सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:ट्रम्प – जिनपिंग यांच्या भेटीत खूप काही पणाला लागलेय
शी जिनपिंग यांचा अमेरिका दौरा ही जगाच्यामुत्सद्देगिरीच्या मंचावरील मोठी घटना आहे. ट्रम्प स्वतःत्यांचे वैयक्तिक स्वागतासाठी पोहोचू शकतात. ही एकदुर्मिळ गोष्ट असेल. परंतु रेड कार्पेट, व्हाईटहाऊसमधील रात्रीचे जेवण आणि नियोजनबद्ध हस्तआंदोलनामागे एक विचित्र विरोधाभास दडला आहे.एकमेकांसोबतच्या स्पर्धेत खोलवर अडकलेल्या दोनमहासत्ता इथे दिसतात. देशांतर्गत दबाव व विखुरलेलीजागतिक व्यवस्था यांच्यातून मार्ग काढत स्थिरतेचाकेवळ एक बाह्य बुरखा पांघरण्याचा प्रयत्न करत आहेत.ही शिखर परिषद आंतरराष्ट्रीय भू-राजकारणाच्या एका निर्णायक वळणावर होत आहे. त्यामुळे यात खूप काही पणाला लागले आहे. आजचे जागतिक चित्र सहकार्याने नाही, तर गटांमधील ध्रुवीकरणाने ठरत आहे हीच वस्तुस्थिती आहे. काही आठवड्यांपूर्वी पार पडलेली ब्रिक्स परिषद व त्यापूर्वीच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकांमध्ये चीनने आपली भूमिका मांडली होती. लष्करी आघाड्यांशिवाय पुढे जाण्याचा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला होता. तसेचअमेरिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. परंतुमहासत्तांमधील सहकार्याचा अभाव जगभरातीलसंघर्षांना धोकादायकपणे अनियंत्रित सोडत आहे, हेहीतितकेच खरे आहे. ट्रम्प प्रशासन इराणमधील महागड्यालढाईत आणि होर्मुजमधील सततच्या अडथळ्यांमध्येअडकले आहे. ही भू-राजकीय दलदल आहे. त्याने ट्रम्पयांची लोकप्रियतेची रेटिंग खूप खाली आणली आहे.तेहरानवर आर्थिक दबाव आणण्याची क्षमता चीनकडेआहे, असे अमेरिकेला वाटते. पण चीनने स्वतःच्याहितसंबंधांची किंमत मोजून कोणाच्याही मार्गातअडथळा आणण्याची इच्छा दाखवलेली नाही. उलटनिर्बंधांवर मात करत त्यांनी इराणसोबतचे आपले व्यापारीसंबंध सतत मजबूत ठेवले आहेत. ट्रम्प आणि जिनपिंगयांच्या भेटीचा मुख्य उद्देश देवाणघेवाणीवर आधारितव्यापार हाच आहे. 10 नोव्हेंबरची मुदत आता जवळ येतआहे. अमेरिका-चीन टॅरिफ ‘युद्धविरामा”ची मुदत यादिवशी संपत आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथेझालेल्या कराराने चिनी वस्तूंवरील अमेरिकन आयातकर 20 टक्क्यांवर मर्यादित ठेवण्यात यश मिळवले होते.यामुळे संभाव्य आर्थिक तबाही टळली. दोन्ही बाजूंच्याशुल्कांच्या स्पर्धेमुळे टॅरिफ तीन आकड्यांपर्यंतपोहोचण्याचा धोका निर्माण झाला होता. परिषदेपूर्वीच न्यूयॉर्कमध्ये या संदर्भातील पायाभरणी झाली आहे. कमीटॅरिफच्या कक्षेत आणता येऊ शकणाऱ्या गैर-रणनीतिकउपभोग्य वस्तूंची ओळख पटवली जात आहे. परंतु याबदल्यात ट्रम्प चीनकडून अमेरिकन कृषी उत्पादनांचीमोठी खरेदी आणि 500 बोईंग विमानांच्या खरेदीचीमागणी करत आहेत. एआय आणि महत्त्वाचे खनिजेहेसुद्धा संघर्षाचे मुख्य मुद्दे आहेत. एआयची शर्यतजिंकेल तोच विजेता ठरेल, हे ट्रम्प यांनी सांगितले आहे.दुर्मिळ धातू आणि महत्त्वाच्या खनिजांवरील चीनचीमक्तेदारी मोडून काढण्यासाठी अमेरिका आक्रमक प्रयत्नकरत आहे. या भेटीचा आणखी एक पैलू म्हणजे दोन्हीनेत्यांची शारीरिक क्षमता. 12 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतआयोजित ब्रिक्सच्या एका महत्त्वाच्या रात्रीच्याजेवणाला शी जिनपिंग उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतरत्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांना उधाण आले होते.मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या अफवा फेटाळूनलावल्या. नंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शीकोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या विमानात चढतानादिसले. 80 वर्षांच्या ट्रम्प यांच्या आरोग्याबाबतही नेहमीचर्चा सुरू असते. ट्रम्प यांच्या प्रदीर्घ काळ कामकरण्याच्या क्षमतेवर अनेक मतदारांनी नुकत्याचझालेल्या सर्वेक्षणांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत. वॉशिंग्टन परिषदेचे मुख्य प्राधान्य कोणताही मोठाभू-राजकीय करार करणे हे नाही. दोन्ही देशांमधीलअनिश्चित परिस्थिती सांभाळणे हाच यामागचा खरा हेतूआहे. परस्परांतील संबंध पूर्णपणे बिघडणेआर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरेल, हे जिनपिंग आणिट्रम्प दोघेही जाणून आहेत. आजच्या विभागलेल्याजागतिक व्यवस्थेत, योग्य प्रकारे सांभाळलेला असा पेचहीच कदाचित या दोन महासत्तांमधील शांततेची सर्वातजवळीक साधणारी स्थिती असू शकते.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. वॉशिंग्टन परिषदेचे मुख्य प्राधान्यकोणताही मोठा भू-राजकीय करार करणेहे नाही. दोन्ही देशांमधील अनिश्चितपरिस्थिती सांभाळणे हाच खरा हेतू आहे.परस्परांतील संबंध पूर्ण बिघडणेआर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरेल, हेजिनपिंग, ट्रम्प चांगले जाणून आहेत.
