पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:‘एआय’च्या युगात प्रत्येक कृतीमानवी मूल्यांशी जोडलेली असावी
समाजसेवेच्या जगात एक शब्द वापरला जातो, तो म्हणजे‘जनजागृती’. हे काम सर्वात आधी श्रीरामांनी केले. त्यांचा उद्देश केवळरावणाला संपवणे हा नव्हता. त्यांना लोकांना जागृत करायचे होते.लोकांना जागृत करणे म्हणजे, तुम्ही जे काही काम करत आहात, तेबरोबर आहे की चूक हे समजणे. जर तुम्ही निर्भय आणि निष्कामभावनेने काम केले, तर ही जनजागृती मानवी मूल्यांशी जोडली जाते.सध्या ‘एआय’ जनजागृतीची भूमिका बजावत आहे, पण ते मानवीमूल्यांशी जोडले जाऊ शकत नाही. हळूहळू स्वतःचे आत्मपरीक्षणकरण्याची प्रवृत्तीच नष्ट होईल. आपण जे केले तेच बरोबर आहे, असेलोक मानून चालतील. जास्तीत जास्त ते ‘एआय’कडून याची खात्रीकरून घेतील. जेव्हा एखादी व्यक्ती चोरी करते, तेव्हा आपण तिचीनिंदा करतो. पण ज्या गोष्टी त्याने चुकीच्या मार्गाने मिळवल्या आहेत,त्याच गोष्टी आता आपण प्रामाणिकपणे घेत असतो. पण या दोन्हींमध्येएक गोष्ट आहे, ती म्हणजे आसक्ती. चोराची बेइमानीमध्ये आसक्तीहोती, म्हणून तो चूक करून गेला. जर आपल्या प्रामाणिकपणातहीआसक्ती असेल, तर आपला प्रामाणिकपणाही बेइमानीत बदलेल.
