नवनीत गुर्जर यांचा कॉलम:स्वअस्तित्वाच्या आचेत स्वतःला मळणारी ती…
वो रोटी बेलती है जैसे पृथ्वी
जैसे ज्वालामुखी बेलते हैं पहाड़
जैसे भूचाल बेलते हैं घर
सन्नाटे शब्द बेलते हैं, भाटे समंदर।
रोज सुबह सूरज में एक नई उचकन लगाकर
एक नई धाह फेंककर।
वो रोटी बेलती है जैसे पृथ्वी।
पृथ्वी जो खुद लोई है, सूरज के हाथों में
रख दी गई है पूरी की पूरी सामने
कि लो, इसे बेलो, पकाओ
जैसे मधुमक्खियां पकाती हैं शहद
अपने पंखों की छांह में…।
तब भी, जब सारा शहर सो चुका हो!
धुल चुके हों सारे बरतन
बुझ चुकी हो आखिरी चूल्हे की राख भी
…और वो? अपने ही वजूद की आंच के आगे
औचक हड़बड़ी में, खुद को ही सानती
खुद को ही गूंधती बार-बार
खुश है कि रोटी बेलती है जैसे पृथ्वी…!
महिला आज खूप पुढे गेल्या आहेत. अगदी प्रत्येक क्षेत्रात!पुरुषी मक्तेदारी किंवा वर्चस्व मानले जायचे तिथेहीस्त्रियांनी मजल मारली आहे. पण काळ आजही या महिलांच्या वाटेत अडथळा बनून उभा आहे.
याच महिन्यात दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार, दुसऱ्या एका मुलीची हत्या आणि जमुईमध्ये तरुणीची छेडछाड व मारहाण… या घटनाअंगावर काटा आणणाऱ्या आहेत.
एका चिमुकलीवर अत्याचार होत आहेत अन् तोअत्याचार होत असताना तिची किंकाळी ऐकून मनहेलावणे, मदतीला धावणे तर लांबच, उलट त्या किंकाळ्यांचा व्हिडिओ बनवत राहणे! अशी विकृतीशेवटी कुठून आणि कशी येत असेल?
हे खरे आहे, संपूर्ण पुरुष समाज असा नाही. फक्त काही नरभक्षक आणि अत्याचार करणारेच हे असले कृत्य करत आहेत. त्यांना कोणत्याही समाजाची वा सरकारची भीती उरलेली नाही. कसल्याही शिक्षेचा धाक उरलेला नाही. जंगलातील चित्त्यांपेक्षाही हे अधिक हिंस्र आहेत.काळाच्या तुलनेत यांची नखे अधिक तीक्ष्ण झाली आहेत. त्यांची ही भुकेली राक्षसी वृत्ती शेवटी कधी शांत होणार?
हे राक्षस अजून किती दिवस अन् किती रात्री अशाचप्रकारे गिळंकृत करणार आहेत? कुणीतरी कधीतरी हे समजून घ्यायला हवे, की महिला आज आपल्यातीलहिरवाई स्वतःच्याच रक्ताने फुलवत आहेत. कोणत्याहीबाहेरील हवेचे किंवा पावसाचे जराही उपकार त्यांच्यावरनाहीत. त्या वाटेल तेव्हा बहरू शकतात. वाटेल तेव्हा खूपमोठ्या, प्रचंड मोठ्या होऊ शकतात. पण काय करणार!त्यांची शारीरिक रचनाच अशी आहे की, आत एकनाजूक, सुंदर वेल वाढत असते. खूप मोठे वादळआल्यावर ही वेल एखाद्या मजबूत झाडाला बिलगू पाहते.या एका गोष्टीशिवाय ती प्रत्येक बाबतीत मजबूत आहे.निर्भय आहे. बेधडकही आहे. मानले की ती जन्माने हरिणीआहे, पण आता तिला वाघीण बनायचे आहे.
तर मग बनू द्या ना! या अत्याचारी पुरुषांना यात नक्कीअडचण काय आहे? खरे तर महिलांवरीलअत्याचारांसाठी फक्त सरकार जबाबदार नाही. सरकारनेकडक कायदे केल्यास काही प्रमाणात या गोष्टींवर आळाबसू शकतो. पण सरकारे कोणत्याही पक्षाची असोत,त्यांचा स्वभाव एकसारखाच असतो. निवडणुकाजिंकणाऱ्या घोषणांना देश किंवा राज्याबद्दलचे कर्तव्यसांगून राज्य करणे, एवढाच त्यांचा उद्देश राहिला आहे.असो, प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकाचौकांत सरकारतर असू शकत नाही. पण अशा घटनांवर आपले ओठशिवून घेणाऱ्या समाजाचे काय करायचे? हे ओठ नसूनजणू तुरुंगाचे बंद दरवाजेच आहेत. आधी समाजालाचभानावर यावे लागेल, समजून घ्यावे लागेल. कित्येकवेदनादायी किंकाळ्या ऐकूनही हा समाज जागा होत नाही,किंवा गाढ झोपल्याचे सोंग करत राहतो! आपल्या मुलांनासुरुवातीपासूनच महिला व इतरांचा आदर करण्याचेशिक्षण कसे द्यावे. त्यांना सत्याचा मार्ग कसा दाखवायचा?चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून कसे रोखायचे? हेहीसमजून घ्यावे लागेल की, दगडांवर हातोडा मारला तरत्यातून रक्त वाहत नाही, पण वेदना तर त्यांनाही होतचअसतील ना! आपण तर शेवटी माणसे आहोत.
किती वेदना व्हायला हव्यात? पण का होत नाहीत?
अखेर हे अत्याचारी पुरुष नक्की काय खाऊन मोठे झालेअसतील? त्यांच्या मनात निर्दयतेचा एवढा मोठा साठाकसा जमा झाला आहे? या जोरावर आजच्या युगातही तेमहिलांना, मुलींना केवळ एक वस्तू समजत आहेत?त्यांच्यावर अत्याचार करत आहेत, त्यांना लुटत आहेत!
अखेर का? का?…
आणि का? त्या समाजाचे काय करायचे?प्रत्येक गल्लीबोळात आणि चौकाचौकांतसरकार तर उपस्थित राहू शकत नाही. पणअशा घटनांवर ओठ शिवून घेणाऱ्यासमाजाचे काय करायचे? हे ओठ नसूनतुरुंगाचे बंद दरवाजेच आहेत! आधी यासमाजालाच सावरावे लागेल, सांभाळावेलागेल. कित्येक वेदनादायी किंकाळ्याऐकूनही हा समाज जागा होत नाही किंवागाढ झोपल्याचे नाटक करतो.एक सुंदर कविता आहे-
