बोरिया मजुमदार यांचा कॉलम:क्रिकेटमधील स्वतःच्या दुर्दशेस पाकिस्तान स्वत:च जबाबदार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्येचपाकिस्तानने घाईघाईत असा काही निर्णय घेतला कीविचारूच नका. त्यांनी सात खेळाडूंना माघारी धाडलेआणि प्रशिक्षकांना हटवले. जणू ते खेळाडूंना धडाशिकवण्याचा एक वस्तुपाठच घालून देऊ इच्छित होते.आता बाबर आझम ऑन-रेकॉर्ड सांगतो की, त्याला यानिर्णयांची काही माहितीच नव्हती. मग शेवटी पीसीबीनेया खेळाडूंना घरी पाठवून कसला आदर्श समोरठेवायचा होता? अपमान, गैरवर्तनाचा? आणि त्यांच्याकृतीने पाकिस्तानच्या इतर खेळाडूंना काय संदेश जातो? खेळाडू आणि प्रशिक्षकांवर तर कुऱ्हाड कोसळत आहे,पण अधिकाऱ्यांचे काय? त्यांच्याबद्दल एक शब्दही का बोलला जात नाही? ते जबाबदार का नाहीत? त्यांच्यावर कोणी एक प्रश्नही विचारणार नाही. ते काही घडलेचनाही अशा आविर्भावात काम करत राहतील, हे कसेशक्य आहे? सत्य हेच आहे की खेळाडू हे सोपे लक्ष्यआणि केवळ मोहरे आहेत. पीसीबी त्यांच्याशी अनादराने वागून सहजरित्या सुटू शकते. आणि ते सत्तेच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना आव्हान देण्याची हिंमत कोणीकरणार नाही. पाकिस्तानातील क्रिकेट आणि तिथले क्रीडाविश्व हे क्रीडा प्रशासनाची सूत्रे सांभाळणाऱ्या राजकीय वर्गाच्या अहंकाराचा बळी ठरले आहे.खेळाडूंनीही या मालिकेत चांगली कामगिरी केलेलीनाही हे खरे आहे. पण तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये बसून हेऐकत असाल की क्रिकेट बोर्ड सामना व मालिकेवरबहिष्कार टाकण्याची धमकी देत आहे, तर तुम्हीकोणत्या मानसिक स्थितीत खेळ सुरू ठेवाल? तुम्हीस्वतःच्या खेळावर लक्ष कसे केंद्रित करू शकाल?सलमान आगाचेच उदाहरण घ्या. त्याला पहिल्याकसोटीत ऐनवेळी कर्णधारपद सांभाळायला सांगितलेगेले आणि दुसऱ्या कसोटीत थेट संघातून बाहेर काढलेगेले. आता तिसऱ्या कसोटीपूर्वी त्याला घरी रवाना केलेआहे. हे अतिशय हास्यास्पद आहे. तुम्ही इंग्लंडमधीलएका कसोटी सामन्याच्या आधारे एखाद्या खेळाडूचेमूल्यांकन कसे करू शकता? तेही शेवटच्या क्षणीत्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवलीगेली होती तेव्हा हे घडले. पाकिस्तानमध्ये खूपकाळापासून हेच चालू राहिले आहे. खूप काळापासूनखेळाडू आणि समालोचक गप्प राहिले. शेवटी आताआपल्याला प्रभावी व्यक्ती आवाज उठवताना दिसतात.माजी खेळाडूंना आता बोलावेच लागेल, कारण शेवटीनुकसान फक्त खेळाचेच होत आहे. खेळाडूंना परतपाठवले गेले आहे. ते अपमानित होऊन घरी परततात.त्यांचे भविष्य अनिश्चित दिसते. इंग्लंडमध्ये खेळणाऱ्याखेळाडूंना तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायलावेळच मिळालेला नाही. अशा स्थितीत संघमानसिकदृष्ट्या पार खचून जाणे स्वाभाविक आहे.
आणि मोठी गोष्ट ही आहे की, या सर्व घटनांनापाकिस्तानच्या ‘फेल्ड-स्टेट” असण्याशी जोडले जाऊशकते. खेळ हे त्याचे केवळ आणखी एक रूप आहे.सर्वत्र परिस्थिती भयानक आहे. आशेचा किरण ठरेलअसा एकही खेळाडू उरलेला नाही. तिथे प्रत्येक गोष्टीवरराजकारण हावी झाले आहे. प्रत्येक स्तरावरील हस्तक्षेपआणि नियंत्रणाने पाकिस्तानच्या खेळाची पार वाटलावली आहे. क्रिकेट संघ हे या गोष्टीचे केवळ एकउदाहरण आहे की असा राजकीय हस्तक्षेप काय करूशकतो. सर्व खेळाडूंना दोषी ठरवले जाते. पण खरेचत्यांची चूक आहे का? पाकिस्तानच्या या अधोगतीचीसर्व जबाबदारी त्यांच्यावर ढकलून बाकीच्या गोष्टींवरपडदा टाकला जाऊ शकतो का? एक मोठा प्रश्न आहे.आज पाकिस्तानात खेळामध्ये सतत हस्तक्षेप करणाऱ्याराजकारण्यांवर किती लोक बोट दाखवतील? यापुढाऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेटला या अवस्थेत आणूनसोडले. ही एका संपूर्ण व्यवस्थेची निष्फळता आहे. हीसंपूर्ण यंत्रणाच मोडून पडली आहे. ही एक अशी निष्प्राणराज्य-व्यवस्था आहे. तेथे खेळाला काहीच महत्त्वउरलेले नाही. लॉर्ड्सवर पाकिस्तानी संघाने केलेलेशरणागतीचे प्रदर्शन आणि हॉकीमधील त्यांची झालेलीदुर्दशा यामागचे कारण हेच आहे. सध्या तरी एक देशम्हणून पाकिस्तानची हीच कहाणी आहे आणि यातलवकरच काही बदल होईल असे संकेत देणारीकोणतीच गोष्ट दिसत नाही. तोपर्यंत क्रीडाप्रेमी वखेळाडू मोठ्या राजकीय अहंकाराचे बळी ठरतील. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
पाकिस्तानमध्ये सर्वत्र परिस्थितीभयानक आहे. सर्वच गोष्टींवरराजकारणाचे वर्चस्व आहे. प्रत्येकस्तरावरील हस्तक्षेप व नियंत्रणानेपाकिस्तानच्या खेळाची पार वाट लावलीआहे. क्रिकेट संघ हे या गोष्टीचे केवळएक उदाहरण आहे की खेळातील असाराजकीय हस्तक्षेप काय करू शकतो.
