डॉ. नरेश त्रेहान यांचा कॉलम:हृदयविकार पूर्वसूचना न देता दीर्घकाळ लपलेला असू शकतो
हार्ट अटॅकला अचानक घडणारी अनपेक्षित घटनामानले जाते. पण यामागे नेहमीच एक पार्श्वभूमी असते. तीअनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेविना दीर्घकाळ लपलेलीअसू शकते. कोरोनरी आर्टरी डिसीज ही एक संथ आणिशांत प्रक्रिया आहे. लक्षणे दिसण्याच्या कित्येक वर्षे किंवादशके आधीपासून ती शरीरात विकसित होत असते.जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात ही स्थितीअधिक स्पष्टपणे दिसून येते. जगभरात‘कार्डिओव्हॅस्कुलर’ आजारांमुळे (हृदय वरक्तवाहिन्यांचे आजार) होणाऱ्या मृत्यूंपैकी 20% मृत्यू भारतात होतात. भारतीयांमध्ये पाश्चिमात्य लोकांच्यातुलनेत जवळपास एक दशक आधीच हे आजारविकसित होतात. कमी वयात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतआहे. वास्तव हे आहे की, बहुतांश लोक या धोक्याचीजाणीव नसतानाही या आजारांसोबत जगत आहेत. आजकाल आपण 30 वर्षांच्या तरुणांमध्येही हार्टअटॅकचे प्रमाण पाहत आहोत. 2000 ते 2024 याकाळातील आरोग्यविषयक डेटाचे विश्लेषण केल्यास एक गोष्ट समोर येते. त्यानुसार, शहरी भागातील सुमारे 12%भारतीय कोणत्या ना कोणत्या कार्डिओव्हॅस्कुलरआजाराने ग्रस्त होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या 2022च्या अहवालात हार्ट अटॅकमुळे 32 हजारांहून अधिकमृत्यूंची नोंद झाली. ही आकडेवारी दरवर्षी 12 टक्क्यांहूनअधिक वाढ दर्शवते. भारतीय पुरुषांमध्ये होणाऱ्या हार्टअटॅकपैकी सुमारे 25% घटना 40 वर्षांच्या आधीचघडतात. तर, वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत हा आकडा 50टक्क्यांपर्यंत पोहोचतो. हृदयाच्या आजारांची प्रकरणे वेळेवर का ओळखतायेत नाहीत? याचे कारण आपल्या शरीराच्या मूळरक्तवाहिन्यांच्या रचनेत दडलेले आहे. एथेरोस्क्लेरोसिसम्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे. यामुळे त्याहळूहळू अरुंद होतात. या प्रक्रियेत स्वतःहून कोणत्याहीवेदना होत नाहीत. कारण, रक्तवाहिन्यांमध्ये वेदनाजाणवून देणारे रिसेप्टर्स नसतातच. या प्रक्रियेतील तीनसर्वात मोठे घटक म्हणजे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचीसमस्या आणि मधुमेह. या तिन्ही समस्या शरीरात अत्यंतशांतपणे काम करतात. एखादी व्यक्ती धोकादायकपातळीवर वाढलेला रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉल घेऊनहीअनेक वर्षे जगू शकते. तरीही तिला एकदम सामान्य वाटूशकते. जेव्हा रक्तवाहिनी खूप जास्त ब्लॉक होते, तेव्हाचसाधारणपणे लक्षणे दिसतात. पण तोपर्यंत आजार खूपवाढलेला असतो. छातीत दुखणे, प्लाक रेप्चर, धाप लागणेकिंवा थकवा येणे अशा लक्षणांची वाट पाहणे चुकीचेआहे. ही वाट पाहणे म्हणजेच शरीराची यंत्रणा निकामीहोण्याची वाट पाहण्यासारखे आहे. भारतात कमी वयातच हृदयविकार वेगाने वाढत आहेत.हे लक्षात घेता, या आजाराच्या धोक्याचे परीक्षण 30-35व्या वर्षी किंवा त्याआधीच व्हायला हवे. परदेशाप्रमाणेपारंपरिक पद्धतीने 40-45 वर्षांनंतर ते करणे योग्य नाही.विशेषतः वयाची 30 वर्षे ओलांडल्यावर ‘बेसिक लिपिडप्रोफाइल’, ब्लड प्रेशर आणि ब्लड ग्लुकोजची तपासणीकरणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या नियमितआरोग्य तपासणीचा हा भाग असला पाहिजे. ज्यालोकांच्या कुटुंबात हृदयविकार, मधुमेह किंवा इतरधोक्यांचा इतिहास आहे, त्यांनी ‘इमेजिंग’ आधारिततपासण्या कराव्यात. यामुळे कोणताही मोठा आजार समोरयेण्याच्या आधीच रक्तवाहिन्यांमधील प्लाक शोधता येतो. नोकरी देणाऱ्या कंपन्यांनीही वार्षिक ‘कार्डिॲक रिस्कस्क्रीनिंग’ला कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेइतकेचगांभीर्याने घेतले पाहिजे. विमा कंपन्यांनाही प्रोत्साहन दिलेपाहिजे. त्यांनी आजार झाल्यानंतर उपचाराचा खर्चउचलण्यापेक्षा प्रतिबंधात्मक तपासण्यांनाही विमाकवचद्यावे. कारण, आजाराचे लवकर निदान होणे हा नेहमीचअधिक किफायतशीर मार्ग आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतीयांमध्ये हृदयविकार पाश्चिमात्यदेशांतील लोकांच्या तुलनेत एक दशकआधीच विकसित होतो. कमी वयातहार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. अनेकलोक या धोक्यापासून अनभिज्ञ असूनहीया आजारांसोबत जगत असण्याचीशक्यता आहे.
