August 30, 2026

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा.

0
file_0000000036b08207bf62c2184d0c064b

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरती आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अशोकराव माने,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन शर्मा, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड,मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अश्विन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोपकर, इचरकंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील,करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिलारे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर,शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजीत सिंह घाडगे, पुढारी माध्यम समूहाचे अध्यक्ष योगेश जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पवार इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर शहरामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने

१ संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह याचा लोकार्पण सोहळा.

२ सीपीआर मधील नूतनीकरण केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा.

३ मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून त्याचे नूतनीकरण केलेले आहे त्याचा लोकार्पण सोहळा.

४ दुधाळी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा.

५ महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी बहुमजली पार्किंग इमारतीचा लोकार्पण सोहळा.

६ गोकुळातील येथे मेकॅनिकल पार्किंग इमारतीचा लोकार्पण सोहळा.

७ नर्सरी बाग येथील छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या विकास कामांचा  लोकार्पण सोहळा.

८ रंकाळा तलाव येथे उभारलेला अत्याधुनिक संगीत कारंजा याचा लोकार्पण सोहळा.

९ कोल्हापूर पोलिसांसाठी अध्यात्मिक सदनिका उभारण्यात आलेला आहे त्यांचा लोकार्पण सोहळा.
हे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर कागल येथे राजश्री शाहू महाराज यांच्या नवीन पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कागल येथेही जाहीर सभा होणार आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!