How to Break Hamster Wheel Life and Boost Productivity
1 तासापूर्वी
- कॉपी लिंक

मी त्यांना विचारले की, ‘तुम्ही कसे आहात?’ वर्माजी अत्यंत खिन्न अंदाजात म्हणाले की, ‘मला वाटते माझी ‘टू-डू-लिस्ट’ मी या जगातून गेल्यानंतरही संपणार नाही.’ त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची तक्रार केली, जे ऑफिसमध्ये त्यांचा वेळ खराब करण्यात मग्न असतात. त्यामुळे वर्माजी स्वतःला ओव्हरलोडेड समजायचे आणि नेहमी तणावात घरी परतायचे. ही 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबासोबत जो वेळ मिळायचा, तोही खराब व्हायचा. त्यांनी मला विचारले की काय करू? मी त्यांना एका ओळीचा सल्ला दिला- ‘एक ‘नॉट-टू-डू लिस्ट’ बनवायला सुरुवात करा.’ अत्यंत निरागसपणे वर्माजींनी विचारले की, ‘तुमचे म्हणणे आहे की जुन्या ‘टू-डू-लिस्ट’ सोबत मी ही नवीन लिस्टही सुरू ठेवू?’ त्यांच्या लहान मुलांसारख्या प्रश्नावर मी हसलो आणि म्हणालो, ‘तुम्ही ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफमध्ये अडकले आहात, त्यामुळे तुम्ही क्लॉडिया हॅमंडचे पुस्तक ‘ओव्हरव्हेल्म्ड: वेज टू टेक द प्रेशर ऑफ’ वाचले पाहिजे.’ ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफचा अर्थ अशी दिनचर्या, ज्यात तुम्ही रात्रंदिवस काम करता आणि अत्यंत व्यस्त राहता, पण प्रत्यक्षात कधीही ठोस प्रगती करू शकत नाही, नव्या दिशेने पुढे जाऊ शकत नाही. या रविवारी ते माझ्या घरी आले आणि त्या एका छोट्याशा टीपसाठी त्यांनी मला धन्यवाद दिले. ‘हॅमस्टर-व्हील’ लाईफचा अर्थ केवळ खूप जास्त काम करणे असा होत नाही. याचा अर्थ असा की, जी गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे, तिच्या जवळ न पोहोचता अनेक गोष्टी वारंवार करत राहणे. यातून बाहेर पडण्याचे काही व्यावहारिक मार्ग येथे दिले आहेत.
1. काम करणे थांबवा, निर्णय घेणे सुरू करा : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी असे एक काम ठरवा, जे दिवसाला खरोखरच प्रॉडक्टिव्ह बनवेल. बाकी सर्व सेकंडरी आहे. तुमची ‘टू-डू-लिस्ट’ तीन भागांत विभागलेली असली पाहिजे. ए. ‘डू इट’, म्हणजेच जे काम तुमच्याशिवाय इतर कोणीही करू शकत नाही. बी. ‘डेलिगेट इट’, यालाच ‘नॉट-टू-डू-लिस्ट’ म्हणतात. यात अनावश्यक मीटिंग, कॉल, स्क्रोलिंग, छोटी-मोटी कामे आणि जबाबदाऱ्यांचा समावेश करू शकता. सी. ‘डिलीट इट’ म्हणजेच अशी कामे जी सहकाऱ्यांना खूश करण्यासाठी केली जातात, पण इथे दिसतात. स्वतःला विचारा की ‘जर मी हे काम केले नाही तर काय होईल?’ जर उत्तर असेल, ‘काहीही नाही’, तर ते डिलीट करा. 2. कॅलेंडरमध्ये रिकामी जागा सोडा : पूर्णपणे भरलेले कॅलेंडर विचार करण्याची संधी सोडत नाही. दररोज थोडा अन-शेड्यूल वेळ ठेवा- ज्यामध्ये विचार करू शकाल, प्लॅन बनवू शकाल किंवा फक्त थोडा श्वास घेऊ शकाल. या भागात व्यग्रता नाही, तर परिणामांचे मोजमाप केले पाहिजे. ‘मी 10 तास काम केले’ ही स्वतःमध्येच उपलब्धी नाही, तर स्वतःला विचारा की मी 10 तास काम केले तर काय बदलले? प्रगती दिसली पाहिजे. 3. सोमवारची सुरुवात साप्ताहिक ‘एस्केप रिव्ह्यू’ने करा : सोमवारी 30 मिनिटे आधी पोहोचा, आपल्या डेस्कवर बसा आणि स्वतःला तीन प्रश्न विचारा. ए. गेल्या आठवड्यात कोणत्या गोष्टीने मला पुढे नेले? बी. कोणत्या गोष्टीने मला व्यस्त ठेवले? सी. या आठवड्यात मी काय करणे थांबवू शकतो? हे ‘हॅमस्टर-व्हील’ला तुमची डिफॉल्ट लाईफस्टाईल बनण्यापासून रोखेल. 4. भविष्यासाठी एक तास इन्व्हेस्ट करा : दररोज कोणत्याही अडथळ्याविना एक तास अशा गोष्टीवर लावा, ज्याचा फायदा वेळेसोबत वाढेल- शिकणे, लिहिणे, व्यायाम, नाती बनवणे, एखादे स्किल डेव्हलप करणे किंवा कमाईचा एखादा अतिरिक्त मार्ग बनवणे. ‘हॅमस्टर-व्हील’ आजचा दिवस चालवते, पण हा एक तास तुमचा उद्या बनवतो. ठरवा की तुम्हाला खरोखरच काय जास्त हवे आहे- वेळ, पैसा, आरोग्य, कुटुंब, स्वातंत्र्य, क्रिएटिव्हिटी की शांतता. मग असे कॅलेंडर बनवा, ज्यात ही चॉईस रिफ्लेक्ट होईल. फिजिकल प्रेझेन्स किंवा सतत काहीतरी करत राहण्याऐवजी परिणामांवर लक्ष केंद्रित करणेच शेवटी वास्तविक प्रोडक्टिव्हिटीला केवळ दिखाव्याच्या व्यस्ततेपासून वेगळे करते. लोक बहुधा स्वतःला खूप कामाच्या ओझ्याखाली दबलेले दाखवतात किंवा आपल्या हेवी शेड्यूलबद्दल सांगतात, जेणेकरून आपले स्टेटस टिकवून ठेवता येईल, स्किल गॅप्स लपवता येतील किंवा आगामी जबाबदारी टाळता येईल. जर तुम्ही नेहमी प्रमोशन मिळवणाऱ्या लोकांना पाहिले, तर त्यांच्यात इम्प्रेशन आणि इम्पॅक्ट वेगळे करण्याची क्षमता असते. वर्माजींनी दिवसाचे मूल्यांकन या आधारावर करणे सुरू केले की त्यांनी खरोखर काय प्रोड्यूस केले किंवा सोडवले, या आधारावर नाही की त्यांच्या कॅलेंडरमध्ये किती टास्क भरलेले होते.

मोबाईलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
फंडा असा आहे की, जेव्हा तुम्ही वर्कप्लेसवर इम्प्रेशन मॅनेजमेंटकडून इम्पॅक्ट मॅनेजमेंटकडे वळता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्याला केवळ ‘मेंटेन’ करण्याऐवजी त्याला ‘बदलण्याच्या’ मार्गावर चालायला सुरुवात करता. निवड तुमची आहे.

