोक्यात जाते. तेव्हा कृतज्ञता,साधेपणा, नम्रता आणि चांगुलपणा आपल्या वर्तनातटिकवून ठेवणे सोपे नसते. सतत एक चांगला माणूस बनूनराहणे, हाच खऱ्या अर्थाने चॅम्पियन माइंडसेट आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
