October 16, 2026

Yellow Color Spiritual Personality Significance

0
balraj-sanghai_1792050487.jpg

6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सर्व शक्तीपीठ असलेल्या देवी मातेच्या नवरात्र उत्सवामध्ये पिवळ्या रंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, जो आनंद, सकारात्मक ऊर्जा, ज्ञान आणि चैतन्याचे प्रतीक मानला जातो.

शारदीय नवरात्र उत्सवात पिवळा रंग हा पाचव्या दिवशी (स्कंदमाता) किंवा काही परंपरांनुसार दुसऱ्या किंवा पहिल्या दिवशी देवीला अर्पण केला जातो. स्कंदमाता ही आईच्या वात्सल्याचे , शुद्ध प्रेमाचे आणि करुणेचे प्रतीक मानली जाते.

अध्यात्मिक कार्यात तसेच हिंदू धर्मातील सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये पिवळी फुले पिवळे वस्त्र यांचे मोठे महत्त्व आहे.

धार्मिक पूजाविधी मध्ये पूजेमध्ये झेंडूची, शेवंतीची पिवळी फुले, पिवळी वस्त्रे आणि हळदीचा वापर शुभ मानला जातो, जो समृद्धी आणि शुभता आणतो. भारतभर होणारे विजयादशमी किंवा दसरा पूजन हे तर संपूर्णपणे झेंडूच्या पिवळ्या फुलांशिवाय होतच नाही.

हा पिवळा रंग ज्ञान, अभ्यास, एकाग्रता आणि मानसिक विकासाचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग बुद्धी कुशाग्र करण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतो. हा रंग सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे उर्जा, उत्साह आणि मनाला प्रसन्नता देणारा असाच असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनानुसार पिवळा रंग ज्यांना आवडतो त्या व्यक्ती तीक्ष्ण, तल्लख अशा असामान्य बुद्धिमत्तेच्या असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा विशेष असते. तसेच ते परिश्रम करणारे आणि प्रामाणिक असतात. पिवळा रंग हा संपन्न व्यक्तिमत्व दर्शवतो. पिवळ्या रंगाची विशेष आवड असणाऱ्या व्यक्ती अध्यात्मात व आत्म साधने मध्ये सतत प्रभावाने पुढे जाणाऱ्या असतात.

(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

(संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!