नवनीत गुर्जर यांचा कॉलम:निवडणुकीची धामधूम आणि आपण
उत्तर प्रदेश आणि पंजाब ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत.येथे निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष यानिवडणुकांसाठी कंबर कसून कामाला लागले आहेत.नवनवीन जबाबदाऱ्या तयार केल्या जात आहेत आणिनवीन प्रभारी नेमले जात आहेत. सर्व बाजूंनी आणि पूर्णताकदीने तयारी सुरू आहे. कुणी बिनधास्त बसले असेल,एखादा काहीही तयारी करत नसेल, तर ते आपण आहोत.सामान्य माणसे! सर्वसामान्य मतदार! कारण आपल्याला कुणी काहीही म्हणो—अन्नदाता,जनता जनार्दन किंवा आणखी काही—पण सत्य हेचआहे की, दर दोन, अडीच किंवा पाच वर्षांनी होणाऱ्या यानिवडणुकांचे आपण मालक नाही. आपण आपल्यामनाला स्वातंत्र्य दिले आहे, ते फक्त एवढेच की आपणस्वतःसाठी पिंजरा निवडू शकतो. शेवटी राहायचे तरकैदेतच आहे. देशात विविध प्रकारचे कैदखाने आहेत…
विविध प्रकारच्या कैद्यांच्या अवस्थाही.
मुले वजनदार दप्तराच्या ओझ्याखाली शिक्षणात बंदिस्तआहेत. मुली स्वतःच्या सुरक्षिततेच्या भीतीपोटीस्वतःमध्येच सुरक्षित राहण्यास भाग पडल्या आहेत.महिला, वृद्धांच्या बंधनांना तर सीमाच उरलेली नाही.तथाकथित सुसंस्कृत समाज या बंदिस्तपणाला घर,ऑफिस, गल्ली, शेत, शिवार, रस्ता आणि बाजारपेठअशी नावे देतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या कैदेत अडकला आहे, तेव्हा कसले स्वातंत्र्य, कसली लोकशाही आणि कसली निवडणूक? या पक्षांना, या नेत्यांना खरोखरच निवडणूक जिंकायची असेल, तर त्यांनी आधी स्वत:लाया कैदेतून मुक्त करावे. मग त्यांनी राज्य करावे. अगदी चहुकडे. एकतर्फी. मग कोणत्याही नेत्याला मतासाठी गयावया करावी लागणार नाही. लोक स्वतःच आपला तारणहार निवडून देतील. इंग्रज निघून गेल्यानंतर आज विविध बंदिवास दिसतात. त्यातील बहुतांश राजकीय व्यवस्थेनेच उभारले आहेत. आणि यात आपल्यालानवल वाटण्याचेही काही कारण नाही. कारण प्रत्येक बंदिवासाचे उद्घाटन होत असताना आपणच मोठ्या उत्साहाने टाळ्या वाजवल्या आहेत.
सुसंस्कृत समाज म्हटला जाणारा हा मोठा तुरुंग तरआपण स्वतःच तयार केला आहे. जुनाट विचारांच्याचुकीच्या प्रथांच्या अनेक शाखा आपण उघडल्या आहेत. त्यात आपले बालपण, तारुण्य आणि म्हातारपणअडकले आहे. निवडणुकीच्या वेळीही ही बंधने काम करतात. जातीयवादाची कैद ही सर्वात मोठी वदीर्घकालीन आहे. त्यानंतर गाव, शहर, पंचायत, सरपंच,पाटील व नातेवाईक यांचा प्रांतवाद वेगळेच तुरुंग तयारकरतो. निवडणुकीच्या काळात ही बंधने कानठळ्याबसवतात. हिवाळ्याच्या दिवसांत दातांमध्ये फणी धरूनफुंकर मारल्यावर एक प्रकारचा विस्कळीत, बारीक आणिनुकत्याच वयात येणाऱ्या मुलांसारखा तुटक आवाजयेतो, अगदी तसाच. मतदान करताना हे आवाज आणखीमोठे होतात. आपण ही बंधने, या साखळ्या तोडून मतदानकरणार नाही तोपर्यंत अशीच सरकारे येत राहतील.बेफिकीर आणि आळशी. लोकप्रतिनिधी असेच राहतील.हव्यास असलेले आणि टोळीबाज. खरे तर, आपल्यालाया बेड्यांची, या कैदेची सवय झाली आहे. सरकार भ्रष्टनसेल तर काम लवकर होणार नाही असे आपल्यालावाटते. व्यवस्था नीट झाली तर काम पक्के होणार नाहीअसे आपल्याला वाटते. आणि लोकप्रतिनिधी हव्यासअसलेला किंवा टोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो. मत विकून चांगल्यासरकारचे स्वप्न पाहणाऱ्या मानसिकतेतून आपल्यालाबाहेर पडावेच लागेल. अन्यथा आपण असेच भरडलेजाऊ. व्यवस्था अशीच चालत राहील आणि सरकारेअशीच येत-जात राहतील—घोटाळे करत, सत्य दाबूनटाकत, प्रामाणिकपणाला बाजूला फेकत आणि जनतेलावाऱ्यावर सोडून देणारी. आपली अवस्था आज आहेतशीच राहील. विजेच्या बोर्डावर लावलेल्या जुन्या,गंजलेल्या आणि पानाच्या डागांसारख्या दिसणाऱ्या फ्यूजप्लेटसारखी. औषधांच्या बाटल्यांवर एक अंतिम मुदतलिहिलेली असते. औषध घेताना बहुतेक लोक तीचतारीख पाहतात. ती मुदत संपली की औषध निरुपयोगीठरते. कधीकधी तर ते विषारीही बनते. ‘आप” नवीनआला होता, तेव्हा त्यांना पाहून काही अंशी वाटले होतेकी, जुन्या पक्षांची मुदत आता संपली आहे. पण तसे होऊशकले नाही. जुने पक्ष अधिक घट्ट रोवले गेले. वाढत गेलेव त्यांच्या भक्कम पकडीने ‘आप”ची पार दाणादाणउडवून दिली. वास्तविक, राजकारण हे नात्यांचा,भावनांचा आणि मानवी मूल्यांचा अनादर केला जातोअशी संस्कृती आहे. या शब्दांची जाणीवही ठेवली जातनाही. एकंदरीत, ही संस्कृती म्हणजेच भावनाशून्यतेचेप्रतीक आहे. …आणि भावना नसतात तिथेअपमानाशिवाय दुसरे काहीही उरत नाही. आपल्याला या बेड्यांची ,या कैदेची सवय झालीयेखरे तर, आपण या बेड्यांचे व कैदेचे सवयझालेले लोक आहोत. सरकार भ्रष्ट नसेलतर काम लवकर होणार नाही , व्यवस्थानीट झाली तर काम होणार नाही असेवाटते. लोकप्रतिनिधी हावरट किंवाटोळीबाज नसेल तर तो बावळट किंवाकमकुवत आहे असे आपण मानतो.
