October 15, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:मासिक सबस्क्रिप्शन खर्चाला लावा वेसण

0
ndjlrb_1791053947.jpg

नुकतीच माझ्या एका मित्राने बेडरूममधील लहान टीव्ही बदलण्याची योजना आखली. जुन्या टीव्हीच्या एक्स्चेंजमध्ये मिळणारे 1,000 रुपये घेण्याऐवजी त्याने तो टीव्ही आपल्या चालकाला देण्याची तयारी दर्शवली. मात्र, ‘साहेब, मी दरमहा 600 रुपयांचा केबलचा खर्च उचलू शकत नाही,’ असे सांगत चालकाने तो घेण्यास नकार दिला. या प्रकरणावरून आपण मनोरंजनाच्या सबस्क्रिप्शनवर नेमका किती खर्च करतो, हे जाणून घेण्यास मी प्रवृत्त झालो. विचारपूर्वक खर्च करणाऱ्या त्या चालकाच्या अगदी उलट वास्तव बँक ऑफ अमेरिका इन्स्टिट्यूटच्या एका अर्थतज्ज्ञाने समोर आणले. गेल्या महिन्यात 7 कोटी ग्राहक व लहान व्यावसायिक खात्यांमधील डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या खर्चाच्या आकडेवारीचे सर्वेक्षण केले. त्यात नव्या पिढीचा सबस्क्रिप्शनवर खर्च वाढत असल्याचे स्पष्ट झाले. अहवालानुसार, जुलै महिन्यात सबस्क्रिप्शनवरील खर्चात वार्षिक 7.7% वाढ झाली. हा दर दोन वर्षांतील क्रेडिट कार्ड खर्चाच्या वाढीपेक्षा 1.5% अधिक आहे. यामध्ये जेन-झीच्या सबस्क्रिप्शन खर्चात वेगाने वाढ नोंदवली गेली असून, ही वाढ वार्षिक 14% इतकी राहिली. भारतातील ओटीटी बाजारपेठेत जिओस्टारचे सर्वाधिक ग्राहक आहेत. यासाठी दरमहा 79 ते 299 रुपये, तर वार्षिक 499 ते 2,199 रुपये आकारले जातात. नेटफ्लिक्स दरमहा 149 ते 649 रुपये व ॲपल 99 रुपये आकारते. तसेच सोनी लिव 399 रुपये, झी5 199 रुपये व ॲमेझॉन प्राइम 299 रुपये घेते. सन नेक्स्ट, मनोरमा मॅक्स, ईटीव्ही विन यांसारखे प्रादेशिक प्लॅटफॉर्म व डिस्कव्हरी, हंगामा प्लेसारखे प्लॅटफॉर्मही उपलब्ध आहेत. यापैकी अर्धा डझन प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व जरी आपल्याकडे असेल, तरी दरमहा सबस्क्रिप्शनचा खर्च चार अंकांत पोहोचतो. ओटीटी येण्यापूर्वी चित्रपटगृहांवर आपण कधीही इतका खर्च केला नाही. त्यामुळे दर तीन महिन्यांनी बँक खात्याचे विवरण तपासा आणि छुपे ऑटो-डेबिट व्यवहार ओळखा. एका वेळी दोनपेक्षा अधिक मनोरंजन प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन कधीही घेऊ नका. मॅनेजमेंट टिप: दर महिन्याला 4 अंकांत जाणारा हा खर्च रोखण्यासाठी मानसिकता मालकीवरून वापराकडे वळवा. सबस्क्रिप्शन सेवांकडे वीज-पाणी बिलाप्रमाणे निश्चित खर्च म्हणून न पाहता, व्यावसायिक खर्चाप्रमाणे पाहा.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!