एन. रघुरामन यांचा कॉलम:अचानक संपूर्ण जग मानवतेसाठी एआयच्या धोक्यांवर का बोलू लागलेय?
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आणि लॉस अँजेलिससारख्या मोठ्या शालेय जिल्ह्यांनी नुकतीच एक घोषणा केली. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी शाळेच्या उपकरणांवर जनरेटिव्ह एआय वापरू शकणार नाहीत, अशी बंदी त्यांनी घातली आहे. जगातील अत्यंत बुद्धिमान लोकांना एका गोष्टीची काळजी वाटत आहे. पुरेशा सुरक्षिततेशिवाय मुले चॅटजीपीटीसारख्या चार वर्षे जुन्या प्लॅटफॉर्मचा वापर उत्तरांसाठी शॉर्टकट म्हणून करू लागतील, अशी भीती त्यांना आहे. यामुळे शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जटिल बौद्धिक प्रक्रियांनाच मुले बगल देतील. खरे तर 2003 मध्ये मार्क झुकेरबर्गने ‘द फेसबुक’चे नाव नुकतेच ‘फेसबुक’ केले होते. एलॉन मस्क सेंटी-मिलियनेअर झाले नव्हते आणि सॅम ऑल्टमनने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सोडली नव्हती. निक बोस्ट्रॉम या ऑक्सफर्डच्या अत्यंत हुशार तत्त्वज्ञाने एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. त्याचे शीर्षक होते – ‘एथिकल इश्यूज इन ॲडव्हान्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स’. बोस्ट्रॉम यांनी त्या प्रदीर्घ संशोधनात एक अप्रत्यक्ष इशारा दिला होता. ‘आपण आपल्यापेक्षा खूप जास्त बुद्धिमान काहीतरी बनवतो, तेव्हा त्याचे ध्येय आपल्या ध्येयाशी जुळणारे असेल, याबद्दल आपण पूर्णपणे खात्री बाळगली पाहिजे.’ इथे ‘अलाइंड’ या शब्दावर लक्ष देणे गरजेचे आहे. सिलिकॉन व्हॅलीतील सर्वोत्तम मेंदू तज्ज्ञांनी एजीआय तयार केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एजीआय माणसाचे कोणतेही बौद्धिक काम करू शकते. हे मॉडेल मानवी लेखनाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. शतकानुशतके माणसांना गोंधळात टाकणाऱ्या गणिताच्या सोडवणुकीपुरते हे मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी ‘आरएसआय’ विकसित केले आहे का? आता हे ‘आरएसआय’ काय आहे? याचा अर्थ आहे – रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट (सतत स्वतःमध्ये सुधारणा करणे). तज्ज्ञांनुसार कोणत्याही कॉम्प्युटरकडे स्वतःचे एजीआय आले की तो मानवी बुद्धिमत्तेचा वापर कमी करतो. प्रोग्रामर्सऐवजी तो स्वतःची पुढची आवृत्ती डिझाइन करण्यासाठी एजीआयचा वापर करतो. मग ती नवीन आवृत्ती स्वतःची पुढची आवृत्ती तयार करते. हुशार लोकांना काळजी आहे की, उशिरा का होईना, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एक मोठा स्फोट नक्कीच होईल. त्यानंतर आपण माणसे त्यांच्यासाठी तसेच बनू. मुले आपल्यासाठी असतात तसेच. आता काही लोकांना वाटू शकते की, आपण एआयला मानवाला न मारण्याची किंवा आपल्यासमोर मुलांसारखे राहण्याची अट घालू शकत नाही का? जगभरातील प्रोग्रामर्स सध्या याच कल्पनेवर काम करत आहेत. ते या प्रक्रियेला विचारसरणीशी जुळवून घेणे. हेच निक बोस्ट्रॉम यांनी 23 वर्षांपूर्वी लिहिले होते. एआय सुरक्षेचे संशोधक एलिएझर युडकोव्स्की आणि नेट सोरेस यांचे 2025 मध्ये ‘इफ एव्हरीवन बिल्ड्स इट, एव्हरीवन डाइज’ हे पुस्तक आले. हे पुस्तक हाच इशारा देते. माणसापेक्षा कितीतरी पट अधिक हुशार असणाऱ्या ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ मशीन्स बनवण्याचे काय धोके आहेत, हे ती सांगते. पुस्तकीत तीन मुख्य भाग :
1. आधुनिक एआय प्रणाली मोठ्या प्रमाणावर डेटा आणि संगणकीय शक्ती वापरून तयार केल्या जातात. माणूस इनपुट्स तर व्यवस्थित सेट करतो, पण त्यातून मिळणारे आऊटपुट किंवा अचानक समोर येणारे वर्तन पूर्णपणे समजत नाही. लेखकांनुसार सुपर-इंटेलिजेंट एआय मानवी मूल्ये स्वीकारणार नाही. बहुधा ते स्वतःची वेगळी ध्येये विकसित करेल. मानवी अस्तित्वाच्या विरोधात असेल.
2. हे पुस्तक विनाशाच्या मार्गाचा आराखडा मांडते. एखादे यंत्र माणसांपेक्षा जास्त हुशार झाले, तर नियंत्रण गमावू. सुपर-इंटेलिजेंट सिस्टिमसोबतचा संघर्ष पूर्णपणे एकांगी असेल. परिणामी मानवी प्रजातीचा वेगाने विनाशात होईल.
3. जग या धोक्यासाठी पूर्णपणे तयार नाही. कंपन्या आणि देश प्रगत मॉडेल्स बनवण्याच्या शर्यतीत लागलेले आहेत. युडकोव्स्की आणि सोरेस यांनी उशीर होण्यापूर्वी फ्रंटियर एआयचा विकास त्वरित थांबवला पाहिजे. फंडा हा आहे की, थोडक्यात काय तर, मशीन इंटेलिजन्सचा कोणताही स्फोट मानवी मूल्यांशी आणि ध्येयांशी सुसंगत असणे गरजेचे आहे. अन्यथा तो संपूर्ण मानवजातीसाठी निश्चितच मोठा धोका बनेल. याच कारणामुळे अचानक संपूर्ण जगाचे लक्ष एआय मशीन्सकडे गेले आहे.
