पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:हनुमान चालिसा वाचल्यास ईश्वराची शरणागती मिळेल
भक्तीमध्ये शरणागतीला खूप महत्त्व आहे. हनुमान चालिसा हा याशरणागतीचाच सोपा मार्ग आहे. काकभुशुंडीजींनी श्रीरामांना म्हटलेहोते-“भगत कल्पतरु प्रनत हित कृपा सिंधु सुखधाम, सोइ निज भगतिमोहि प्रभु देहु दया करि राम.’ म्हणजे- भक्तांची इच्छा पूर्ण करणारे हेकल्पतरू, शरणागतांचे कल्याण करणारे, कृपासागर रामराया, दया कराआणि मला तुमची तीच भक्ती द्या. श्रीराम शरणागतांचे हित करणारेआहेत. श्रीरामांना शरण गेलेल्यांचे रक्षण होणारच. काही दिवसांपूर्वीविमानात स्मित मछर यांनी हनुमान चालीसेचे स्मरण केले, ते याचगोष्टीचे जिवंत प्रमाण आहे. हनुमान चालिसा वाचल्यास आपल्यालाईश्वराची शरणागती मिळते. एक नवे बळ मिळते. स्मित मछर यांनी जणू‘हवाई-हनुमाना”चाच अवतार घडवला. हनुमानजींचे हे रूप खरोखरचखूप वेगळे व अनोखे होते. म्हणूनच मुलांना हनुमान चालिसा शिकवा.जेणेकरून त्यांच्या आयुष्यात संकटे येतील, तेव्हा हनुमान चालिसाचेत्यांना साहाय्य मिळेल.
