October 15, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपण समृद्धीची दुसरी बाजू पाहत आहोत का?

0
uc9agn_1790021684.jpg

गणेश चतुर्थीच्या आदल्या संध्याकाळी संपूर्ण गोव्यात घरांची साफसफाई सुरू होती, दिवे लावले जात होते आणि कुटुंबे बाप्पाच्या स्वागताची तयारी करत होती. तेव्हा पेडणेमधील (परनेम) कासारवर्णेच्या देऊळवाडा वॉर्डातील एका छोट्याशा घरात 65 वर्षांचे अशोक आजारी पडून होते. 20 चौरस मीटरचे हे छोटे घर त्यांच्या दोन विधवा बहिणींच्या मोठ्या घरांच्या मध्ये नंतर बांधण्यात आले होते. दोन्ही बहिणी महिन्याला मिळणाऱ्या दोन हजार रुपयांच्या सरकारी मदतीवर उदरनिर्वाह करत होत्या आणि आलटून-पालटून अशोकची काळजी घेत असत. एकेकाळी अशोक एका हॉटेलमध्ये काम करायचे. जे काही छोटे-मोठे काम मिळेल ते ते करत असत. पण दोन वर्षांपूर्वी त्यांचा एक पाय कापावा लागला. काम सुटले. त्यांचे आयुष्य एका चौकटीत अडकून पडले. कुबड्यांच्या आधाराने थोडे चालत ते बहिणींच्या घरी जात असत आणि ज्याला ते आपले घर म्हणायचे त्या जागी परत येत असत. जेव्हा मी त्यांची गोष्ट वाचली तेव्हा मी आतून हादरून गेलो. असे का झाले, ते पुढे वाचा. 13 सप्टेंबर रोजी अशोक गंभीर आजारी पडले. मोफत 108 रुग्णवाहिकेतून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात आणण्यात आले, जिथे त्यांना ‘ब्रॉट डेड’ घोषित करण्यात आले. सरकारसाठी त्यांचा मृत्यू केवळ एक आकडा होता. पण दोन्ही बहिणींसाठी हा त्यांच्या छोट्याशा कुटुंबातील शेवटच्या पुरुषाचा मृत्यू होता. गरीब लोकांवर पेडणेच्या नगरपालिका स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात, असे त्यांनी ऐकले होते. त्यामुळे त्यांना याची खात्री होती. दोघींनी पैसे गोळा करून एक वाहन भाड्याने घेतले आणि भावाचा मृतदेह तिथे नेला. त्या प्रवासाची कल्पना करा- एखाद्या सरकारी इमारतीत गरीब माणसाला शेवटचा निरोप देण्यासाठी नक्कीच जागा असेल, या आशेने दोन गरीब विधवा आपल्या भावाच्या मृतदेहासोबत बसल्या होत्या. त्या संध्याकाळी स्मशानभूमीत पोहोचल्या. ती जागा रिकामी होती. तिथे कुणीही कर्मचारी नव्हता आणि ज्याला काही विचारता येईल असेही कुणी नव्हते. आणि मग त्यांना समजले की त्यांच्याकडे काय नाहीये – जाळण्यासाठी लाकूड. त्यांच्याकडे लाकूड विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. अशोकचा मृतदेह परत नेण्याचा खर्चही त्या पेलू शकत नव्हत्या. आणि म्हणूनच, त्या रात्री दोन्ही बहिणींना असे काही करावे लागले, जे कोणत्याही बहिणीने कधीही करू नये. त्या भावाचा मृतदेह तिथेच सोडून निघून गेल्या. त्यांना त्याच्याबद्दल प्रेम नव्हते म्हणून नाही, तर कदाचित त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता म्हणून. त्या त्याच्याशिवाय घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना स्मशानभूमीत एक सडत असलेला मृतदेह सापडला. काही काळासाठी तो मृतदेह अज्ञात होता. पण पोलिस सब-इन्स्पेक्टर आदित्य गड यांनी शोध सुरूच ठेवला. अखेर ते 20 चौरस मीटरच्या त्या छोट्याशा घरापर्यंत पोहोचले, जे अशोकचे होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एकेकाळी त्यांच्याकडे नोकरी होती. एकेकाळी ते दोन्ही पायांवर चालायचे. ते अशा घरात राहायचे, जे त्यांच्या भावाने बांधले होते. त्यांचा भाऊ खाणीमध्ये ट्रक ड्रायव्हर होता आणि घर बांधल्यानंतर काही काळाने त्याचेही निधन झाले होते. त्यानंतर हे कुटुंब गरिबीत ढकलले गेले आणि आता अशोकही राहिले नाहीत. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम न करता अशोकचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. नातेवाइकांनी मिळून पैसे गोळा केले आणि या वेळी त्यांनी ती वस्तू विकत घेतली, जी अशोकचे कुटुंब विकत घेऊ शकले नव्हते – लाकूड. अखेर अशोकवर अंत्यसंस्कार झाले. पण मी त्या रात्रीचा विचार करत राहतो, जेव्हा दोन्ही बहिणी आपल्या भावाशिवाय घरी परतत होत्या. त्या नक्कीच अशा गोष्टीचा विचार करत असतील, ज्याचा हिशेब कोणत्याही कुटुंबाने कधीही लावू नये – एखाद्याला शेवटचा निरोप देण्यासाठी नेमका किती खर्च येतो? अशोकच्या बहिणींनी त्याला सोडले नव्हते, तर गरिबीनेच त्यांना आधी या अवस्थेत आणून सोडले होते. अशोकसारखेही लोक आहेत, ज्यांना आपल्याकडून खूपच थोड्या गोष्टीची अपेक्षा असते. घर नको, नोकरी नको, इतकेच काय, जेवणही नको. फक्त इतके लाकूड हवे असते की ते या जगातून सन्मानाने निरोप घेऊ शकतील. हे लिहिताना मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनकडे पाहू शकत नाहीये, कारण माझे डोळे पाणावले आहेत. फंडा असा आहे की, कोणताही समाज खऱ्या अर्थाने तोपर्यंत समृद्ध नाही, जोपर्यंत त्यातील सर्वात गरीब लोक सन्मानजनक शेवटचा निरोप देण्याचा खर्चही पेलू शकत नाहीत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!