New Global Map Controversy; India Border Issues & United Nations
19 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

4 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने जगाच्या नव्या नकाशालामंजुरी दिली. यासाठी झालेल्या मतदानात 164 देशांनीशिक्कामोर्तब केले. सहा देश मतदानापासून दूर राहिले, तरअमेरिकेने याच्या विरोधात मतदान केले. भारतानेही यानकाशाच्या बाजूने मतदान केले, पण आता असे समोर येतआहे की, या नकाशामध्ये भारतीय राष्ट्र-राज्याच्यासीमारेषांशी छेडछाड करण्यात आली आहे. आसामलालागून असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या दक्षिणेकडीलसीमेला ‘चिनी रेषा’ म्हणून दाखवण्यात आले आहे आणिनागालँड-आसाम यांच्यातील रेषाच गायब आहे.दुसरीकडे तिबेटला भारतीय रेषेत दाखवण्यात आले आहे. चीननेही या नकाशाला मंजुरी दिली आहे. भारताचे म्हणणे आहे की, ते ‘समान-विश्व’ या भावनेसोबत आहेत आणियाच अनुषंगाने नकाशाला पाठिंबा दिला आहे, पण हा वाद सांगतो की, जगाचा नकाशा बनवणे सोपे काम नाही.
तसेही पृथ्वी गोल आहे आणि ती रेषाविरहित आहे. खरे तर आतापर्यंत जगाचा जो नकाशा चलनात होता, तोसोळाव्या शतकात गेरार्डस मर्केटर या नकाशाकारानेसमुद्री प्रवासाला डोळ्यांसमोर ठेवून बनवला होता. यानकाशात आफ्रिका एक-तृतीयांश लहान आहे. युरोप,उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड मोठे दाखवले आहेत, तरआग्नेय आशियातील देशांनाही त्यांच्या मूळ आकाराच्यातुलनेत खूपच कमी जागा मिळाली आहे. आफ्रिकेत हानकाशा बदलण्यासाठी आंदोलन झाले आणि शेवटीसंयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मतदानाद्वारे नवीन नकाशामंजूर केला. हा नवीन नकाशा 2018 मध्ये ‘नॉर्थ अमेरिकनकार्टोग्राफिक इन्फॉर्मेशन सोसायटी’च्या परिषदेत सादरकेलेला “इक्वल अर्थ मॅप” (समान पृथ्वीचा नकाशा)आहे. यामध्ये युरोप पूर्वीच्या तुलनेत आकुंचन पावलेलादिसतो, ब्राझील फुगलेला दिसतो आणि ग्रीनलँड जणूहरवूनच गेला आहे. आफ्रिकेला मात्र यात पूर्ण प्रतिनिधित्वमिळाले आहे. कागदावर छापलेला आणि आपल्या मनातघर करून बसलेला ‘अॅटलस’ही फार जुना नाही. आपणजर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या नकाशाशी आजच्यानकाशाची तुलना केली, तर जगातील ताकदवर देश कुठेगायब झाले आणि कोणते नवीन देश नकाशावर उभेराहिले, हे पाहून आपण थक्क होऊ. विसाव्या शतकाच्यासुरुवातीच्या 15 वर्षांच्या नकाशात सोव्हिएत युनियनचामागमूसही नव्हता. जो नंतर अचानक जगातील मोठीमहासत्ता बनला आणि शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंतलुप्तही झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या चारदशकांपर्यंत पाकिस्तान अस्तित्वात नव्हता आणि सातदशकांपर्यंत बांगलादेश नव्हता. विसाव्या शतकाच्यासुरुवातीला जो भारत होता, त्याच्या सीमा इराणलाभिडलेल्या होत्या. म्हणजेच, ज्या सीमा आपण अगदीकायमस्वरूपी मानतो, जणू काही त्या संस्कृतीच्याउदयापासूनच चालत आल्या आहेत, त्या खरे तरविकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील राजकीयउलथापालथीचा परिणाम आहेत. संस्कृती या देशांच्याराजकीय नकाशांपेक्षा मोठ्या आणि जुन्या असतात.मानवी हिताचे विषयही त्या राजकारणापेक्षा मोठे असतात,जे राजकारण अनेकदा आपल्या स्वार्थासाठी विविधओळख वापरते आणि त्यांना आपापसात लढवते- मग तेदेश असोत वा धर्म असोत.
नवीन नकाशा मुळे मर्केटरचा नकाशा पुसला जाणार नाही,आणि जुने पृथ्वीगोलही (ग्लोब) फोडले जाणार नाहीत.जहाजांच्या ये-जा करण्यासाठी ते अजूनही उपयुक्तआहेत. पण संयुक्त राष्ट्र जगभरातील सरकारे, शाळाआणि आंतरराष्ट्रीय संस्थांना असे आवाहन करणार आहेकी, जेव्हाही ते ठिकाणांची तुलना करतील तेव्हा ती नव्यानकाशानुसार करावी. म्हणजेच आता जगाकडेपाहण्यासाठी आपल्याकडे दोन चष्मे असतील. जेआपल्याला याची आठवण करून देत राहतील की, हेजगही एकेरी नाही आणि आपली दृष्टीही एकेरी असू नये.पण आपल्याला या नकाशामध्ये आपला भाग सुरक्षितआणि स्वीकृत हवा आहे, यात कोणताही वाद नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
जगाचा नकाशा सतत बदलत राहिला आहे.कागदावर बनलेला आणि आपल्या डोक्यातकोरला गेलेला ‘अॅटलस’ही खूप जुना नाही.आपण जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्यानकाशाची आजच्या नकाशाशी तुलना केली, तरआपण थक्क होऊ.

