विराग गुप्ता यांचा कॉलम:मस्क यांना आपल्या अंतराळ आणि इंटरनेट नेटवर्कमध्ये रस का आहे?
जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कयांच्यासाठी नफा हाच सर्वोच्च प्राधान्याचा विषयअसल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनप्रचारकी कथन पसरवण्याबरोबरच निवडणूक निधी देऊनसरकारी धोरणे बदलण्यातही ते कुशल आहेत.सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यास्टारलिंक प्रकल्पाचा परवाना मिळवण्यासाठी मस्क यांनीमोदी आणि अंबानी यांच्यावर टोमणे मारले. भारतातीलब्रॉडबँड आणि फिक्स्ड-लाइन इंटरनेट बाजारपेठेवररिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांचे 80 टक्केवर्चस्व आहे. यासंदर्भातील सहा पैलू समजून घेऊया : 1. लॉकडाऊनचा काळ कोट्यवधी लोकांसाठीआपत्ती, गरिबी आणि बेरोजगारीचा काळ होता. मात्र,त्याच काळात मस्क यांच्या संपत्तीत 10 पटीने वाढ झाली. 2020 या कोविडच्या वर्षातच सरकार आणि कायद्यालाफारसे महत्त्व न देता मस्क यांच्या कंपनीने 2021 मध्ये परवान्याशिवायच भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना हा प्रयत्न थांबवावा लागला. मात्र, या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. 2. सर्वोच्च न्यायालयाच्या 2012 च्या निर्णयानुसार,राष्ट्रीय संपत्ती असलेल्या स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाच्याआधारे झाले पाहिजे. मात्र, 2023 च्या दूरसंचारकायद्यामुळे सॅटेलाइट इंटरनेटसाठी लिलावाऐवजीप्रशासकीय आदेशाद्वारे स्पेक्ट्रमचे वाटप करण्याचा मार्गमोकळा झाला. एअरटेलच्या वनवेबला एप्रिल 2022 मध्ये,जिओला डिसेंबर 2022 मध्ये, तर स्टारलिंकला जून 2025मध्ये अधिकृत मान्यता मिळाली. मात्र, सुरक्षा मंजुरीमिळाल्यानंतरच त्यांना अंतिम परवाना मिळू शकेल. मगमस्क भेदभावाचा आरोप कसा करू शकतात? 3. पृथ्वीच्या निम्न कक्षेत कार्यरत असलेल्या सॅटेलाइटसेवांवर नियंत्रण ठेवणे हा एक मोठा मुद्दा आहे. संसदीयसमितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांच्या मते, 2013-14मध्ये मनमोहन सिंग सरकारने सॅटेलाइट-आधारित इंटरनेटसेवांशी संबंधित धोक्यांबाबत सावध केले होते. माजीराष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, इस्रो आणिलष्कराने गुगलच्या थ्री-डी व्ह्यूमुळे सुरक्षेला मोठा धोकानिर्माण होऊ शकतो, असे सांगितले होते. मात्र, पुढे केंद्रसरकारने त्याला परवानगी दिली.
4. क्रिप्टो, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सेंटर्सआणि सॅटेलाइट इंटरनेट हे व्यवसाय यशस्वी करण्यासाठीमस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर (एक्स) विकत घेतले.मस्क यांचे ग्रोक एआय प्लॅटफॉर्म बेकायदेशीरपणेएक्सच्या कोट्यवधी वापरकर्त्यांच्या डेटाचा व्यावसायिकवापर करत आहे. नियमांनुसार एक्सने तक्रार निवारणअधिकाऱ्याची माहितीही जाहीर केलेली नाही. अशापरिस्थितीत सॅटेलाइट इंटरनेटसारख्या सामरिक क्षेत्रातडेटा स्थानिकीकरण आणि इतर नियमांचे पालन केलेजाईल, अशी अपेक्षा कशी ठेवता येईल?
5. मस्क हे काही परोपकारी नाहीत; उलट ते पक्केव्यावसायिक व्यक्ती आहेत. भारतात लाच देणे आणिलॉबिंग करणे बेकायदेशीर आहे. मात्र मस्क उघडपणेलॉबिंग करतात. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला 60 कोटीडॉलरपेक्षा अधिक निवडणूक निधी देणाऱ्या मस्क यांनीकर वाचवण्यासाठी आपल्या कंपनीचे मुख्यालय टेक्सासराज्यात हलवले होते. कॅपिटल गेन टॅक्स, विथहोल्डिंगटॅक्स आणि लाभांशावरील कर वाचवण्यासाठीच मस्कयांनी नेदरलँड्समधील करसवलतीच्या व्यवस्थेच्यामाध्यमातून भारतात गुंतवणुकीची योजना आखली आहे.
6. इराण व युक्रेनमधील युद्धांबरोबरच बांगलादेशच्यासीमेलगत असलेल्या राज्यांतही स्टारलिंकची भूमिकासंशयास्पद राहिली आहे. 11 हजार दुर्गम गावांना इंटरनेटपुरवण्याच्या नावाखाली स्टारलिंक भारताच्या अंतराळआणि इंटरनेट नेटवर्कवर कब्जा करू पाहत आहे. भारतीयउद्योगपतींच्या मक्तेदारीबाबत मस्क यांच्या आरोपांवरभारतात कायद्यानुसार ठोस कारवाई झाली पाहिजे. गृहआणि संरक्षण मंत्रालयाच्या आक्षेपांकडे तसेच गुप्तचरयंत्रणांच्या सतर्कतेकडे दुर्लक्ष करून सॅटेलाइट इंटरनेटलापरवानगी दिल्यास सामरिक सुरक्षेला धोका निर्माण होऊशकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) 11 हजार गावांना इंटरनेट देण्याच्यानावाखाली स्टारलिंक भारताच्या अंतराळआणि इंटरनेट नेटवर्कवर कब्जा करूपाहत आहे. गुप्तचर यंत्रणांच्यासतर्कतेकडे दुर्लक्ष करून सॅटेलाइटइंटरनेटला परवानगी देणे धोक्याचे आहे.
