पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मानसिक आरोग्यावर घालापडल्यास नातेसंबंध जपा
आजकाल मानसिक आरोग्याबाबत खूप चिंता व्यक्त केली जाते. तीव्हायलाच हवी. आपल्या देशात आता लहान मुलांमध्येही मानसिकआजाराची लक्षणे दिसतात. अशा वेळी एक प्रयोग करून पाहूया.कुटुंबात जास्त विश्वसनीयता आणि एकजुटीची भावना असेल,तितकेच सदस्यांचे मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपल्या कुटुंबात‘श्रीमंती” असो वा नसो, आपण कुटुंबातील ‘महानता” शोधलीपाहिजे. आपल्या आयुष्यात सहा नाती महत्वाची असतात. त्याबद्दलआपण एकनिष्ठ व विश्वासू राहावे. आई, वडील, भाऊ, बहीण,जोडीदार व मित्र. या लोकांमध्ये सर्वोत्तम काय आहे ते शोधा आणित्यांच्याशी घट्ट जोडलेले राहा. या सहा नात्यांत एक नाते वेगळे आहे,आणि ते म्हणजे—बहीण! इतर नात्यांच्या तुलनेत तुम्ही तुमच्याबहिणीसोबत सर्वाधिक मोकळेपणाने राहू शकता, हे तुमच्या लक्षातयेईल. बहिणीचे नाते आयुष्याला एक वेगळीच गोडी देते. मानसिकआरोग्य धोक्यात असल्यास भाऊ-बहिणीच्या नात्यावर चांगल्याप्रकारे काम करा. तुमचे मानसिक आरोग्य आपोआप उत्तम होईल.
