नंदितेश निलय यांचा कॉलम:वयाच्या 85 व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याचे मोल वेगळेच असते
नोबेल पुरस्कारांची घोषणा होताच एक सकारात्मकऊर्जा आपल्याभोवती दाटून येते, असे तुम्हालाही वाटतेका? मला तरी नक्कीच तसे वाटते. आणि तसे का वाटू नयेबरे! रील्सच्या दुनियेत हरवून गेलेल्या जगाला साहित्याच्यापुरस्काराची चाहूल लागते, तेव्हा त्याचे लक्ष तिकडे वेधलेजाते. डिजिटल साधनांच्या आधाराशिवायही माणूसमानवी संवेदना अनुभवू शकतो, असा विश्वास त्यातूनजागा होतो. असो, आज चर्चा करूया शांततेच्यापुरस्काराची. होय, शांततेचा पुरस्कार! कारण आज जगात व्यक्ती,नेतृत्व किंवा संस्था असे कुणीही उरलेले नाही, जे या ड्रोन,क्षेपणास्त्रे आणि विद्वेषाने भरलेल्या मनांपर्यंत शांततेचाआवाज जागतिक स्तरावर पोहोचवू शकेल. पण नोबेल तेनोबेलच! त्याला ना वाढते वय दिसले, ना जात, धर्म, वर्ण,लिंग किंवा एखाद्या देशाची लष्करी व आर्थिक ताकद. यासमितीने यंदा शांततेच्या पुरस्कारासाठी भारतीय तमिळवंशाच्या 85 वर्षांच्या एका दक्षिण आफ्रिकी महिलेची निवडकेली.आपल्या देशात 85 वर्षांचे असणे म्हणजे काय, याचाविचार करा. आपल्या आजूबाजूचे लोक या वयातपोहोचलेल्या व्यक्तीला कसा वागवतात? पण त्या आहेतनवी पिल्लई! वर्णभेदविरोधी कैद्यांचा बचाव करण्यापासूनतर जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय न्यायालये आणिमानवाधिकार संस्थांमध्ये त्यांनी काम केले आहे. वय, वर्णकिंवा गरिबी यांपैकी कशालाही त्यांनी आपल्या मार्गातअडथळा ठरू दिले नाही. तसेच त्यांचे कर्तृत्वओळखण्यापासून नोबेल समितीलाही कुणी रोखू शकलेनाही. 19४1 मध्ये डर्बनच्या क्लेअरवूड येथील एका गरीबतमिळ कुटुंबात जन्मलेल्या नवी पिल्लई या वर्णद्वेषाच्यावातावरणात वाढल्या. हार्वर्डमधून कायद्यात डॉक्टरेटमिळवणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आफ्रिकी व्यक्ती ठरल्या.तरीही कोणतीही कायदेविषयक फर्म त्यांना नोकरी देण्यासतयार नव्हती. कारण गोऱ्या महिला सेक्रेटरींना कोणत्याहीकृष्णवर्णीय महिलेकडून सूचना घेणे मान्य नव्हते. मग त्यांनीस्वतःची वकिली सुरू केली. नतालमध्ये अशी प्रॅक्टिस सुरूकरणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या. त्यांनी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यांची बाजू मांडली.नजरकैदेतील लोकांवर होणारे अत्याचार आणिएकांतवासातील छळाच्या घटना त्यांनी चव्हाट्यावरआणल्या. त्यांनी लढवलेला एक खटला जिंकल्यामुळेरॉबेन बेटावरील राजकीय कैद्यांना कायद्याच्या पुस्तकांचाआधार मिळाला; ज्या कैद्यांमध्ये नेल्सन मंडेला यांचाहीसमावेश होता. नॉर्वेजियन नोबेल समितीने आवर्जून नमूदकेले की, वाढती युद्धे आणि ‘सत्यापेक्षा ताकदीला महत्त्व’देण्याच्या आजच्या प्रवृत्तीत हा पुरस्कार एक गोष्टअधोरेखित करतो-ती म्हणजे, खरी व शाश्वत शांतता हीकेवळ ताकदीवर नव्हे, तर कायदेशीर तत्त्वांवर आणिजबाबदारीवरच टिकून राहते. नवी पिल्लई यांचे भारताशी घट्ट नाते आहे. त्यांच्यावडिलांचे कुटुंब मूळचे तमिळनाडूतील दिंडीगुलजिल्ह्यातील वथलागुंडू येथील होते. 1890 च्या दशकातत्यांचे आजी-आजोबा मद्रास प्रेसिडेन्सीमधून नतालमधीलउसाच्या मळ्यात काम करण्यासाठी करारबद्ध मजूर म्हणूनगेले होते. या खडतर संघर्षात त्यांच्या आजोबांचे पायहीगेले. त्यांचे वडील बसचालक होते, पण त्यांनी मुलांप्रमाणेचमुलींच्या शिक्षणावरही भर दिला. वडिलांच्या निधनानंतरत्यांनी तमिळनाडूत जाऊन आपल्या हयात असलेल्यानातेवाइकांचा शोध घेतला. त्याचबरोबर त्यांनी द्वेष आणियुद्धात हरवून गेलेल्या त्या शांततेचाही सातत्याने शोधघेतला, ज्या शांततेची आज जगाला सर्वात जास्त गरजआहे. शांततेची भाषा करणारे प्रत्येक नेतृत्व आज नवीपिल्लई यांच्या सोबतीने या नोबेल पुरस्काराचे तेज नक्कीचअनुभवू शकते! (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
